Skip to main content

गीत: गरमी चा आलाय उन्हाळा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/06/2010 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
गरमी चा आलाय उन्हाळा
गरमी चा आलाय उन्हाळा उन काय सोसवेना तगमगीची काहीली आली उपाय काही तरी करा ना || गारगार वारं अंगाला नाही लागत आता घामाच्या धारा सुटल्यात जीव घाबरा होई निसता उगाच बोलन्यापरीस पंख्याची हवा मला घाला ना || आंबट चिंबट खाऊ वाटते पन रानात एकटी जावून करवंद, जांभळं, आंबा अन कैर्‍या पाडायची भिती मला वाटते रानचा रानमेवा लुटायला सोबतीला बरोबर तुम्ही या ना || - पाषाणभेद (दगडफोड्या) १७/०६/२०१०

वाचने 1535
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया