Skip to main content

चेहरा

लेखक सुवर्णमयी यांनी शुक्रवार, 28/03/2008 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता मुद्दाम आठवांना सांभाळले कितीदा जाई होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा)
लेखनविषय:

वाचने 2133
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया