काय बोलणे
काय बोलणे, उगा रहाणे, गोंधळ चाले, शांत पहाणे ...
उगा कसे मी अवचित काढू , बोलायाचे नवे बहाणे ?
ओळख माझी मला पटेना, मी पणाचा अंत मिळेना ..
तुजसाठी मी कुठून आणू , नवे सूर अन नवे तराणे ?
वर वर सारे हसरे दिसती , काटे झेलून फुले दाविती,
कोणा ठाउक कुठे ठेविती, कोम्ब व्यथांचे जुने पुराणे ?
- सागर लहरी ०९-०६-२०१०
माननीय
माझा इथला
पाध्ये