काय मंडळी झाली का तयारी रैवारची?
अहो कसली काय विचारताय जंगी सामना रंगणार आहे. आम्ही आत्ता पासुनच सगळी जय्यत तयारी करुन बसलो आहोत.
लै धम्माल उडणार आहे. दुपारी त्या इडियट बॉक्स समोरुन बुड कोण उचलणार. म्हणुन आत्ता पासुनच तयारीला लागलोय. बेत पण पक्का आहे.
काय म्हणता तुम्हालाही तयारी करुन ठेवायची आहे?
अहो मग वाट कसली पाहाताय लागा कामाला मी सांगतोच कसं काय करायच ते..
चिकन चीझ रोलः
साहित्य:
१ चिकन ब्रेस्ट.
मेयॉनिज.
मस्टर्ड सॉस.
अस्स्ल वर्हाडी ठेचा (नसल्यास चिली सॉस)
गार्लीक सॉस.
चीझ च्या चकत्या. (स्लाइस)
मैदा.
१ अंड फेटुन.
ब्रेड चा चुरा.
मीठ चवी नुसार.
तेल तळण्यासाठी.
कृती:
धार धार सुरीने एका चिकनच्या ब्रेस्टचे वर दाखवल्या प्रमाणे ३ पातळ पदर काढुन घ्या.
त्यावर थोड मीठ भुरभुरुन मग त्यावर बटर लावायच्या सुरीने अलगद अलगद हाताने मेयॉनिज लावुन घ्या.
मग त्यावर थोडा मस्टर्ड सॉस लावुन घ्या.
नंतर तिखट ठेचा/ चीली सॉस चा थर द्या.
आवडत असल्यास एक हात गार्लीक सॉसचा लावा.
त्यावर चीझ ची चकती अर्धी कापुन ठेवा.
अलगद हाताने पण घट्ट रोल करा.
रोल सुटु नये म्हणुन टुथपिक ने बंद केल तरी चालेल.
या रोलवर थोडा मैदा शिंपडा.
प्रत्येक रोल फेटलेल्या अंड्यात घोळवुन मग ब्रेडच्या चुर्यात घोळवुन घ्या.
ब्रेडच्या चुर्यात घोळवलेले रोल १५-२० मिनीट फ्रिज मध्ये ठेवावे.
नंतर तेलात मध्यम आचेवर १०-१२ मिनिटे सोनेरी होइस्तव तळुन घावे.
*****************************************************************************************
चिकन चिली:
साहित्य:
बोनलेस चिकन लांबट उभे तुकडे करुन.
१ मध्यम आकारचा कांदा उभा चिरुन.
१ मोठी भोपळी मिरची लांब चिरलेली.
२-३ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१/२ इंच आल बारीक चिरुन.
१ मोठा चमचा मैदा.
१ मोठा चमचा आलं लसुण पेस्ट.
१ चमचा काष्मिरी लाल तिखट
१ चमचा टॉमेटो पेस्ट.
१/२ चमचा हळद.
२-३ चमचे सोया सॉस.
मीठ चवीनुसार.
तेल.
कृती:
मैदा, आलं-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद,सोयासॉस, मीठ आणि टॉमेटो पेस्ट एकत्र करुन घावं आणि ते चिकन च्या तुकड्यांना लावुन १० मिनिट फ्रिजर मध्ये ठेवावं.
पॅन मध्ये थोड्या तेलावर कांदा गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा.
मग त्यात आलं लसणाचे तुकडे टाकुन १ मिनिट परताव.
आच मोठी करुन मग त्यात मुरवलेले चिकनचे तुकडे घालुन १०-१२ मिनिटं परतत रहावं.
चिकन चिजल्यावर त्यात भोपळी मिरची टाकुन २-३ मिनिटं मोठ्या आचेवर परतत रहावं.
*****************************************************************************************

उद्या चार मित्र जमणार आहेत. बार भरलेला आहे. किचन पण सुसज्ज आहे.
मग काय येताय ना ?
वाचने
9887
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुरु
GREEEEEEEAAAAAAAAAAATTTTTTTTT
वा वा
गणपा दोन्ही चिकन
ओ फोटूवाले
In reply to गणपा दोन्ही चिकन by jaypal
चार मित्र ...त्यात मला एक पकड
देव करो
कोंबडी
हा! हा ! हा !
In reply to कोंबडी by शानबा५१२
गणपा
चिकन-मटण
मी पण खात नाही...
गणपा
गणपा मी
या रविवारी
वाह , क्या
लई भारी
यम्मी... मस्तच आहे हे सगळे...