मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<<टेंगूळ>>

कानडाऊ योगेशु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अवलियांच्या रुळावरुन भल्याभल्यांच्या मालगाड्या धडधडत निघुन गेल्या..आमचीही मालगाडी..धडतधडत नाही तर धडपडत.. दात ओठ खात आम्ही नेहेमीच भांडायचो.. ती लाटणे फेकुन मारायची अन मी ते चुकवायचो.. तोल न सांभाळुन बोलत असताना भांडत असताना.. डोक्यावरती आलेली टेंगळ्यांना ती रोज रात्री आयोडेक्स चोळायची.. आज सकाळीच नटुन सवरुन घालुन हिरवी साडी ती निघुन गेली..वटपौर्णिमेला.. मायला ही अशी ही दिसु शकते तर..! मी विचार करतोय ..कपाळावरचे टेंगुळ दाबत दाबत.. स्त्री वर्गाला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा! - योगेश

वाचने 4773 वाचनखूण प्रतिक्रिया 14

विसोबा खेचर Fri, 06/25/2010 - 12:49
आज सकाळीच नटुन सवरुन घालुन हिरवी साडी ती निघुन गेली..वटपौर्णिमेला..
सुंदर रे!
अवलियांच्या रुळावरुन भल्याभल्यांच्या मालगाड्या धडधडत निघुन गेल्या..
हे वाक्य फार फार आवडले.. :)

एकदम सही हो कानडाऊ इठ्ठला ! जबाब नही ! आणि वर पुन्हा वटपौर्णिमेच्या शुभेच्छा ! भले शाब्बास ! ह्या जन्मांत आलीत तेवढी टेंगुळे पुरे !

विडंबन आवडले. >> स्त्री वर्गाला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा! आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! (खाऊन-पिऊन सुस्त) अदिती

कर्नलतपस्वी Tue, 06/14/2022 - 14:15
संदीप खरे यांची कवीता आठवली "देवा मला रोज एक आपघात कर" देवा मला रोज एक लागू दे लाटणे 🙂