सुकं मटण / (व्हेज व्हर्जन)

Primary tabs

गणपा's picture
गणपा in पाककृती
15 Jun 2010 - 10:34 am

गेल्या महिन्यात छोट्याश्या सुट्टीत घरी जाउन आलो. नेहमी जायच्या आधी माझं आणि बहीणचही आठवडाभर प्लॅनिंग असत की आईच्या हातच काय काय खाउन घ्यायच. शक्यतो इथे परदेशात न मिळणारे मासे आणि भाज्या. (शक्यतो मासेच. कोंबडी / मटण टाळतो , ते काय इथेही खातोच नेहमी)
वर्षभर वजन कमी करण्याचे प्रयत्न करणारे आम्ही दर सुट्टीत हटकुन १-२ किलो वजन वाढवुन येतो.
यावेळी काही दिवस गावालाही जायला मिळाल. तिकडे बोंबील, निवट्या, घोळीच/दाढ्याचं खार(काटा), काटेरी, पापलेटं मनसोक्त खाल्ले.

दोन दिवस सासुरवाडीला ही भेट देउन आलो. आमच्याकडे एक आहे की पाहुणा आला (आणि त्यात तो जावई असला) की त्याला कोंबडी /मटण खाउ घातल्या शिवाय पाहुणाचार झाला अस मानत नाहीत. त्यामुळे नको नको म्हणता नाही सासर्‍यांनी मटण आणलच. आणि मग सासुबाईंनी जे सुक्क मटण बनवल होत त्याला तोड नव्हती. (मनातल्या मनात सासर्‍यांचे आभार मानले , अहो नाय तर काय जावयाचा आग्रह म्हणुन त्यांनी मटण नसत आणल तर :) ) हात धुता धुताच आईंना कृती विचारुन घेतली.

मागे एकदा मी सुक्या मटनाची कृती इथे दिली होती ती आमची आई करते तशी, तर आजची ही माझ्या सासुबाईंची कृती.

साहित्य :


१ छोटा चमचा हळद.
२ चमचे मसाला (वाडवळी/मालवणी)
२ चमचे हिरव वाटण. (आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर)
१ १/५ चमचा गरम मसाला
१ चमचा जिरे पुड (भाजलेली)


१ मोठा कांदा पातळ उभा चिरुन.
२ लहान बाटाटे साला सकट गोल फोडी करुन.
२ मोठे चमचे सुक खोबर किसुन. (किसायचा कंटाळा आल्यास १/३ वाटी खोबर आगीवर भाजुन घ्याव आणि मग ठेचुन घ्याव. याने अजुन लज्जत वाढते. )


१/२ किलो कोवळ मटण.
२ चमचे लिंबाचा रस.
तेल, मिठ चवी नुसार

कृती :


फ्राईंग पॅनमध्ये कापलेला अर्धा कांदा आणि खोबर तेल न टाकता परतुन घ्याव. कांदा पारदर्शी झाल्यावर गार करुन बारीक वाटुन घ्याव.


मटण स्वच्छ धुवुन त्याला वरील सर्व मसाले, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ लावुन चांगले मिक्स कराव.


मग त्यात कांद्याखोबर्‍याच वाटण आणि १ मोठा चमचा तेल टाकुन किमान २ तास मुरत ठेवाव.


फ्राईंग पॅनमध्ये थोड्या तेलावर उरलेला अर्धा कांदा गुलाबी रंगावर परतुन घ्यावा.


त्यात मुरवलेल मटण टाकाव. पाणी अजीबात टाकु नये.


त्यात बटाट्याचे काप घालावे. आणि वर झाकण लावुन (झाकाणावर पाणी ठेवाव) आच मंद ते मध्यम ठेवावी.


मटण शिजायला वेळ लागतो त्यामुळे किमान ३०-४० मिनिटे शिजु द्यावे. त्या दरम्यान बाटाटा पण एकदम मस्त मऊ होतो. (फुटला तरी उत्तम)


मुख्य जेवणात तांदळाची भाकरी जर जोडीला असली तर उत्तमच.

पण सोबतीला २-४ मित्र आहेत, समोर बियरचे मग फेसाळलेले आहेत सोबतीला हा चखणा आणि टिव्हिवर जर्मनी आणि फ्रांस विश्वचषकासाठी झुंजतायत.... आहा हा हा स्वर्ग स्वर्ग म्हाणातात तो हाच आसावा ;)

***************************************************************************
मटणाला पर्याय :
ज्यांना मटण आवडत नाही किंवा चांगल मटण मिळण कठीण आहे त्यांना चिकन वापरुन हिच कृती करता येईल.
चिकनला शिजायला मटणापेक्षा कमी वेळ लागतो, १५ मिनिटं पुरेशी होतात. त्यामुळे आधी कांद्यावर बटाटा शिजवुन घ्यावा, आणि मगच चिकन टाकाव.

***************************************************************************

व्हेज व्हर्जन :

मटणाला पर्याय म्हणुन व्हेज प्रेमिंना सोयाबीन चे तुकडे वापरायला हरकत नाही. सोयाबीन चे तुकडे आदल्या रात्री पाण्यात भीजत ठेवावे.
दुसर्‍या दिवशी हाताने प्रत्येक तुकडा दाबुन पाणी काढुन टाकावे.
सोयाबीन शिजायला मटणा एवढा वेळ लागत नाही,. त्यामुळे आधी कांद्यावर बटाटा शिजवुन घ्यावा, आणि मगच,सोयाबीनचे तुकडे टाकावे.

सोयाबीन इतक फक्कड लागत की मी लहान असतान चक्क फसलो होतो.

प्रतिक्रिया

वेताळ's picture

15 Jun 2010 - 10:42 am | वेताळ

X(
कुठे फेडशील हे पाप.......

वेताळ

आंबोळी's picture

15 Jun 2010 - 11:25 am | आंबोळी

हलकट साला... कुठे फेडशील ही पाप....

असेच म्हणतोय.....
आरे ह्या गणप्याला आवरा रे.... माणसाच्या कोळसा होण्यालाही काही लिमिट असते.....

आंबोळी

सहज's picture

15 Jun 2010 - 11:02 am | सहज

आपल्या पादुका किंवा पायांचा एक फोटू कृपया पाठवावा.

धन्य धन्य!

ब़जरबट्टू's picture

18 Jun 2014 - 10:30 am | ब़जरबट्टू

त्या पादुकांना पण आतापर्यंतच्या प्रयोगामुळे खमंग मसाले लागले असतील व सुगंध आला असेल.. ना जाणे त्यावरच तुटून पडायचो.... :)

बाकी पाकु जबर्‍याच....

महेश हतोळकर's picture

15 Jun 2010 - 11:04 am | महेश हतोळकर

=P~

शानबा५१२'s picture

15 Jun 2010 - 11:23 am | शानबा५१२

आपल्या नावाची पाकक्रुती म्हणजे आकर्षक फोटो व लज्जतदार पदार्थे.
'केळ फुलचे कबाब' करुन बघितले छान झाले होते,पण पाच डाळी वापरुन केलेले 'पंचरत्न वडे' करुन बघा कधीतरी भन्नाट लागतात.

आणि ह्या वरच्या पाकक्रुतीबद्दल काय बोलणार.........बोलती बंद!!!!

फोटो तर फार निर्दयी आहेत!!

विसोबा खेचर's picture

15 Jun 2010 - 11:25 am | विसोबा खेचर

नि:शब्द...!

टारझन's picture

15 Jun 2010 - 10:24 pm | टारझन

मृत्युदाता ...!

खादाड's picture

15 Jun 2010 - 12:07 pm | खादाड

बर्‍याच दिवसांनी गणपाची पा.क्रु .पाहुन वाचुन छान वाट्ल ! मस्तच आहे!! पण बटाटा कशाला घातला ? :?

जागु's picture

15 Jun 2010 - 1:19 pm | जागु

गणपा खुप छान वाटली पाकृ आणि फोटो.
असेच सासरी जात जा आणि आम्हाला छान छान रेसिपी फोटो सकट द्या.

टुकुल's picture

15 Jun 2010 - 1:23 pm | टुकुल

छान लेखन ;-)

--टुकुल

jaypal's picture

15 Jun 2010 - 6:25 pm | jaypal

व्हेज मधे मला वाटत सुरण देखिल चांगले लागेल.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

स्वप्निल..'s picture

15 Jun 2010 - 6:29 pm | स्वप्निल..

=P~

प्रभो's picture

15 Jun 2010 - 6:34 pm | प्रभो

तू किचनसुट्टीवर होतास तेच बरं होतं रे बाबा!!!

अविनाशकुलकर्णी's picture

15 Jun 2010 - 6:36 pm | अविनाशकुलकर्णी

गणपांना साक्षात अन्नपुर्णेचा आशिर्वाद आहे..मस्त

धमाल मुलगा's picture

15 Jun 2010 - 6:57 pm | धमाल मुलगा

गणपा कपूर + गणपा राजाध्यक्ष ब्याक इन अ‍ॅक्शन आलेले पाहुन 'आनंदीआनंद गडे' झाला. :)

लय भारी रे.. रेशीपी खल्लासच आहे...आता ही रेशीपी वाचुन त्याबरहुकुम रांधून कोण खाऊ घालेल ह्याचा विचार करतोय. :D

संदीप चित्रे's picture

15 Jun 2010 - 7:04 pm | संदीप चित्रे

हे फोटो आणि रेसिपी पाहिलीच नसल्याने प्रतिक्रिया द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

लय दिवसांनी येऊन गणपाचा मिपावर गोंधळ आणी गोंधळाला सुकं मटण.... !!!!!! घसा कोरडा पडला एकदम !!!!!!
जय हो ! गणपाजीकी !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2010 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

चतुरंग's picture

15 Jun 2010 - 7:55 pm | चतुरंग

व्हेज वर्जन दिलीस त्यामुळे एकदम दिलखूष!! :)
(सोयाबीनचे तुकडे (टोफू) मला आवडतील की नाही शंका वाटते - पनीर चालू शकेल असे वाटते. ट्राय मारुन बघेन.)

चतुरंग

गणपा's picture

15 Jun 2010 - 8:07 pm | गणपा

रंगाशेठ अहो मी म्हणतोय ते सोयाबीन म्हणजे टोफु नव्हे.

या बद्दल म्हणतोय मी

चतुरंग's picture

15 Jun 2010 - 8:19 pm | चतुरंग

हा प्रकार वेगळाच दिसतोय. हा प्रकार करुन बघेन.
धन्यवाद! :)

(आयर्न शेफ गणपाचा फ्यान)चतुरंग

रामदास's picture

16 Jun 2010 - 8:23 am | रामदास

बघा ,बघा.
सकाळच्या चहापासून किचन तुमच्या ताब्यात असतंच की !!!!

धमाल मुलगा's picture

16 Jun 2010 - 1:28 pm | धमाल मुलगा

मुनीवर्य लै बारीक टाकतात...पण खत्रा टाकतात :D

चतुरंग's picture

16 Jun 2010 - 6:53 pm | चतुरंग

अहो तुमच्या असल्या कामेंट्सनी आमची अन्नपूर्णा आमच्यावर नाराज झाली तर आमचे जेवणाचे वांधे होतील हो! :(

(ओट्याखालचं मांजर)चतुरंग

पंगा's picture

15 Jun 2010 - 8:24 pm | पंगा

शीर्षकातील 'व्हेज व्हर्जन' हे शब्द कंसात लिहिण्यातील सूचकतेला प्रणाम.

- पंडित गागाभट्ट.

अश्विनीका's picture

15 Jun 2010 - 9:53 pm | अश्विनीका

मस्त रेसिपी.
व्हेज वर्जन मधे सोयाबीन चे तुकडे घालण्याची कल्पना मस्तच.
असं आधी खाल्लेले आहे. आणि मसाल्यात मिक्स झालेला सोयाबीन मटणासारखाच वाटतो. पटकन कळून येत नाही की नॉनव्हेज नाहिये ते.
- अश्विनी

शुचि's picture

15 Jun 2010 - 10:25 pm | शुचि

कोवळ्या लुसलुशीत मटणाला कमीत कमी मसाला लावून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे गपाटायला कोणतं व्रत करावं लागतं? :(

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मीनल's picture

16 Jun 2010 - 2:13 am | मीनल

मस्त फोटो ... इंनव्हाटिंग आहेत... खानेकु और बनानेकु
सॉलिड !!!

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

आशिष सुर्वे's picture

16 Jun 2010 - 2:34 am | आशिष सुर्वे

गणपा ओगा, येलकम बॅक..
आपलीच वाट पहात होतो!!
अन् हे रे काय? आल्याआल्या षटकार!!

बाकी तू सर्वांना सांभाळून घेतोस बर्र का.. जबरहा मांसाहारी पाकृ टाकतोस, मग शाकाहारी जनांचा रोष नको म्हणून पर्यायी तळटीपही देतोस!! व्वा!! मानला भाऔ आपल्याला!!

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

विमुक्त's picture

16 Jun 2010 - 1:17 pm | विमुक्त

पोटभर जेवल्यावर वाचलं तरी पाणी सुटलं तोंडाला...

गणपा's picture

16 Jun 2010 - 1:41 pm | गणपा

समस्त खवय्यांचे तहे दिलसे आभार :)

दिपाली पाटिल's picture

16 Jun 2010 - 10:32 pm | दिपाली पाटिल

एकदम खतरी दिसतंय मटण...

दिपाली :)

बच्चाभी खूश, बच्चेका बाबाभी खूश ...

समस्त बाबा कंपनीला आणी भावी बाबांना 'बाबा'दिवसाच्या शुभेच्छा...

:)

श्रावण मोडक's picture

20 Jun 2010 - 11:37 pm | श्रावण मोडक

हा धागा का वर काढलास? निषेध, निषेध, कडक निषेध!!!

लवंगी's picture

20 Jun 2010 - 11:40 pm | लवंगी

:)

श्रावण मोडक's picture

20 Jun 2010 - 11:50 pm | श्रावण मोडक

X( ~X(

रश्मि१२३'s picture

21 Jun 2010 - 10:42 pm | रश्मि१२३

मी ही कृती जशि च्या तशी करण्या चा प्रयत्न केला . पण ३०/४० मिनिटात ..शिजलेच नाही मटन .मग कंटाळुन अगदि कमी पाणी घालुन शिट्टा दिल्या. तसे ही मस्त झाले पण फोटो सारखे नाही झाले.
आणि मटन ही कोवळेच होते . काय चुक झाली असेल बरे ?? जरा लवकर सांगा.

चाणक्य's picture

15 Jun 2014 - 4:40 pm | चाणक्य

गणपाशेठ, मागच्या विकांताला तुमचा हा पदार्थ (घरी चालत नसल्याने व्हेज व्हर्जन) करून बघितला. आवडला. धन्यवाद

वीणा's picture

17 Jun 2014 - 1:36 am | वीणा

आई ग :(…. भूक लागली :( :( कुठल्याच लेखावर प्रतिसाद द्यायला सहसा जमत नाही, पण खरंच राहवलं नाही. अप्रतिम पाककृती आणि सादरीकरण

अवांतर : तुम्ही कुकिंग चे क्लासेस तर चालू कराच पण प्लीज त्याबरोबर कांदा कापायचे क्लासेस घ्या हो ?

मुक्त विहारि's picture

17 Jun 2014 - 9:38 am | मुक्त विहारि

झक्कास

अजो's picture

17 Jun 2014 - 3:42 pm | अजो

मस्त

म्हैस's picture

17 Jun 2014 - 4:42 pm | म्हैस

कोवळं मटन ? त्या कोवळ्या जीवाला किती वेदना होत असतील ? :-(

समीरसूर's picture

18 Jun 2014 - 11:13 am | समीरसूर

कृती, फोटो, शैली, आणि मटण सगळेच शब्दांच्या पलिकडले आहे. ही कृती अनुभवतांना अप्रतिम, सुरेख, तोंडाला पाणी सुटले वगैरे सामान्य शब्द पूनम पांडेच्या (किंवा शेरलीन चोप्राच्या) कपड्यांपेक्षाही कैक पटीने जास्त तोकडे पडतील. शेवटचे चार फोटो हे कुठल्याही देवदेवतांच्या फोटोंपेक्षाही अधिक पुण्य आणि मोक्षानंद देणारे आहेत यात कुठलीच शंका नाही. 'एकतरी कृती अनुभवावी' या तोडीची ही कृती आहे. माझ्या समोर कुणी कितीही उत्तम पदार्थ खात असला तरीही मला सहसा मोह होत नाही. माझे मित्र मिसळ, समोसा चाट, गरमागरम पुरी भाजी, झणझणीत अंडाकरी, नजरबंदी करणारा जबराट चिकन मसाला, नियत बिघडवणारा पापलेट फ्राय इत्यादी पुण्यकारक पदार्थ चापत असतांना मी शांतपणे फक्त गप्पा मारत असतो. शप्पथ सांगतो, माझ्या मनात जराशीही चलबिचल होत नाही. म्हणजे हे सगळं मी खात नाही असं अजिबात नाही; पण मी शक्यतो दोन जेवणांव्यतिरिक्त बाकी वेळेत काही खात नाही. हे मी सगळं फक्त जेवणात खाऊ शकतो. बाकी चाटसारखे पदार्थ जेवणात खाण्याच्या संधी नसल्याने असे पदार्थ फार क्वचित खाल्ले जातात. इतर वेळेस मित्र, सहकारी हे सगळं माझ्या समोर खात असतात. पण मला बहुधा कधीच मोह झाल्याचे स्मरत नाही. आज दिल ने और इस पापी पेट ने धोखा दे दिया! शेवटचे चार फोटो बघून हृदयात कालवाकालव झाली. फारा वर्षांपूर्वी दौंडला एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. त्याच्या आईने असेच सुक्के चिकन पकवले होते. भूतकाळ आणि भविष्यकाळ विसरून केवळ वर्तमानकाळात जगणे काय असते हे त्यादिवशी अनुभवले. अप्रतिम सुक्के चिकन! सोबत चिकन मसाला, तांदळाची भाकरी, साधा भात, कच्चा कांदा, लिंबू!!! चार-पाच भाकरी कुस्करून कुस्करून खाल्ल्या. जवळपास अर्धा किलो चिकन मी एकट्याने फस्त केले असेल. घासागणिक पोट माझ्या मनाला आणि बुद्धीला भरभरून आशीर्वाद देत होते. शरीर, मन, आणि बुद्धीचा इतका सुंदर मिलाफ फार क्वचित घडतो. आणि ज्यावेळेस तो घडतो तो आयुष्यातला सर्वोच्च आनंद देणारा क्षण असतो. जेवणानंतर आम्ही बाहेर जाऊन पान जमवले आणि तरंगत तरंगतच स्टेशनवर गेलो. क्या बात! आठवणींनीच सरसरून काटा आला अंगावर.

त्या काट्याची थोडीशी अनुभूती या कृतीतले फोटो पाहून मिळाली. धन्य ते मटण, धन्य तुमच्या सासूबाई, आणि धन्य तुम्ही!!! असेच परमोच्च सुखाचे क्षण तुमच्या आयुष्यात नेहमी येत राहोत ही सदिच्छा!

बाकी तुमचे ते २-४ मित्र आहेत आणि पुढचे वर्णन लाजवाब! माझ्या बाबतीत एक दुरुस्ती, टीव्ही नकोच! फक्त गप्पा, गजला, आणि गाणी!

शाम ढलती जाये अपनी मस्ती में, रात की प्यास में
महफिले लुटाते जायें हम, आब-ए-हयात की आस में

असा माहौल जमल्यानंतर असे सुक्के मटण समोर असणे म्हणजे त्या क्षणांचे सोनेरी होऊन जाणे! स्मृतीच्या खजिन्यामध्ये काही जरतारी क्षणांची भर पडणे...वा वा वा..मझा आ गया...