Skip to main content

नाकावर झाली ही सर्दी बहाल

लेखक मीनल यांनी गुरुवार, 03/04/2008 04:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मैत्रिणीला हिवाळ्यात खूप सर्दी होते. सोबतीला ताप ,खोकला ही असतो कधी कधी. तिच्या त्या त्रासाचे वर्णन ऐकून मला चेष्टा कराविशी वाटली . ती देते आहे ह्या विडंबनात. मूळ गाण्याबद्दल लिहायची जरूरी वाटत नाही. नाकावर झाली ही सर्दी बहाल नाकावर झाली ही सर्दी बहाल , जरा सोडून जा हो ,मोठा रूमाल ॥ धॄ॥ औषधाची गोळी ठेऊन जिव्हेवरती , ती कडू रिचविते, पाकिटातली पुरती, डोक दुखाव, नाक गळाव ,पुशित रहाव खुशाल ॥१॥ फुरफुर अशी की ओढ म्हणे अन सोड, भरे इंच इंच की आत येतसे फोड, घसा जाळिता कसा ताप ही पसरी काया हाल ॥२॥ जाडे जाडे पांघरूण घेता गरम ते बाई, सरदीचा ओसरला रोग तो सर्वा ठायी , असेच जावे झोपी, आणिक कधी न व्हावी सकाळ ॥३॥
लेखनविषय:

वाचने 11309
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया