भेजा फ्राय

गणपा's picture
गणपा in पाककृती
18 Jun 2010 - 2:52 pm

नमस्कार मंडळी,
काल चा उपवास सुटला की नाही? आज शुक्रवार म्हणजे आज नॉनव्हेजला मरण नाही. तस मी वार वगैरे पाळतो (एक संकष्टी सोडुन) अश्यातला भाग नाही. पण कायेना की आपल्याकडे काही अंधश्रद्धा आहेत;) की अमुक वारी मांसाहार करु नये.
मी लहान असताना, आमच्या घरी सोम, मंगळ, गुरु, शनी हे मोळे/उपवासाचे वार. आणि जर का एखाद्या महिन्यात संकष्टी रैवारी आली मी मी खुप कष्टी होत असे. मग काय, माझ्या सारख्या पट्टीच्या मांसाहार्‍याला चार सलग दिवस मोळं खायच म्हणजे काय खायचा काम नाय.
लहान असताना मला भेजा मुळीच आवडायचा नाही, पण आमची तै मिटक्या मारुन खायची तिची देखादेखी मी पण थोडाफार भेजा खाऊ लागलो.
पण बहीणीचे हे गुण सध्या तिच्या भाचीने पुरे पुर उचलले. :)

असो तर सांगायचा मुद्दा काय की आज शुक्रवार म्हणजे आज निदान बघायला हरकर नसावी. ;)

साहित्यः

१ मध्यम कांदा बारीक चौकोनी कापुन.
१ चमचा आल लसुण पेस्ट.
१ टॉमेटो बारीक चिरलेला.
१-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
१/२ चमचा हळद.
१ चमचा मसाला.
१ चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा जीरे पुड.
१ लहान चमचा काळीमीरी पुड.
तेल.
मीठ चवीनुसार.
१-२ भेजे (बकर्‍याचे)
कृती:

भेज्यांना थोडी हळद आललसुण पेस्ट आणि मीठ लावुन ठेवाव.

तेलावर मीरची, कांदा परतुन घ्यावा.

कांदा गुलाबी झाल्यावर त्यात बाकीचे मसाले टाकुन एक मिनिट परतुन घावं.


बाजुने तेल सुटु लागल्यावर त्यात टॉमेटो टाकुन १-२ मिनिट परताव आणि मग भेजा टाकुन कलथ्याने त्याचे तुकडे करावे.
५-१० मिनिट मध्यम आचेवर झाकण लावुन शिजु द्यावं

अश्या ह्या भेज्या बरोबर गरमा गरम भाकरी मिळाली तर काय बहार येते नाही .

या तर मग भाकर तुकडा तोडायला. :)

प्रतिक्रिया

नरेन's picture

18 Jun 2010 - 2:58 pm | नरेन

का रे बाबा असा आमचा भेजा खातोस?

आंबोळी's picture

18 Jun 2010 - 3:04 pm | आंबोळी

आरे आज काय चाललय काय? तिकडे तो जागु चिवनी खायला बोलावतोय हा गणप्या भेजा हाणायला या म्हणतोय.....
च्यायला जेवण झालय तरी पोटात खड्डा पडला राव.

आंबोळी

श्रावण मोडक's picture

18 Jun 2010 - 3:13 pm | श्रावण मोडक

याला कोपच्यात घ्या रे. साला, डोकं उठवतोय. एक तर कामात बुडालोय. सहज पाच मिनिटांसाठी यावं इथं तर भेजाफ्राय!!!

विंजिनेर's picture

18 Jun 2010 - 3:30 pm | विंजिनेर

लई हाना त्येला... ... भरित काय, भेजा-फ्राय काय.

श्रामो कामात असणार | घाई-घाईत मिपावर येणार |
गणपाचा भेजाफ्राय बघणार | चिडचिड होणार निश्चित ॥

श्रावण मोडक's picture

18 Jun 2010 - 3:38 pm | श्रावण मोडक

काव्यपंक्ती भारी.

जागु's picture

18 Jun 2010 - 3:35 pm | जागु

लय भारी.

टुकुल's picture

18 Jun 2010 - 3:51 pm | टुकुल

गणपा, डोक्याचा भेजा फ्राय झाला पण खाता येत नाही आहे :-)

--टुकुल

वाहीदा's picture

18 Jun 2010 - 4:13 pm | वाहीदा

त्या जागू ताई अन गणपाच्या पाकृ वाचून वाचून आमचा भेजा खरोखरोच फ्राय झालाय
मला स्वतःला भेजा आवडत नाही
पण तुमच्या वर अन त्या जागू वर तर साक्षात अन्नपुर्णा देवी प्रसन्न दिसते मग कधी ना कधी तुम्ही दाखवलेली पाकृ नक्कीच करणार
न करून सांगतो कोणाला...
~ वाहीदा
most obviously influenced by the Great chef Ganapa and Jagu

आयला खरय राव तिकड जागु तै इकड गनादादा.......आम्चा भेजा काय काम करना

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

विसुनाना's picture

18 Jun 2010 - 5:25 pm | विसुनाना

(बोकडाच्या)मेंदूचे भरीत...;)

(आमच्या गावाकडे 'मुंडी' डायरेक्ट चुलीत भाजतात. तो कोणता पदार्थ आहे? केस जळाल्याचा उग्र वास सुटतो. त्यामुळे बनवताना जवळ थांबणे शक्य होत नाही.)

श्रावण मोडक's picture

18 Jun 2010 - 5:50 pm | श्रावण मोडक

कोल्लापूर का? मुंडी हा पदार्थ, त्याचा रस्सा... अर्रारारारारा... उगाच आठवण काढली असं झालं पहा...

ऋषिकेश's picture

18 Jun 2010 - 5:41 pm | ऋषिकेश

पाककृतीत दिलेले इतके कष्ट करण्याची गरज नाहि.
नवी पाककृती:
१. गणपा यांनी दिलेली वरील पाककृती भुकेल्या पोटी वाचा
२. भेजा फ्राय तयार

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

शानबा५१२'s picture

18 Jun 2010 - 7:34 pm | शानबा५१२

माझा तर आपली प्रतिक्रीया वाचुन पण झाला :D :D

पण जाम पकाउ होता हो................जरा बदल :D करता येतो का बघा!

शानबा५१२'s picture

18 Jun 2010 - 7:36 pm | शानबा५१२

हा माझ्या duniyadari.webs.com ची जाहीरात करा..........बोली कसली मागताय????

भेजा फ्राय भेटल ना??

प्रभो's picture

18 Jun 2010 - 6:53 pm | प्रभो

लै भारी रे.....आता खीमा पाव येऊ दे... :)

संदीप चित्रे's picture

18 Jun 2010 - 8:05 pm | संदीप चित्रे

आता पुढच्या वेळेला कलेजी-भेजा एकत्र हे काँबिनेशन करून बघ !
ख-त्त-र-ना-क !

विसोबा खेचर's picture

18 Jun 2010 - 9:01 pm | विसोबा खेचर

शब्दच संपले..!

(गणपाचा प्रेमी) तात्या.