✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अंदाज अपना अपना

ट
टारझन यांनी
Wed, 06/30/2010 - 22:07  ·  लेख
लेख
णमस्कार्स लोक्स , शिर्षक वाचुन एकदम अमिर-सलमान-परेश रावल समोर उभे राहिले की नाही ? अगदी !! ज्याला "अंदाज अपना अपना" आवडला नाही असा एकंही जण मला भेटलेला नाही. आज पर्यंत ६० वेळा तरी हा पिक्चर पाहिला असेल. नंतर तर काऊंटिंग विसरलो.
मी लै लहाण असतांना माझ्या मावशीच्या घरी पहिल्यांदा हा पिक्चर पाहिला होता. तेंव्हा केबल म्हणजे "वा वा !! केबल आहे का घरी !! वावावा !! " असला प्रकार होता. रात्री घरात सगळे झोपले होते आणि मी मावसभावांबरोबर हा चित्रपट पाहात होतो. " आवाज करु नका रे , नाही तर टिव्ही बंद करा ... काकांना फर्स्टशिप आहे ! " अशी कडक तंबी मावशीने दिली होती. पण माझं हसु काही केल्या थांबतंच नव्हतं !! मावशीने साताठ वॉर्नींग दिल्या .. मावसभाऊ गप्प बघ म्हणुन वैतागले पण माझं हसणं काही आवरंतंच नव्हतं !! शेवटी टिव्ही बंद केला गेला. पण तरीही माझं हसणं थांबत नव्हतं .. मधेच मला खळखळुन हसु येत होतं ;) तर असा हा अफलातुन सिनेमा !! चित्रपटाच्या सुरुवाती पासुन ते "द एंड" येई पर्यंतंच नव्हे तर त्यानंतरही हा चित्रपट अगदी मनमुराद मणोरंजण करतो .. "राजकुमार संतोषी" ह्या अतिषय हुषार डिरेक्टरचे उपकार मानावे तेवढे थोडकेच! हे काही चित्रपट परिक्षण नव्हे. ह्या चित्रपटाणे माझ्या लाईफ मधला बराच काळ मला जो अफलातुन आणंद दिला त्याबद्दल काहीबाही खरडणं ह्याला परिक्षण म्हणता येणार नाही , नव्हे .. आम्ही ह्या चित्रपटाचं परिक्षण करण्याची लायकीच राखत नाही. .. कोदांच्या लेखाला प्रतिक्रीया देतांना जसं कोणत्या वाक्यावर लिहु कोणत्या वाक्याला सोडु असं व्हावं तसंच "अंदाज अपना अपना" चा कोणता सिन हायलाईट करु न कोणता नको असं होतं !! तेंव्हाचे सलमान-आमीर आजसारखे निगरगट्टं आणि कडकलेले दिसत नव्हते. एकदम "क्युट" वगैरे म्हणता येतील असे चेहरे आणि कैक क्युट एक्स्प्रेशन देऊन बनवलेला ह्युमर ह्याला आजही तोड नाही. ह्या चित्रपटा आधी आणि नंतरही बाप सिनेमे येऊन गेले असतील , पण माझ्यासाठी तरी "अंदाज अपना अपना" च्च ! आमिर खान, सलमान खाण ने धुम तर केलीच्चे , पण शक्ति कपुर चा "क्राईम मास्टर गोगो" , परेश रावलचा डब्बल धमाका "पत्ते बिछवणारा , गेम बजाने वाला तेजा" आणि "वेळेचा पक्का शब्द मोजुन मापुन बोलणारा रामगोपाल बजाज" , विजु खोटे चा "हाथ को आया मुह ना लगा वाला स्मार्ट बॉय रॉबर्ट" , ड्युप्लिकेट लॉयन अर्थात शेहजाद खान चा "प्लान के मुताबिक चालणारा भल्ला" हे एकसे बढकर एक बाँब आहेत ...... आणि हे कमी की काय म्हणुन मेहेमुद , अमर-प्रेम चे पप्पा लोक , आणि पोलिस ठेशणातला फेव्हरिट इणिस्पेक्टर पण उरली सुरली कसर काढुन टाकतात. मी पामर काय ष्टोरी सांगणार? ती तर सर्वांना माहितीच असेल (तोंडपाठही असेल) जुहीची स्वप्न पाहाणारा आमिर खान जेंव्हा "आयला ! जुही !!" म्हणतो तेंव्हा खुदकन हसु फुटतं !! :) ह्या डायलॉगचा उपयोग मी आमची म्याडम आमच्यावर रागवली की करतो , अतिशय प्रभावी उपाय... आमच्या सायटीवर मी आणि माझे दोन कलीग मिळुन पुर्ण "अंदाज अपना अपना" चा माहौल तयार करतो, सगळ्यांचेच डायलॉग्ज पाठ असल्याने त्यांची लिंक कधीही लागते आणि आमच्या क्युब मधलं वातावरन हास्यलाटांनी ओसांडुन वाहतं !! कधी कधी ब्यांकेची बोर लोकं आमच्याकडे भुवया वर करुन कपाळाला आठ्या पाडुन बघतात , बट हु केयर्स ? "ये तेजा तेजा क्या है ... ये तेजा तेजा " क्राईम मास्टर गोगो गोज फॉर अ टोज !! =)) "सुनो सुनो दुनिया के लोगो .. सब से बडा है मिस्टर गोगो " भोळ्या सलमान खाणचा शिघ्रकवी काय जागृत होतो ? "तेजा मै हुं मार्क इधर है " ह्या डायलॉग मधे तुम्ही म्हणाल विनोदी ते काय ? पण चित्रपट पहाताना लोटपोट व्हावं इतकं खतरणाक त्याचं टायमिंग आहे "लाख लाख के पचास चेक होयेंगे सर " ह्या स्मार्ट बॉय रॉबट च्या मेंदुंच कौतुक वाटतं.. "ये वास्को दा गामा की गन है " ह्यावरच्या "किस के मामा की गन है " ह्या तेजा च्या पंच वर मी केवळ मरायचा बाकी राहातो. पोलिस ठेषणातला पाच मिंटाचा सिनही काय कमी नाही ... रोडवर मारपिट करण्याच्या कारणावरुन तुरुंगाचं ओपनींग करायला आणलेल्या अमर-प्रेम इनिस्पेक्टरच्या डोक्यावर ज्या मिर्‍या वाटतात त्याला उपमा नाही =)) "सर आप शकल से गधे उल्लु के पठे लगते हो लेकीन आप हो नही " , " सर चाय मे शक्कर कम है " काय लिहु काय नको ? लॉजमालकाला "रामानंद सागर च्या रामायणातला राम-भरत मिलणाचा " सिन आठवतो तेंव्हा माझ्या गालांना वात आलेला असतो .. "क्राईम मास्टर गोगो .. आखे निकाल के गोटिया खेलुंगा ... आया हुं कुछ ना कुछ तो लुट के जाऊंगा .. खानदानी चोर हुं मै मोगँबो का भतीजा .. " इत्यादी गोगो के कारनामे म्हणजे अगदी कहर आहे कहर. मी इथे कितीही लिहीलं तरी त्यात पिक्चर पहाण्याची सर येणार नाही , तसा माझा आग्रह ही नाही ... पण मी कधी निराश वैगैरे असलो की हा चित्रपट जरुर पाहातो, मित्रांच्या घोळक्यात असलो की अंदाज अपना अपना चे संवाद आपोआप एका मागोमाग ओठांवर येतात. ह्या चित्रपट बहुतेक ९३-९४ मधे आला असावा... त्या वेळी जेंव्हा ह्यायले विनोद लिहीले गेले तेंव्हा तर ते एकदम फ्रेश असावेत , जे मला आजही तितकेच फ्रेश वाटतात .. निखळ मनोरंजण करतात ... तेंव्हा .. ज्यांनी "अंदाज अपना अपना" पाहिलाय त्यांना पुन्हा एकदा उजळणी झालीच असेल , ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरुर पहा .. आणि ज्यांनी हा पिक्चर पाहिला पण त्यांना हा पिक्चर अगदी कॉमन वाटला त्याणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ;)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15256 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

ऑल टाईम फेवरिट

मैत्र
गुरुवार, 07/01/2010 - 13:03 नवीन
काही बेस्ट डायलॉग्ज : आयला गोविंदा... च्या मायला तू कौन.. पप्पा लोक पण लै भारी - देवेन वर्मा.. - मैंने लोगोंके सर मुंडवा के तुझे पाला पोसा डराया धमकाया... - तू जब जब खूश हुआ ... मेरे साथ कुछ बुरा ही हुआ है.. - मैं बेटीयो को चूडीया पहना रहा हूं... आप माँओ को पहना रहे हो.. जगदीप - लालाजी के पांचसौ रुपये देने है आज. - कभी कभी भीड में यूं खडे दिखायी देते है. मेहमूद - वाह वाह स्टुडिओ - क्या थोबडा है .. वाह ... थू थू थू थू... नजर ना लग जाये - अरे हां सुब्बु ... सुभाष घई... बस मध्ये भेटल्यावरची फेका फेकी... - देखूंगा देखूंगा अकाऊंटस देखूंगा. - चूसा हुआ आम :) - बंदर के सर पे तरबूज - सर्कस का रिटायर्ड बंदर ऐसे नही ऐसे नही... दो दोस्त एक प्याली में चाय पियेंगे... लॉज मालक - - अंधी बहन और विधवा माँ -रात में दो से तीन के बीच में पानी आता है.. नहा लेना - बोलो नहीं सुनते रहो - पास में कब्रस्तान है.. वहाँसे कंप्लेंट नहीं आनी चाहिये - बत्ती किस लिये चाहिये.. फटा फट कपडे बदलो और सो जाओ.. किसी को कुछ देखना दिखाना है क्या.. - ये हमें टिले पे मिला तो हमने इसका नाम टीलू रख्खा है - आप कितने अच्छे है डॉक्टर - प्लॅन के मुताबिक - मैने पी लिया भल्ला .. अभी तुम पियो.. - वो दोनों पपलू टपलू बेस्ट गाणं - ये रात और ये दूरी .. तेरा मिलना है जरुरी. के दिल मेरा धक धक बोले.. शेवटी ते कारंजं बंद पडतं :) इंन्स्पेक्टर - टिकू तलसानिया .. रिबन कापून उदघाटन करायला लावतो लॉकअपचं. माझ्या मित्राची आवडती लाइन होती जी तो नेहमी वापरायचा टार्‍याच्या क्युबिकल सारखी - ए बोल ना... ए बोल ना. रवीनाजी प्रेम कुछ कहना चाहता है. ए बोल ना. - उनका एक एक सवाल.. हमारे दो दो जवाब.. टार्‍या एक नंबर.. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

:-)

सहज
गुरुवार, 07/01/2010 - 13:12 नवीन
इंन्स्पेक्टर - टिकू तलसानिया .. रिबन कापून उदघाटन करायला लावतो लॉकअपचं. आणी कहर त्यावेळी पार्श्वसंगीत पापा कहते है बडा नाम करेगा! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

+१

नंदन
गुरुवार, 07/01/2010 - 13:17 नवीन
>>> आणी कहर त्यावेळी पार्श्वसंगीत पापा कहते है बडा नाम करेगा! --- अगदी. अजून एक रिअल/रील लाईफ रेफरन्स म्हणजे शोले पिक्चरबद्दल बोलताना आमिर सलमानला उद्देशून 'इसके बाप ने लिखी है' (सलीम) म्हणतो ते :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

आय होप यु

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 16:26 नवीन
आय होप यु आल यंजाईड धिस धागा :) नॉट लास्ट बट नॉट लिस्ट टू ... आमिर खान जेंव्हा कटींगचं दुकान विकतो , त्याच्या णेक्स्ट दिवशी , त्याच्या बापाला ज्याने दुकान विकत घेतलं तो म्हणतो मै यहा "चुडीयोंका दुकान खोलुंगा चुडीयोंका " ह्यात "चुंडीयोंका" या शब्दाचा उच्चार वाखाणन्या जोगा आहे. बाकी "इन मजबुत कंधोंका सहारा ना होता तो " म्हणताना अमिर खाणची छाती काय भरुन येते =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अजून काही..

मैत्र
गुरुवार, 07/01/2010 - 13:17 नवीन
- अमरः ये लो अपना अपना ग्लास... रॉबर्ट : अपना अपना ग्लास? अरे लो. अजीब आदमी है. पहले दे नहीं रहा था, अब ले नहीं रहा है - पाया .. कबाब -- ये ले घोडे का जुलाब - सर ऐसा किजीये आप बीच में आ जाइये (त्या मोपेडवर ते बजाज ला घेऊन येण्यासाठी जातात - जेव्हा तेजा येतो) -नमस्ते नमस्ते... अबे चूप ... शादी में आये हो क्या ...(गोगोजी - आपका घागरा नंतर) -सुनो सुनो दुनिया के लोगों.. सबसे बडा है मिस्टर गोगो एक सही सीन - आमीरचा - 'झकास..' तो ज्या पद्धतीनं म्हणतो :) प्रेमः अमर ... गोली.. इसमें गोली नही है.. प्रेम जेव्हा त्या न बांधलेल्या रोप वर चढतो ... सलमानला वाईट भोंदू दाखवला आहे. त्यानंतर दोघांनी परत एकत्र काम केलं नाही बहुतेक. खरं आहे टार्‍या की कितीही लिहिलं तर पिक्चर पाहण्याची सर नाही. आणि कितीही वेळा पाहिला तरी तितकाच सही वाटतो. आठवला की मूड बदलून जातो.
  • Log in or register to post comments

अहमद भाई ची

अनुप कोहळे
गुरुवार, 07/01/2010 - 13:20 नवीन
अहमद भाई ची सीगारेट स्वतःच्या बिडी ने चालाखी करून बदलणारा अमर ग्रेटच... हा सीन रवीना एअरपोर्ट च्या सीन नंतर आहे....
  • Log in or register to post comments

भन्नाट.........

ऋचा
गुरुवार, 07/01/2010 - 13:23 नवीन
=)) =)) =)) टार्‍या काय सही विषय काढलास.... अल्टी पिक.... ढाक चिकी ढाक चिकी ढाक चिकी ढा....................... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

+१

तुकाम्हणे
गुरुवार, 07/01/2010 - 13:37 नवीन
शब्द अपुरे पडतात, खरे आहे.. जबराट पिक्चर आहे. पण हा पिक्चर न आवडलेल्या लोकांना पण मी भेटलो आहे. टाऱ्याच्या भाषेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुषार विश्व जालावरील मराठी जग
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

योगी९००
गुरुवार, 07/01/2010 - 16:55 नवीन
हा लेख वाचल्यावर तु-नळी वर पुन्हा पाहिला आणि तितकाच हसलो.. माझे काही आवडते डॉयलॉग.. १) सलमान : अरे इनका अंकल है, इनको फिकर नही तो अपनेको काहे का फिकर..? २) करिश्मा जेव्हा अंकल लापता आहे असे सांगते तेव्हा.. सलमान : कही किडनॅप तो नही हुए? ३) सलमान : तुमजो कहती हो की तुम तुम नही..तुम वो हो......(मस्त मस्त) ४) आमिर : तुम महान हो....बल्की मै कहता हु की तुम पुरुषही नही... ५) शक्तिकपूर : सगळेच डॉयलॉग.. ६) भल्ला : टाईमबॉम्ब मे टाईम बिलकूल कम है.. पुर्ण पिक्चर पाहिल्यावर असे वाटते की सलमान खानला लोकांनी जास्त पसंत केले व त्याने जास्त हशा मिळवला. या कारणामुळेच अमिरखानने नंतर त्याच्याबरोबर कधीही काम केले नाही. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

देवेन

मराठे
गुरुवार, 07/01/2010 - 18:05 नवीन
देवेन वर्मा (अमर का बाप) चा डायलॉग "पुलिसभी यही कहेगी । वो देखो अमर का बाप जा रहा है ।"
  • Log in or register to post comments

शेवटी

कच्चा पापड पक्…
गुरुवार, 07/01/2010 - 18:12 नवीन
शेवटी सलमान आणि आमीर दोघ हात वर करुन (hands up) शक्ति कपुर च्या मागे चालत जात असतात. कच्चा पापड
  • Log in or register to post comments

http://www.youtube.com/watch?

कच्चा पापड पक्…
गुरुवार, 07/01/2010 - 18:18 नवीन
http://www.youtube.com/watch?v=sxHSQaKFJVk हि लिक आहे कशी टाकायची कच्चा पापड
  • Log in or register to post comments

शोलेचे पोस्टर

हुप्प्या
Fri, 07/02/2010 - 06:10 नवीन
शोलेच्या पोस्टरसमोर आमिर खान आणि सलमान उभे असतात. सलमान खान शोलेविषयी काहीतरी म्हणतो आणि आमिर खान म्हणते "हां तेरे बापने लिखी है ना ये पिक्चर". मग सलमानचे खवळणे, "मेरा बाप बीच मे मत ला" वगैरे. सलमानच्या बापानेच जावेदच्या जोडीने ह्या सिनेमाची पटकथा लिहिलेली असल्यामुळे ह्या प्रसंगाची गंमत वाढली.
  • Log in or register to post comments

अगर मेरे

Pain
Fri, 07/02/2010 - 10:50 नवीन
अगर मेरे बेवकूफ बेटेको और बेवकूफ बनाने की कोशीश की ना... दो दोस्त एक प्याले मैं चाय पिते है, इससे प्यार बढता है | अबे रख! जा.. =)) =))
  • Log in or register to post comments

"वो देख

स्पंदना
Fri, 07/02/2010 - 12:31 नवीन
"वो देख तेरी भाभी" अछ्चा तु माधुरी के साथ शादी करनेवाला है? "भाभी होगी तेरी, शादी होगी मेरी" लास्ट्च्या फाइट मध्ये" कुर्सी नही, कुर्सी नही" "घुटना नही, घुटना नही" सुन्दर पिक्चर! थँक्स टारभाऊ. निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका(योगेश२४ यांच्या परवानगीने)
  • Log in or register to post comments

माझा मित्र

संजा
Fri, 07/02/2010 - 15:22 नवीन
माझा मित्र बापाशी भांडण करुन घर सोडुन माझ्या घरी आला होता. जरा रीलॅक्स व्हावे म्हणुन जवळ असलेल्या थेटर वर गेलो तर हा पिक्चर लागला होता. सगळ टेन्शन विसरुन ३ तास भन्नाट हसलो होतो दोघं. भारी पिक्चर. संजा
  • Log in or register to post comments

टार्या जियो...

मी-सौरभ
Fri, 07/02/2010 - 16:33 नवीन
एक नं. टोपिक ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

पिताजी मुझे मेरी मंझील बिलकूल

एक
Fri, 07/02/2010 - 22:41 नवीन
सामने दिखायी दे रही है! (सलमान) जगदीपः सामने पुलीस स्टेशन है और समशान घाट है. कौनसी मंझील है बेटा तुम्हारी? "घोडे का जुलाब" खाल्यानंतरचे सलमान चे एक्स्प्रेशन केवळ अप्रतीम!!!
  • Log in or register to post comments

बोलणं संपून

संदीप चित्रे
Sat, 07/03/2010 - 01:14 नवीन
फक्त हसणं सुरू राहतं असा सिनेमा. 'अंदाज....'ची आठवण करून दिल्याबद्दल धन्स रे मित्रा. हा लांब वीकांत सत्कारणी लावता आला तर बघतो आता :)
  • Log in or register to post comments

अब्बूजान!

दैत्य
Mon, 02/14/2011 - 20:13 नवीन
अब्बूजान!
  • Log in or register to post comments

ह्या शिनेमात सलमान ने आमीर ला

निनाद मुक्काम …
Mon, 02/14/2011 - 22:17 नवीन
ह्या शिनेमात सलमान ने आमीर ला खाल्ला आहे काही प्रसंगात ( डार्क हॉर्स ) बाकी अजून परेश रवेल चा ''पत्ते आणि गेम चे डायालोग डायालोग (किंवा त्यांचा पहिल्यांदा ह्या दोघांना भेटण्याचा प्रसंग नामसे हि ......) करिश्मा तिलू अगदी गोड आवाजात म्हणते . गाणी जुन्या चालीची धीमी होती .( बाला सुब्रामान्यं आणि सलमान हे बेस्ट ) हा सिनेमा आणि साराभाई कितीही वेळा पहिले तरी .... वाव्वा प्रोडकशन कि चाय माधुरी जुही दोनो चलेगी चलेगी कुद कुद के चलेगी . माझा आवडता सुरमा भोपाली व त्याची मेहमूद बरोबर जुगलबंदी '' अबे बहोत पुराना पापी हे तू ''
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा