काल आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. फ्रीवेवर नेहेमीप्रमणे लहान स्कंक, रकून सारखे प्राणी मधे मधे दिसत होते चिरडले गेलेले. यावेळेला मुलगी बरोबर असल्याने माझ्यातल्या "आई"ने ज्ञान द्यायची संधी दवडली नाही.
मी मुलीकरता एक पुस्तक आणलय जे की तिने अजून वाचायचय पण मी वाचून संपवलय.
त्या पुस्तकात- एका कुटुंबानी एक सोनेरी गरुडाचं पिल्लू पाळलेलं होतं आणि त्यांच्यापुढे समस्या ही होती की या पिल्लाला खायला काय घालायचं? कारण शिजवलेली कोंबडी, सॉसेज, मटण वगैरे खाऊन आठवड्या दोन आठवड्यात हे शिकारी पक्षी मरतात. या पक्षांकरता आख्खा उंदीर, रकून, स्कंक, खार, कोंबडी वगैरे असं खाद्य लागतं. गरूड, घार, घुबड वगैरे पक्षी हे खाद्य खातात आणि रोज सकाळी पेलेट्स (http://en.wikipedia.org/wiki/Pellet_(ornithology)) म्हणजे लंबगोल पिसं, हाडांचे गोळे बाहेर टाकतात. त्यानी त्यांची पचन यंत्रणा साफ रहाते.
मग हे कुटुंब काय करायचं रोज सकाळी असं कारमधून रपेट मारायला बाहेर पडायचं आणि वाटेत येणारे रोडकिल (रस्त्यावर गाडीखाली आलेले प्राणी) उचलत जायचं. ते रोडकिल त्या गरुडाच्या पिल्लाला खायला घालायचं.
मी हे सगळं माझ्या ४ थी तल्या मुलीला मोठ्या उत्साहानी सांगीतलं आणि आश्चर्य म्हणजे ते तिला आधीच माहीत होतं. तिने ३रीमधे शाळेत घुबडाच्या पेलेटसची चिरफाड केली होती. त्यात उंदराच्या पिल्लाची कवटी पाहीली होती. तिने माहीती पुरवली की पेलेटस हे गोल नसून लंबगोल असतात.
मला खूप बरं वाटलं की इथे मुलांना लहानपणापासून बर्याच गोष्टी हाताळायला देतात, त्यांची किळस दूर करतात किंबहुना निर्माणच होऊ देत नाहीत., शास्त्रीय दृष्टीकोन जोपासतात.
याच सुंदर फेरफटक्यामधे माझ्या मुलीनी मला अजून एक गंमतीशीर माहीती सांगीतली - एक पाल असते तिला "जिजझ लिझर्ड" म्हणतात. का तर ती पाण्यावर चालते : )
वाचन संख्या
5863
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऐकावे ते नवल
नजर
आपल्याला
In reply to नजर by गणपा
अहो शुचि
In reply to आपल्याला by शुचि
खरं आहे.
In reply to अहो शुचि by गणपा
किळस
In reply to आपल्याला by शुचि
दे टाळी!
In reply to किळस by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या
In reply to दे टाळी! by प्रियाली
हॅहॅहॅ!!!
In reply to दे टाळी! by प्रियाली
आणि अजूनही तसाच आहे ना रे म्हणे? ;)
In reply to हॅहॅहॅ!!! by बिपिन कार्यकर्ते
हो , तुम्ही
In reply to हॅहॅहॅ!!! by बिपिन कार्यकर्ते
अरे आमच्याही
In reply to हॅहॅहॅ!!! by बिपिन कार्यकर्ते
>> या
In reply to किळस by ३_१४ विक्षिप्त अदिती
"फायटिंग विथ गॉड"
In reply to किळस by ३_१४ विक्षिप्त अदिती
अंशतः असहमत
In reply to "फायटिंग विथ गॉड" by पंगा
असो, पण...
In reply to अंशतः असहमत by मुक्तसुनीत
असोच , पण ..
In reply to असो, पण... by पंगा
http://misalpav.com/node/1269
In reply to असोच , पण .. by मुक्तसुनीत
धन्यवाद
In reply to http://misalpav.com/node/1269 by शुचि
उत्तराचा (अखेरचा) प्रयत्न
In reply to असोच , पण .. by मुक्तसुनीत
पंगा
In reply to उत्तराचा (अखेरचा) प्रयत्न by पंगा
हल्ली भाजी
In reply to पंगा by Pain
बिपिन कार्यकर्ते
In reply to हल्ली भाजी by बिपिन कार्यकर्ते
>>भाजी
In reply to बिपिन कार्यकर्ते by Pain
मला तर
In reply to >>भाजी by शुचि
नाही
In reply to मला तर by टारझन
असो ,
In reply to नाही by शुचि
या आणि
In reply to बिपिन कार्यकर्ते by Pain
भाजी खरेदी
In reply to बिपिन कार्यकर्ते by Pain
>>मी एक
In reply to भाजी खरेदी by बिपिन कार्यकर्ते
भाजी खरेदी
In reply to भाजी खरेदी by बिपिन कार्यकर्ते
घ्या!
>>कुणाचे
In reply to घ्या! by धमाल मुलगा
शुचि
खरय.
In reply to शुचि by Pain
भयंकर
ओह जिजझ
मस्त
In reply to ओह जिजझ by सहज
साला एखादा
In reply to ओह जिजझ by सहज