✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गुत्तुडा

ट
टारझन यांनी
गुरुवार, 06/24/2010 - 23:50  ·  लेख
लेख
"ए कटली रे कटली " "ए मध्या .......... पकड पकड " "मांजा पकड ... मी पतंग घेउन आलो " "च्यायला ... टार्‍या लै गुतुडा झाला लका .. मांजा काय कामाचा नाय " " आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? " काही नात्यांचही असंच असतं , बरिच गुंतागुंत असते आणि आपण तो गुंता सोडवण्याबाबद बर्‍याचदा पॅसिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. गोष्ट मनाला बोचत असते कुठे तरी. पण कधी इगो आडवा येतो, मी कमीपणा का घेऊ ? मी का गैरसमज दुर करावेत ? नाती नेहमी रक्ताचीच असावीत असंही नाही. इनफॅक्ट आपला नातेवाईकांशी हल्ली संबंध तरी कितीसा येतो हो ? कधी सुख-दु:खाच्या प्रसंगात तोंडदेखली चार हाय-बाय-कसंकाय ? म्हंटलं की तोंड फिरवुन नावं ठेवणार असे हे रक्ताचे नाते. आय डोण्ड गिव्ह अ डॅम् !!! जेंव्हा मी माझ्या पहिल्या-वहिल्या जॉबला जॉइन झालो होतो , तेंव्हा एकटाच सिलेक्ट झालो होतो. सगळं कसं नविन नविन होतं. एसीचं थंडगार वातावरण , कायम रफ्रेशनरचा घुमणारा सुगंध. सगळे टाय वगैरे घालुन सोफॅक्स्टिकेटेड लोकं त्यात मी आपला साध्या फॉर्मल्स मधे. ते वेल ऑर्गनाइझ्ड क्युबिकल्स , टिम वाईज विभागणी, एखाद्या कॉन्फरंस्न हॉल मधे चाललेली मिटींग, कोणत्या ट्रेणिंग रुम मधे कुठल्याश्या टिमचं चाललेलं ट्रेणिंग.. आपल्या अ‍ॅक्सेस कार्ड मुळे ऑटोअनलॉक होणारे दरवाजे, कँटिन मधे सगळे कसे गृपने येणार ... मला सगळंच नविन, कुतुहल होतं ह्या गोष्टींचं ... माझ्या साठी सगळेच चेहरे नविन! बरं अशी डायरेक्ट ओळख तरी कशी काढणार ? खुप बोर व्हायचं ! मग जीमेल ला लॉगिन करुन कंपनीतल्या गमतीजमती मित्रांबरोबर शेयर करायच्या. तो त्याच्या कंपनीतलं आणि आपण आपल्या कंपनीतलं वातावरण एकमेकांना सांगुन काय मिळायचं ते माहित नाही, पण फ्रेशरची जेंव्हा इंडस्ट्रित एंट्री होते तेंव्हा त्याला ह्या गोष्टींच कुतूहल असतं तसं मलाही होतं . थोड्या कालावधीत मी थोडा रुळलो. त्यावेळी माझे केस मानेपर्यंत लांब होते. आणि हाईट पर्सनॅलिटीमुळे मला लोकं टरकून होती, माझ्याशी बोलायला थोडी नर्व्हसायची, हे नंतर मला समजलं आणि मी ओशाळलो. लगेच केस कापुन माणसात आलो. :) नोकरी लागेपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मैत्रिणी नव्हत्या , मुलींशी बोलायला आमची अंमळ फाटायची हो. मी जॉइन केल्यावर माझ्या टिम मधे अजुन एक मुलगा- मुलगी जॉइन झाले. साहजिकच आमचा गृप झाला. मी तीन महिणे बेंचवर बसुन जे काही शिकलो ते त्या दोघांना शिकवण्याचं काम मला असाईन केलं गेलं. काही दिवसांनी त्या नव्या मित्राला दुसर्‍या प्रोजेक्ट वर लटकवलं , आणि मग ती आणि मी दोघंच उरलो .. तिच्याशी बोलताना मी नेहमी नर्व्हस असायचो. ती सुद्धा असावी. पण हळुहळु हे फॉर्मल वागणं संपलं , मैत्री बरीच घट्ट होत गेली. तिला कधी काही आडलं तर मी लगेच मदत करायचो. ती फार फार प्रश्न विचारयची.अगदी स्वतःच्या डोक्यात तो मॉनिटर मारुन घ्यावा असं वाटावं इतकं. आमची कंपनी प्रॉडक्ट बेस्ड होती. ते प्रॉडक्ट बँकेसाठी कार्ड मॅनेजमेंट , एटिएम्/पॉस मॅनेजमेंट चं काम करतं शिवाय कोर बँकिंगहोस्ट ला कनेक्टेड असतं. तसं पाहिलं तर कोर बँकिंग च्या तुलनेत प्रोडक्ट छोटं असलं तरी, प्रॉडक्ट भयंकर मोठा आहे. तर ह्या बाई म्हणत आपण लोक बँकिंग होस्ट का नाही बनवत ? (इथे मी डोक्याची केसं उपटली होती) ... तिला मी तिच्या नावाच्या टाईपचा कबाब असल्यानं "कबाब" असंच नाव पाडलं होतं , च्येष्टा मस्करीत दिवस कसा आरामात कटायचा. ती णॉनमहाराष्ट्रीयन होती, एम्टिआय मुळे तिचं बर्‍याच शब्दांचे उच्चार कॉमेडी असायचे.जसं कॉपी चं कोपी व्हायचं , रॅम चं रेम व्हायचं. मी तिची मुद्दाम मिमिक्रि करायचो. माझ्यासाठी हे सगळं मैत्रीपर्यंतंच होतं, पण तिच्या मनात माझ्या हेतुंविषयी शंका असावी. एका दिवशी अचानक तिने तिरकस बोलायला सुरुवात केली, "स्टे अवे फ्रॉम मी" असं काहीसं फिलिंग आलं! थोडंसं वाईट वाटलं आणि मी डायरेक्ट बोलणंच बंद केलंन! तिनेही काही रिस्पॉन्स दाखवला नव्हता.. कामापुरतं फक्त काय ते बोलणं व्हायचं. थोड्या दिवसांनी मी अफ्रिकेला जाणार असं कळल्यावर ती स्वत:हुन बोलायला आली , मी देखील कसला ही संकोच न बाळगता नॉर्मल रिस्पॉन्स दिला. लंच मधे म्हणाली , " तु जाणार तर बोर होईल मला खुप :) " "हो , पण मला थोडी शांती मिळेल =)) " ख्या ख्या हसत मी. त्यावर तिला पुन्हा राग आला होता. नंतर मी तिकडे असतांना तिलाही दुसर्‍या देशात ऑनसाईट पाठवलं होतं. तिकडुन चॅट वर पिंग करायची. इम्प्लिमेंटशन चा काही इश्यु असला की विचारायची. मी हातचं काम सोडुन तिचे इश्यु सिम्युलेट करुन सोडवण्याच्या मागे लागायचो. कधी छोट्या मोठ्या गोष्टी सांगायची. मी देखील हिरारीने समुपदेशन करायचो. थोडक्यात आय वाज अ लिसनर कम अ‍ॅडव्हायझर कम मेट फॉर हर. अलिकडच्या काळात काहीतरी कारणांवरुन सारखं काही बिनसायचं. ती माझ्याशी बोलणं सोडायची , पण मी मुद्दाम तिच्या आवाजाची नक्कल करुन जोक क्रॅक करायचो. कधीतरी तीला हसु फुटत असे आणि न लागणार्‍या गोष्टी .. जसं तिचा हात किंवा नोटबुक .. ह्याने माला बडवले जायचे. मी पण "थांब आता पोलिस कंप्लेंटंच करतो, मला हिने मारलं म्हणुन .. ए पोरांनो तुम्ही साक्षीला आहात ना रे " म्हणुन तिला अजुन चिडवायचो. बर्‍याचदा तिला कंपनीतुन बसस्टॉप पर्यंत लिफ्ट द्यायचो तेंव्हा तिचे पर्सनल प्रॉब्लेम्स , ऑफिसातले प्रॉब्लेम्स ती मला सांगायची ... "आमुक आमुक बॉस काही निट बोलत नाही रे हल्ली " , "सरांनी मला परफॉर्मन्स खराब आहे म्हणुन सगळ्यांसमोर पॉईंट आउट केलं आज " पासुन ते "तो सोम्यागोम्या हल्ली ट्राय करतोय माझ्यावर " असल्या गोष्टी सांगायची, त्यावर मी "मला त्याची किव येतो .. देव त्याला शक्ति देवो" म्हणुन तिला आनखीच चिडवायचो. एकदा काय झालं , लंच ब्रेक मधे आम्ही प्लेटा घेउन जेवण आणायला गेलो तेंव्हा एक दुसर्‍या टिम मधला नविन पोरगा हिच्याशी बोलण्याचा ट्राय करत होता, हिने त्याला तेंव्हा काही भाव दिला नाही. संध्याकाळी स्नॅक्स च्या सुमारास मी दुसर्‍या क्युबिकल मधे जाईन हिला फोन लावला आणि आवाज बदलुन बोलायला सुरुवात केली. , "हॅलो.. मे आय स्पिक विथ ... " "येस स्पिकींग ... " "हाय , धिस इज विनीत, वे मेट इन कँटिन अ‍ॅट लंच , यु रेमेंबर ?" "येस.... येस.... " "अ‍ॅक्चुली ... आय वांट टू टॉक समथिंग , कॅन वी मिट इन कॅफेटेरिया ?" " या ... व्हाय नॉट ... आय वॉज अबाऊट टू लिव्ह टू कँटिन ओन्ली " "ओके देन ... सी यु देयर इन अ मिनीट" फोन ठेऊन पटकन माझ्या क्युबिकल मधे येऊन साळसुदासारखा येऊन बसलो. ती पटकन वॉशरुम मधे जाऊन तोंड वगरे धुवुन आली ... आपले स्पेक्स आणि ड्रेस ठिक करत निघणार इतक्यात मी तिला टोकलं " किधर जा रही है रे ??? इतना नट के ? " "ए टार्‍या ... तुझे क्या करना है ? मे किधर भी जाऊं .... तु तेरा काम कर " " अबे ए .... कोई विनीत बिनीत नही आने वाला ... मैनेही फोन किया था ... चली नट थट के.. बैठ ... " त्यावर तिचे एक्स्प्रेशन क्लिक करण्यासारखे होते. तिने रागाच्या भरात इतका जोरात टोचला की मी चार दिवस केकलत होतो. तिच्या रुममेट नं एकदा रुम साफ करण्यावरुन कशी भांडणं केली , कशी जेवण बनवण्यावरुन पेटली इत्यादी गोष्टींचे गार्‍हाणे ऐकण्याचं कामंही माझ्याकडे न विचारता आलं होतं. तसा मी तिच्याशी काही शेयर करायचो नाही , पण तिला सल्ले द्यायला , तिचं ऐकुन घ्यायला मला नाही म्हंटलं तरी बरं वाटायचं (चला कोणी तरी पोरगी तेवढा तरी भाव देतेय राव) नंतर मी जॉब सोडुन नविन जॉब पकडला. जॉब सोडला तेंव्हा काही कारणांवरुन बिनसलंच होतं. नंतर कधीतरी तिचा फोन आला. भेटलोही, गंधर्व मधे मस्त मसाला उत्तप्पा वगैरे खाल्ल्यावर जंगलीमहाराज रोडावर चालता चालता तिनं तिचे पर्सनल प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली , मी आपला नेहमीप्रमाणे ऐकत होतो. नंतर कधीतरी तिनं मला काही कारणांसाठी बोलावलं होतं , मी जायचा कंटाळा केल्यावर तिला त्याचा राग आला आणि आमचं बोलणं पुन्हा बंद झालं . हे सगळं नेहमीच अलिखीत घडायचं. त्यानंतर बराच काळ मी बोललो नाही. ती चॅट लिस्ट मधे ऑनलाईन दिसे पण कधी पिंग करावसं वाटायचं नाही. कधी वाटलंच तर चॅट विंडो ओपन करुन मेसेजही टाईप करायचो ... पण एंटर ऐवजी एस्केप वर बोटं टेकायची ... का ते माहित नाही पण मी कधीच तिला अ‍ॅप्रोच केलं नाही ना तिने मला ... कधी काळी तिचा "हाय" आला तर माझा इगो जागा होईन मी रिप्लाय केला नाही .... एखाद दिवशी मी चुकुन "कशी आहेस गं" विचारलं तर समोरुन बर्‍याच वेळानं "बिझि" एवढाच रिप्लाय यायचा... जवळपास ७-८ महिने लोटले. दरम्यानच्या काळात बोलु की नको बोलु की नको वर गाडी अटकायची .. आणि मी काही बोलायचो नाही. आज एक कुल जोक वाचला आणि लिस्ट मधल्या मित्रांना फॉरवर्ड करता करता तिला ही पाठवला . चटकन तिने रिप्लाय केला .. हाय हॅलो नंतर विचारपुस केल्यावर (तसेही एकमेकांचे अपडेट्स ह्याच्यात्याच्या मार्फत आपल्याला मिळतातंच, तेंव्हा त्यांना अपडेट्स म्हणावं का ? ) तिनं विचारलं " तुझी इच्छा असेल तर काही पेस्ट करु ? " , हो म्हणताच तिने काहीतरी शायरी पेस्ट केली ... नंतर एक छोटीशी कविता.... ओळींचा अर्थ चटकन लक्षात आला आणि हळवा झालो . भरभर जुण्या आठवणी काढल्या ... कितीकिती पेंडिंग गोष्टी होत्या.. आज बरं वाटलं बोलुन. कधी कधी आपण समोरच्या विषयी किती एकांगी विचार करतो , नाही ? बर्‍याचदा परिस्थिती काही वेगळीच असते. गैरसमज, स्वाभिमान, अहं, समोरच्याला गृहित धरणं ह्या मुळे जो "गुत्तुडा" होतो ना , तो एखाद्या वेळेस सोडवुन पहा ... फार बरं वाटतं !!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10728 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

आम्ही

शानबा५१२
Sun, 06/27/2010 - 23:27 नवीन
आम्ही आयुष्यात इतक्या वेळ(वर्ष) वाया घालवणा-या,प्रतिमा खराब करणा-या कामात खुप वाटोळ करुन घेतल आहे,आता हे त्यात भर नको व ज्ञानसाधनेत व्यतय नको म्हणुन अशा गोष्टींना लांबुनच रामराम करतो! ~X( पुरे पुरे शान्बा!! __________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

विबआ ________________

शानबा५१२
Sun, 06/27/2010 - 18:41 नवीन
विबआ ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा