✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

प
पाषाणभेद यांनी
Tue, 07/13/2010 - 09:17  ·  लेख
लेख
काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. http://www.saamana.com/2010/July/13/Link/Main1.htm http://72.78.249.124/esakal/20100712/4667969515589123216.htm http://epaper.pudhari.com/epapermain.aspx http://epaper.prahaar.in/ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6161109.cms http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=85367:2010-07-12-17-23-36&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104 http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/MainEdition-MainNews.php
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12154 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

सीमावासियांना

चिरोटा
गुरुवार, 07/15/2010 - 14:55 नवीन
महाराष्ट्रातल्या लोकांना फरक पडतो का ह्यापेक्षा सीमावासियांना फरक पडतो का ह्याचे उत्तर शोधणे महत्वाचे आहे.वर म्हंटल्याप्रमाणे सोलापूर,अक्कलकोट द्यायची तयारी आहे का?केंद्रात कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी ह्याबाबतीत ते काहीच करु शकत नाहीत कारण ह्यावर निर्णय झालेला आहे आणि आवडो वा न आवडो तो कर्नाटकच्या बाजुने पूर्वीच लागला आहे.आजपर्यंत मराठी पुढारी सीमाप्रश्नाच्या नावावर फक्त धंदा करत आले आहेत्.एक महिना तरी हा प्रश्न कुठच्या पुढार्‍याने तग लावून धरला का? नाही, कारण अगदी आमरण उपोषणाला बसले तरी काही फरक पडणार नाही हे त्यांना माहित आहे. कोचीन,मदुराई पर्यंत मराठी माणसे पसरली आहेत. ती व्यवस्थित स्थानिक भाषा बोलतात आणि घरी मराठी बोलतात. सीमावासिय पण बाहेर कन्नड आणि घरी मराठीच बोलतात.केवळ मराठी आहेत म्हणून कुठला हक्क नाकारला गेला का?(कर्नाटक कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष रघुनाथ देशपांडे मराठीच आहेत. http://www.karnatakapcc.com/kpcc-organization/president.html ) राजकिय पक्षानी तरुणांना भडकावून हुल्लडबाजी करण्यापेक्षा १० मराठी गुंतवणूकदारांना सीमाभागात गुंतवणूक करायला प्रवृत्त केले तर सर्वांच्या फायद्याचे होईल. --------- बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

केंद्रात कुठल्याही पक्षाचे

मितभाषी
गुरुवार, 07/29/2010 - 10:23 नवीन
केंद्रात कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी ह्याबाबतीत ते काहीच करु शकत नाहीत कारण ह्यावर निर्णय झालेला आहे आणि आवडो वा न आवडो तो कर्नाटकच्या बाजुने पूर्वीच लागला आहे.आजपर्यंत मराठी पुढारी सीमाप्रश्नाच्या नावावर फक्त धंदा करत आले आहेत्. १०००००००००००००००० % सहमत. तात्पर्य : आपण धागे काढुन/अंबाड्या वळुन काहीही फायदा नाही. उगं आपलं सर्व्हरला भार.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा