नमस्कार मंडळी,
काल चा उपवास सुटला की नाही? आज शुक्रवार म्हणजे आज नॉनव्हेजला मरण नाही. तस मी वार वगैरे पाळतो (एक संकष्टी सोडुन) अश्यातला भाग नाही. पण कायेना की आपल्याकडे काही अंधश्रद्धा आहेत;) की अमुक वारी मांसाहार करु नये.
मी लहान असताना, आमच्या घरी सोम, मंगळ, गुरु, शनी हे मोळे/उपवासाचे वार. आणि जर का एखाद्या महिन्यात संकष्टी रैवारी आली मी मी खुप कष्टी होत असे. मग काय, माझ्या सारख्या पट्टीच्या मांसाहार्याला चार सलग दिवस मोळं खायच म्हणजे काय खायचा काम नाय.
लहान असताना मला भेजा मुळीच आवडायचा नाही, पण आमची तै मिटक्या मारुन खायची तिची देखादेखी मी पण थोडाफार भेजा खाऊ लागलो.
पण बहीणीचे हे गुण सध्या तिच्या भाचीने पुरे पुर उचलले. :)
असो तर सांगायचा मुद्दा काय की आज शुक्रवार म्हणजे आज निदान बघायला हरकर नसावी. ;)
साहित्यः
१ मध्यम कांदा बारीक चौकोनी कापुन.
१ चमचा आल लसुण पेस्ट.
१ टॉमेटो बारीक चिरलेला.
१-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
१/२ चमचा हळद.
१ चमचा मसाला.
१ चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा जीरे पुड.
१ लहान चमचा काळीमीरी पुड.
तेल.
मीठ चवीनुसार.
१-२ भेजे (बकर्याचे)
कृती:
भेज्यांना थोडी हळद आललसुण पेस्ट आणि मीठ लावुन ठेवाव.
तेलावर मीरची, कांदा परतुन घ्यावा.
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात बाकीचे मसाले टाकुन एक मिनिट परतुन घावं.
बाजुने तेल सुटु लागल्यावर त्यात टॉमेटो टाकुन १-२ मिनिट परताव आणि मग भेजा टाकुन कलथ्याने त्याचे तुकडे करावे.
५-१० मिनिट मध्यम आचेवर झाकण लावुन शिजु द्यावं
अश्या ह्या भेज्या बरोबर गरमा गरम भाकरी मिळाली तर काय बहार येते नाही .
या तर मग भाकर तुकडा तोडायला. :)
वाचने
10079
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
भेजा
जबरदस्त!!
याला
+१
In reply to याला by श्रावण मोडक
हाहाहाहा
In reply to +१ by विंजिनेर
लय भारी.
गणपा,
आता हेच बाकी होते
क्या बात? क्या बात? क्या बात?
मेंदूचे भरीत
कोल्लापूर
In reply to मेंदूचे भरीत by विसुनाना
का रे असं करतोस!
माझा तर
In reply to का रे असं करतोस! by ऋषिकेश
माझा तर
In reply to का रे असं करतोस! by ऋषिकेश
लै भारी
#*%@#*%&
शब्दच