मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्पेन वि. पोर्तुगाल ....

छोटा डॉन · · विशेष
विशेष
अजुन ४ तासांचा अवकाश , रणशिंग फुंकले जाणार ... जर्मनी वि. इंग्लंड ह्या मॅचपेक्षा अधिक रंगतदार मॅच असणार की त्यातली एक टीम डायरेक्ट समोरच्याला भुईसपाट करणार ?
विरुद्ध
स्पेन : फिफाच्या जागतीक क्रमवारीतला 'नंबर २' चा संघ पोर्तुगाल : फिफाच्या जागतीक क्रमवारीतला 'नंबर ३' चा संघ स्पेन : डेव्हिड व्हिया, टोरेस, शॅबी, झॅवी, इनियेस्टा, फॅब्रिगास, पुयॉल, सॅकियो रॅमॉस आणि खुद्द इकर कॅसिलास अशी कागदावरची दमदार फळी पोर्तुगाल : जगातला सगळ्यात महागडा आणि आपल्या किमतीचे पुरेपुर योगदान देणारा 'क्रिस्तियानो रोनाल्डो', टियागो, डेको, राऊल मैरेलेस, पाऊलो फरेरा, रिकार्डो काल्व्हालो असा संतुलीत संघ स्पेन : ह्यावेळेसचे 'फेव्हरिट्स ( हे माझे एकट्याचे वैयक्तिक मत नव्हे)'. बास ! पोर्तुगाल : जगातल्या १ नंबरच्या आणि ह्या वर्ल्डकपमध्ये भयंकर फॉर्मात असलेल्या 'ब्राझिल'ला रोखण्याचा व आयव्हरी कोस्टाला हरवुन व उ. कोरियाचा ७-० ने फडशा पाडुन दिमाखात दुसरी फेरी गाठणारा संघ, ह्यांच्याकडुन 'चमत्कारा'ची अपेक्षा ठेवणे नक्कीच व्यर्थ नाही. ताकद : स्पेन : भयंकर फॉर्मात असलेला डेव्हिड व्हिला आणि त्याच्या बरोबरीने मिडफिल्डमध्ये धुमाकुळ घालणारा इनियेस्टा आणि त्यांना 'बॅक' वरुन रसद पुरवणारा सॅकियो रॅमॉस. शिवाय नेहमीचे ओलेन्सो, झॅवी, फॅब्रिगास असे यशस्वी कलाकार. पहिल्या मॅचचा अपवाद सोडता स्पेनच्या डिफेंड लाईन आणि कॅसिलासने आत्तापर्यंत प्रतिपक्षाची सर्व आक्रमणे यशस्वीपणे थोपवली आहेत. आज जर 'टोरेस' खेळला तर ते ट्रंप कार्ड आणि बोनस असेल पोर्तुगाल : क्रिस्तियानो रोनाल्डो !!!!! खल्लास. ५-६ जणांना चकवुन रोनाल्डोने बॉल अगदी पायात आणुन ठेवल्यास टियागो, राऊल, डॅनी नक्की गोल मारणार. पाऊलो फरेरा आणि रिकार्डो कार्व्हालो हे अनुभवी आणि बराच काळ एकाच संघातुन खेळलेले डिफेंडर्स. साखळी सामन्यात ह्यांनी केवळ '१ गोल स्विकारला' आहे त्यामुळे बचावाबाबत प्रश्नच नाही. त्रासदायक ठरु शकणार्‍या बाबी : स्पेन : नेहमीचाच प्रॉब्लेम, ऐनवेळी कच खाणारे स्ट्रायकर्स, टोरेस सध्या अजिबात कॉन्फिडंसमध्ये नाही. मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेल्यास इनियेस्टा, झॅवी, ओलेन्सो आदींच्या फिटनेसचा प्रश्न येउ शकतो. प्रत्येक मॅचमागे २५-३० शॉट्स ऑन-टार्गेट मारुनपण गोलची संख्या काही वाढत नाही, क्लिनिकल फिनिशचा जोरदार अभाव. आक्रमणासाठी रॅमॉस नेहमीच पुढे धावत असल्यास बचावफळीची उघडी पडणारी उजवी बाजु ... पोर्तुगाल : जी ताकद आहे तोच कच्चा दुवा, रोनाल्डोला प्रतिपक्षाने पुर्ण जखडल्यास कमजोर पडणारी मधळी फळी व त्यामुळे हतबल स्ट्रायकर्स. आज डेको खेळल्यास ही समस्या जराशी मोकळी होईल. आजचा सामना 'निकालीच' काढायचा असल्याने त्याचे प्रेशर आघाडी फळीवर, कारण साखळी सामन्यात कोरियाला ७-० ने धुतल्यावर नंतर 'अनिर्णीय झाला तरी हरकत नाही' ह्याच भुमिकेतुन हे खेळले. भरभक्कम स्पॅनिश मध्यफळी आणि स्ट्रायकर्सना फरेरा आणि कार्व्हाल्लो रोखु शकतात का हा प्रश्न. मैदानावरचे युद्ध : १. रोनाल्डो वि. कॅप्डेव्हिला :
X
क्रिस्तियानो रोनाल्डोचे तांडव रोखण्याची मुख्य जबाबदारी 'योआन कॅप्डेव्हिला' हा स्पॅनिश लेफ्ट बॅकवर असेल, पुयॉलच्या मार्किंगप्रमाणे तो आणि कॅप्डेव्हिला जातीने रोनाल्डोकडे लक्ष देतील. हे संभाळत असतानाच कॅप्डेव्हिलाला रोनाल्डोला चुकवुन बॉल इनियेस्टापर्यंत पोहचवण्याचीही कामगिरी करावी लागेल. २. ब्रुनो अल्वेस / रिकार्डो कार्व्हालो वि. डेव्हिड व्हिला :
X
डेव्हिड व्हिलाच्या गोलक्षेत्रातील थयथयाटाला पायबंद घालण्यासाठी अल्वेस-कार्व्हालो ही जोडगोळी एव्हाना तयार झाली असेल. तिकडे इनियेस्टाला आवरायला पावलो फरेराचा आपला सर्व अनुभव पणाला लावायला लागेल हे निश्चित. आमचा अंदाज : अर्थातच .... स्पेन जिंकेल !!! मार्जिन : १-० किंवा २-१ वगैरे. पेनल्टी शुट-आउट झाल्यास स्पेन १००% जिंकेल. जे काही असेल ते असेल, जोरदार सामना पहायला मिळणार हे निश्चित !!!

वाचन 6785 प्रतिक्रिया 42
Permalink

आज आमचे घोडे स्पेनवर :) स्पेन!! स्पेन!! स्पेन!!

In reply to by स्वप्निल..

Permalink

आमची सगळी घोडे , गाढवं , खेचरं सग्गळं सग्गळं पोर्तुगाल वर .. :) गो क्रिस्तियानो गो ............... :) - कुस्तियानो टाराल्डो
Permalink

लै भारी रे डान्या :) आता फक्त वाट पहायची...आणि मग दंगा करायचा. :D
Permalink

मे द बेस्ट टीम(ऑन द डे) विन्स!!!!
Permalink

स्पेन जिंकणार असे वाटतयं... पण पोर्तुगाल स्पेन ला हरवु शकतोच निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
Permalink

हे तर रोनाल्डोच ठरवेन....
Permalink

मे द बेस्ट टीम विन! आमचा अंदाज फुलटाईमला २-२. पुढचं सांगता येत नाही. :)
Permalink

ह्म्म्म स्पेन जिकली तर पुढे भांड्यायला मजा ईल ना ;) तवा या म्यॅच पुर्ता डॉण्याला सपोरर्ट :D

In reply to by गणपा

Permalink

अर्थात सहमत आहे!
Permalink

मस्त सामाना-पूर्व-परिक्षण :) अंदान: स्पेन ३-२ ने जिंकेल ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
Permalink

सहमत! मुख्य सामन्याचे काही सांगता येत नाही. पोर्तुगाल लै भारी टिम आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
Permalink

लै अवघड आहे सांगणं! डोस्क्याचा पार भुस्काट झाला विचार करुन. स्पेन ०.०००१% ने जास्त संधी आहे पोर्तुगालपेक्षा. (कॅल्क्युलेशन मिश्टेक शोधत आहे) -Nile
Permalink

स्पेन १-० ने पुढे... डेव्हिड विला परत एकदा निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

Permalink

स्पेन जिंकणार वाटतं... १५ मिनीटे बाकी आहेत अजून

बा धमाला, कोणता झेंडा घेउ हाती .........ह्ये कोडं सुटना म्हनुनशान एका टायमाला दोन दोन झेंडे झ्येतो काय रे. फाउल...

In reply to by गणपा

Permalink

चल बे! ह्या म्याचसाठीचा झेंडा हाय तो! (आणि अर्जेंटिनानं शनिवारी शेण खाल्लंच तर कंटुनि करायला ब्याकप ठेवलाय ;) ) इठ्ठला...दे रे कातडीबचावू झेंडाऽऽऽ...........
Permalink

माझं सांत्वण करायला कोणीतरी या रे !!! माझे शंभर लेख तोंडावर आपटल्यासारखं झालंय (ए कोण म्हंटला रे माझा गुर्जी झाला म्हणुन .. हाणा त्याला ) डाण्या माझा आयडी ब्लॉक करण्याची धमकी देत होता म्हणुन स्पेन ला एक गोल करुन देण्यात आला आहे. :)

In reply to by टारझन

Permalink

टार्‍या चोच्या... कितीला झोपला बे तु? =))

In reply to by धमाल मुलगा

Permalink

काल ब्राझिल चे १०० रुपै मिळालेले ... आज तेच गेले तिच्यामायला ... कोणत्या रेमट्याचा लेख वाचला आज उठल्या उठल्या काय माहित ... साला असो .. आमच्या ब्राझिल-आर्जेंटिणा अजुनही मैदाणात आहेत ... बाकी डाण्याच्या मैत्रीला जागुन आम्ही हा गेम स्पेन ला दिलाय :) नाही तर... तसाही देणारंच होतो हो... =)) - स्पेनेश बेटहारवी
Permalink

मॅच तितका काही ग्रेट झाला नाही.. पोर्तुगाल चा गोलकिपर चांगला होता... पण १-० ही स्कोअरलाईन आवडली नाही.. असो डॉनराव सविस्तर लिहितिलच स्पेन पुढे आले बरे झाले... आता स्पेन ला पॅराग्वे काही अवघड नाहिए निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
Permalink

पांढर्‍या जर्सी घालून सारे नुसतीच झगमग सुमारसद्दी बरा वाटला जाळ्यापुढती रक्षणकर्ता चेंडू अडवी बाकी साररी पोर्तुगालची ओवररेटेड सुमार टोणगी ....

In reply to by शरदिनी

Permalink

=)) =)) =)) काय भारी लिहिलयं निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by शरदिनी

Permalink

खी: खी: खी:!!!! येलकम ब्याक हो शरदिनीताई! :D

In reply to by शरदिनी

Permalink

बाकी साररी पोर्तुगालची ओवररेटेड सुमार टोणगी .... आमच्या पोर्तुगिज खेळाडु फक्त टोणगी नाहीत तर एकदम हुशार आहेत. काल पंचाच्या चुकीमुळे स्पेन जिंकले. वेताळ
Permalink

कुठे आहेत रे तो मला पिंग करुन खिजवणारा टार्‍या ? कुठे आहे रे तो पुढच्या फेरीच्या चार्टमध्ये मुद्दाम 'खिजवण्यासाठी' जागा रिकामा ठेवणारा प्रभ्या ? कुठे आहे त्यावर दुष्टपणे कमेंट करणारा 'मेघ्या' ? कुठे आहेत मला 'काँग्रॅट्स' म्हणुन खिजवणारे बिका ? कुठे गेले ? पळाले काय सुमडीत ... हे पहा लेकांनो ... धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ ------ छोटा डॉन

अभिनंदन डॉणेश्वर.. जिंकली एकदाची स्पेन. जाम घाम गाळावा लागला. पर पोर्तुगाल ही उत्तम खेळली. बरेच जोरदर हल्ले झाले दोन्ही बाजुने. आजचा खेळ पाहाता स्पेनचा बचावे सहज भेदला जाउ शकतो हे दिसुन आलं. बाकी आपल विश्लेषण वाचायला उत्सुक आहे. पुन्ह्यांदा अभिनंदन

In reply to by गणपा

Permalink

गणपाशी सहमत. बाकी डिटेल विश्लेषण आणि आमचे खास फोटोपरिक्षण उद्या नक्की. आता खुप उशीर झाला :) ये धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड !!! चला, आमची कल्टी आता. :) ------ छोटा डॉन
Permalink

धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ पळाले बघा सगळे स्पेनद्वेष्टे !! ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
Permalink

१३व्या मॅचमध्ये फक्त दुसर गोल स्विकारणार्‍या पोर्तुगालचे आक्रमण फारच वाईट होते. पासिंग मध्ये किती चुका! ट्रंप कार्ड रोनाल्डोला पासेसच नाहीत! अश्या मॅचमध्ये काउंटर अ‍ॅटॅक फार महत्त्वाचा असतो जो आज पोर्तुगालकडून दिसला नाही, जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी बॉलचा ताबा धसमुसळेपणाने घालवला. आक्रमणाबद्दल खालील आकडे बोलतीलच स्पेन --------------- पोर्तुगाल 19 -Shots -------9 10 -Shots on goal-- 3 13 -Fouls Committed-- 18 6 -Corner kicks---- 3 1 -Yellow cards---- 1 0 -Red Cards ---- 1 61% -Possession (%)---- 39% खरंतर एक्च गोल झाला हे त्यांचे नशिब आणि गोलकीपरचा सुंदर बचाव. आज पोर्तुगाल कुठेच जिंकेल असे वाटले नाही. -Nile

In reply to by स्वप्निल..

Permalink

आणी पोर्तुगालने या कपात खाल्लेला पहिला गोल पण....

In reply to by प्रभो

Permalink

आरारारारारारारा काय पण गोल खायची वेळ साधली पाहा. सालं यकदम औटच झालं..
Permalink

पोर्तुगालचा गोलकीपर भारीच खेळला. एडुअर्डो की एडवर्डो?
Permalink

खरं तर या दोन्ही टीमचे काही मोजके खेळाडू सोडले तर यांच्या ताकदी/कमजोरी बद्दल जास्त काही माहिती नाही... पण माझे वैयक्तिक मत स्पेन ला.... (कधी कधी ब्लाईंड गेम पण खेळून पाहवी :? ) ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
Permalink

नशिबाने स्पेन जिंकले आहे. पुढे बघू काय होते ते. :P पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
Permalink

स्पेन जिंकलं.......जिंकणारच होतं म्हणा! :)