फिफा पेश्शल (चिकन चीझ रोल - चिकन चिली)

गणपा's picture
गणपा in पाककृती
26 Jun 2010 - 11:27 am

काय मंडळी झाली का तयारी रैवारची?
अहो कसली काय विचारताय जंगी सामना रंगणार आहे. आम्ही आत्ता पासुनच सगळी जय्यत तयारी करुन बसलो आहोत.
लै धम्माल उडणार आहे. दुपारी त्या इडियट बॉक्स समोरुन बुड कोण उचलणार. म्हणुन आत्ता पासुनच तयारीला लागलोय. बेत पण पक्का आहे.
काय म्हणता तुम्हालाही तयारी करुन ठेवायची आहे?
अहो मग वाट कसली पाहाताय लागा कामाला मी सांगतोच कसं काय करायच ते..

चिकन चीझ रोलः

साहित्य:
१ चिकन ब्रेस्ट.
मेयॉनिज.
मस्टर्ड सॉस.
अस्स्ल वर्‍हाडी ठेचा (नसल्यास चिली सॉस)
गार्लीक सॉस.
चीझ च्या चकत्या. (स्लाइस)
मैदा.
१ अंड फेटुन.
ब्रेड चा चुरा.
मीठ चवी नुसार.
तेल तळण्यासाठी.

कृती:

धार धार सुरीने एका चिकनच्या ब्रेस्टचे वर दाखवल्या प्रमाणे ३ पातळ पदर काढुन घ्या.

त्यावर थोड मीठ भुरभुरुन मग त्यावर बटर लावायच्या सुरीने अलगद अलगद हाताने मेयॉनिज लावुन घ्या.


मग त्यावर थोडा मस्टर्ड सॉस लावुन घ्या.


नंतर तिखट ठेचा/ चीली सॉस चा थर द्या.


आवडत असल्यास एक हात गार्लीक सॉसचा लावा.


त्यावर चीझ ची चकती अर्धी कापुन ठेवा.


अलगद हाताने पण घट्ट रोल करा.


रोल सुटु नये म्हणुन टुथपिक ने बंद केल तरी चालेल.
या रोलवर थोडा मैदा शिंपडा.


प्रत्येक रोल फेटलेल्या अंड्यात घोळवुन मग ब्रेडच्या चुर्‍यात घोळवुन घ्या.


ब्रेडच्या चुर्‍यात घोळवलेले रोल १५-२० मिनीट फ्रिज मध्ये ठेवावे.
नंतर तेलात मध्यम आचेवर १०-१२ मिनिटे सोनेरी होइस्तव तळुन घावे.

*****************************************************************************************

चिकन चिली:

साहित्य:


बोनलेस चिकन लांबट उभे तुकडे करुन.


१ मध्यम आकारचा कांदा उभा चिरुन.
१ मोठी भोपळी मिरची लांब चिरलेली.
२-३ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१/२ इंच आल बारीक चिरुन.


१ मोठा चमचा मैदा.
१ मोठा चमचा आलं लसुण पेस्ट.
१ चमचा काष्मिरी लाल तिखट
१ चमचा टॉमेटो पेस्ट.
१/२ चमचा हळद.
२-३ चमचे सोया सॉस.
मीठ चवीनुसार.
तेल.

कृती:


मैदा, आलं-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद,सोयासॉस, मीठ आणि टॉमेटो पेस्ट एकत्र करुन घावं आणि ते चिकन च्या तुकड्यांना लावुन १० मिनिट फ्रिजर मध्ये ठेवावं.


पॅन मध्ये थोड्या तेलावर कांदा गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा.
मग त्यात आलं लसणाचे तुकडे टाकुन १ मिनिट परताव.


आच मोठी करुन मग त्यात मुरवलेले चिकनचे तुकडे घालुन १०-१२ मिनिटं परतत रहावं.


चिकन चिजल्यावर त्यात भोपळी मिरची टाकुन २-३ मिनिटं मोठ्या आचेवर परतत रहावं.

*****************************************************************************************

उद्या चार मित्र जमणार आहेत. बार भरलेला आहे. किचन पण सुसज्ज आहे.
मग काय येताय ना ?

प्रतिक्रिया

सहज's picture

26 Jun 2010 - 11:32 am | सहज

तु पाठिंबा देशील ती टीम जिंको!

जयंत कुलकर्णी's picture

26 Jun 2010 - 11:32 am | जयंत कुलकर्णी

GREEEEEEEAAAAAAAAAAATTTTTTTTTTTTT !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

मी-सौरभ's picture

26 Jun 2010 - 12:03 pm | मी-सौरभ

आमाला बी बोलवा की गणपा...

-----
सौरभ :)

jaypal's picture

26 Jun 2010 - 12:14 pm | jaypal

पा.कृ. मस्तच आहेत. =P~
hjk
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

रेवती's picture

26 Jun 2010 - 7:51 pm | रेवती

ओ फोटूवाले जैपालभौ,
ही दोन पिल्लं मस्तच! तुमचं नाव 'फोटूकुमार' ठेवायला पाहिजे
बाकि गणपाच्या पाकृबद्दल काय बोलायच? आम्ही शाकाहारी!

रेवती

असली खादगी असेल तर आपण दिवसभर आस्था चॅनेल पण एका पायावर बघत बसु. ;)

वेताळ

ऋषिकेश's picture

26 Jun 2010 - 12:35 pm | ऋषिकेश

देव करो आणि तु म्हणशील ती टिम या रविवारी जिंको :)
फायनल मात्र तू काहिहि बेत कर स्पेनच जिंकणार आहे :P

ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

शानबा५१२'s picture

26 Jun 2010 - 12:39 pm | शानबा५१२

कोंबडी कीती कीलोची होती?
कधी कधी त्या बिचा-या प्राण्यावर दया करावशी वाटते.मॅकडोनाल्ड्स मधे कोंबडी कापायची पद्धत कोंबड्यांसाठी फार वेदनादायक असते म्हणून त्या विरोधात एका संस्थेने कोर्टात अपील केल होत..........त्याचा काय निकाल लागला ह्याची कोणाला कल्पना आहे का?
क्रुपया प्रतिसाद उडवु नये,लेखाला धरुनच आहे.

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

वाहीदा's picture

26 Jun 2010 - 8:20 pm | वाहीदा

कोंबडी कीती कीलोची होती?
लई भारी प्रतिसाद !
बाकी गणपाच्या पाकृ बाबतित नि:शब्द ! शब्दभांडार संपले
__/\__

~ वाहीदा

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jun 2010 - 1:20 pm | बिपिन कार्यकर्ते

गणपा साहेब, तुम्ही थोर आहात. महान आहात. पुढच्या महिन्यात दौरा आहे, लक्ष असु द्या. :)

बिपिन कार्यकर्ते

आशिष सुर्वे's picture

26 Jun 2010 - 1:32 pm | आशिष सुर्वे

चिकन-मटण खात नसल्याने, फक्त आवंढे गिळले रे बाबा..

पाकृ चविष्ट असण्याबरोबर, ती 'सुंदर' दिसणेही किती महत्त्वाचे असते, ते तुझ्या लेखांतून आणि प्रकाशचित्रांतून कळते..

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

स्मिता चावरे's picture

26 Jun 2010 - 7:10 pm | स्मिता चावरे

तरी आशिष यांच्याशी सहमत...

स्मिता चावरे's picture

26 Jun 2010 - 7:12 pm | स्मिता चावरे

गणपा यांच्या सगळ्या पाककृती करून खाणे शक्य नसले तरी त्या नेत्रसुखद असतात, म्हणून पहायला आवडतात.

जागु's picture

26 Jun 2010 - 7:19 pm | जागु

गणपा मी कितीदिवस चिकन चिली ची रेसिपी शोधत होते पण तुम्ही माझ काम एकदम सोप्प केलत फोटोसकट रेसिपी देउन. धन्यवाद.

प्रभो's picture

26 Jun 2010 - 7:57 pm | प्रभो

या रविवारी गणपा आमचा विरोधक असला तरीही पा़कृ फाट्यावर न मारता....पार्सल करण्याची सूचना करण्यात येत आहे......

पक्या's picture

28 Jun 2010 - 1:46 am | पक्या

वाह , क्या कहने..जबरा पाकृ आणि फोटोज. धन्यवाद
जय महाराष्ट्र , जय मराठी !

कच्चा पापड पक्का पापड's picture

28 Jun 2010 - 1:15 pm | कच्चा पापड पक्क...

रेसिपि वाचुन असे वाटते की पाचच मिनीटात तयार होईल.

चित्ताकर्षक =D> =D> =D>

u>कच्चा पापड

चटोरी वैशू's picture

15 Jul 2010 - 11:14 am | चटोरी वैशू

वा तोंडाला पाणीच सुटले....