अजुन ४ तासांचा अवकाश , रणशिंग फुंकले जाणार ...
जर्मनी वि. इंग्लंड ह्या मॅचपेक्षा अधिक रंगतदार मॅच असणार की त्यातली एक टीम डायरेक्ट समोरच्याला भुईसपाट करणार ?
विरुद्ध
स्पेन : फिफाच्या जागतीक क्रमवारीतला 'नंबर २' चा संघ
पोर्तुगाल : फिफाच्या जागतीक क्रमवारीतला 'नंबर ३' चा संघ
स्पेन : डेव्हिड व्हिया, टोरेस, शॅबी, झॅवी, इनियेस्टा, फॅब्रिगास, पुयॉल, सॅकियो रॅमॉस आणि खुद्द इकर कॅसिलास अशी कागदावरची दमदार फळी
पोर्तुगाल : जगातला सगळ्यात महागडा आणि आपल्या किमतीचे पुरेपुर योगदान देणारा 'क्रिस्तियानो रोनाल्डो', टियागो, डेको, राऊल मैरेलेस, पाऊलो फरेरा, रिकार्डो काल्व्हालो असा संतुलीत संघ
स्पेन : ह्यावेळेसचे 'फेव्हरिट्स ( हे माझे एकट्याचे वैयक्तिक मत नव्हे)'. बास !
पोर्तुगाल : जगातल्या १ नंबरच्या आणि ह्या वर्ल्डकपमध्ये भयंकर फॉर्मात असलेल्या 'ब्राझिल'ला रोखण्याचा व आयव्हरी कोस्टाला हरवुन व उ. कोरियाचा ७-० ने फडशा पाडुन दिमाखात दुसरी फेरी गाठणारा संघ, ह्यांच्याकडुन 'चमत्कारा'ची अपेक्षा ठेवणे नक्कीच व्यर्थ नाही.
ताकद :
स्पेन : भयंकर फॉर्मात असलेला डेव्हिड व्हिला आणि त्याच्या बरोबरीने मिडफिल्डमध्ये धुमाकुळ घालणारा इनियेस्टा आणि त्यांना 'बॅक' वरुन रसद पुरवणारा सॅकियो रॅमॉस. शिवाय नेहमीचे ओलेन्सो, झॅवी, फॅब्रिगास असे यशस्वी कलाकार.
पहिल्या मॅचचा अपवाद सोडता स्पेनच्या डिफेंड लाईन आणि कॅसिलासने आत्तापर्यंत प्रतिपक्षाची सर्व आक्रमणे यशस्वीपणे थोपवली आहेत.
आज जर 'टोरेस' खेळला तर ते ट्रंप कार्ड आणि बोनस असेल
पोर्तुगाल : क्रिस्तियानो रोनाल्डो !!!!! खल्लास.
५-६ जणांना चकवुन रोनाल्डोने बॉल अगदी पायात आणुन ठेवल्यास टियागो, राऊल, डॅनी नक्की गोल मारणार.
पाऊलो फरेरा आणि रिकार्डो कार्व्हालो हे अनुभवी आणि बराच काळ एकाच संघातुन खेळलेले डिफेंडर्स. साखळी सामन्यात ह्यांनी केवळ '१ गोल स्विकारला' आहे त्यामुळे बचावाबाबत प्रश्नच नाही.
त्रासदायक ठरु शकणार्या बाबी :
स्पेन : नेहमीचाच प्रॉब्लेम, ऐनवेळी कच खाणारे स्ट्रायकर्स, टोरेस सध्या अजिबात कॉन्फिडंसमध्ये नाही. मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेल्यास इनियेस्टा, झॅवी, ओलेन्सो आदींच्या फिटनेसचा प्रश्न येउ शकतो. प्रत्येक मॅचमागे २५-३० शॉट्स ऑन-टार्गेट मारुनपण गोलची संख्या काही वाढत नाही, क्लिनिकल फिनिशचा जोरदार अभाव.
आक्रमणासाठी रॅमॉस नेहमीच पुढे धावत असल्यास बचावफळीची उघडी पडणारी उजवी बाजु ...
पोर्तुगाल : जी ताकद आहे तोच कच्चा दुवा, रोनाल्डोला प्रतिपक्षाने पुर्ण जखडल्यास कमजोर पडणारी मधळी फळी व त्यामुळे हतबल स्ट्रायकर्स. आज डेको खेळल्यास ही समस्या जराशी मोकळी होईल. आजचा सामना 'निकालीच' काढायचा असल्याने त्याचे प्रेशर आघाडी फळीवर, कारण साखळी सामन्यात कोरियाला ७-० ने धुतल्यावर नंतर 'अनिर्णीय झाला तरी हरकत नाही' ह्याच भुमिकेतुन हे खेळले.
भरभक्कम स्पॅनिश मध्यफळी आणि स्ट्रायकर्सना फरेरा आणि कार्व्हाल्लो रोखु शकतात का हा प्रश्न.
मैदानावरचे युद्ध :
१. रोनाल्डो वि. कॅप्डेव्हिला :
X
क्रिस्तियानो रोनाल्डोचे तांडव रोखण्याची मुख्य जबाबदारी 'योआन कॅप्डेव्हिला' हा स्पॅनिश लेफ्ट बॅकवर असेल, पुयॉलच्या मार्किंगप्रमाणे तो आणि कॅप्डेव्हिला जातीने रोनाल्डोकडे लक्ष देतील.
हे संभाळत असतानाच कॅप्डेव्हिलाला रोनाल्डोला चुकवुन बॉल इनियेस्टापर्यंत पोहचवण्याचीही कामगिरी करावी लागेल.
२. ब्रुनो अल्वेस / रिकार्डो कार्व्हालो वि. डेव्हिड व्हिला :
X
डेव्हिड व्हिलाच्या गोलक्षेत्रातील थयथयाटाला पायबंद घालण्यासाठी अल्वेस-कार्व्हालो ही जोडगोळी एव्हाना तयार झाली असेल.
तिकडे इनियेस्टाला आवरायला पावलो फरेराचा आपला सर्व अनुभव पणाला लावायला लागेल हे निश्चित.
आमचा अंदाज :
अर्थातच .... स्पेन जिंकेल !!!
मार्जिन : १-० किंवा २-१ वगैरे.
पेनल्टी शुट-आउट झाल्यास स्पेन १००% जिंकेल.
जे काही असेल ते असेल, जोरदार सामना पहायला मिळणार हे निश्चित !!!
विरुद्ध 
X 
X 
विशेष
वाचने
6793
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज आमचे
आमची सगळी
In reply to आज आमचे by स्वप्निल..
खल्लास्स!!!
मे द बेस्ट
स्पेन
पोर्तुगाल चा संघ दमदार व संतुलित वाटतो.
हे तर
मे द बेस्ट
ह्म्म्म
+ १
In reply to ह्म्म्म by गणपा
३-२
पेनल्टी शुट-आउट झाल्यास स्पेन १००% जिंकेल..
लै अवघड
स्पेन १-०
स्पेन
In reply to स्पेन १-० by निखिल देशपांडे
बहुतेक हाच
In reply to स्पेन १-० by निखिल देशपांडे
य्या! धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड!
In reply to स्पेन १-० by निखिल देशपांडे
बा धमाला,
In reply to य्या! धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड! by धमाल मुलगा
चल बे! ह्या
In reply to बा धमाला, by गणपा
माझं
टार्या
In reply to माझं by टारझन
हापिसात एका बरोबर बेट लावलेली ...
In reply to टार्या by धमाल मुलगा
मॅच तितका
पांढर्या
काय भारी
In reply to पांढर्या by शरदिनी
खी: खी:
In reply to पांढर्या by शरदिनी
शरदिनीताई,
In reply to पांढर्या by शरदिनी
शरदिनीताई,
In reply to पांढर्या by शरदिनी
हे काय बरोबर नाही शरदिनी ......
In reply to पांढर्या by शरदिनी
कं बाला...मजा आली ना रं!
कुठे आहेत रे ते ?
अभिनंदन
In reply to कुठे आहेत रे ते ? by छोटा डॉन
सहमत ...
In reply to अभिनंदन by गणपा
हे हेहे!!!!
१३व्या
स्पेनचं या
In reply to १३व्या by Nile
आणी
In reply to स्पेनचं या by स्वप्निल..
आरारारारा
In reply to आणी by प्रभो
पोर्तुगाल
ब्लाईंड गेम..
नशिबाने
वा!