Skip to main content

युगलगीत : अलवार गुपित उमगले प्रितीचे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 23/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत : अलवार गुपित उमगले प्रितीचे
ती : अलवार गुपित उमगले प्रितीचे माझ्या मनी आज मोर नाचे ||धृ|| ती : हळूच आज सांज फुलली नभानेही लाली ल्याली लकेर घेवूनी सुरांची सुस्वर ताला सुरांचे गीत मी गातसे ||१|| दोघे : अलवार गुपित उमगले प्रितीचे.... तो : दुरवर बघ त्या डोंगर रांगी खुणावीतसे तो रंगीत पक्षी बोलावी का तुला मला तो समजेल का कधी बोल त्याचे ||२|| दोघे : अलवार गुपित उमगले प्रितीचे.... ती : लहरून वारा मंद धुंदला अस्सा झोंबला अस्सा कुंदला लगडून जायी सार्‍या शरीरा सावरून घेई मला तुच आता जवळ ये ||३|| दोघे : अलवार गुपित उमगले प्रितीचे माझ्या मनी आज मोर नाचे ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०६/२०१०
काव्यरस

वाचने 1403
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान कविता. ते उगाच "तान, स्वर, आ आ आ" काढा बुआ. (पटले तर :-) ) अजुन छान वाटेल कविता ! स्मिता

In reply to by स्मिता_१३

भावना शब्दात बसल्या आहेत असे वाटते . पण ते "तान, स्वर, आ आ आ" काढा बुआ. (पटले तर )" :) मीनल. http://myurmee.blogspot.com/

खूपच सुंदर सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||