प्रतिक्षा ? ? ?
प्रतिक्षा ? ? ?
निद्रेच्या अधिनस्तहि उगडेच असतात नेत्र,
परतीच्या प्रतिक्षेत तुझ्या.
न जाणो मिटले ते अन…..
अवतरली तू अवचित…….. .? ? ? ?
आजही स्मरतात ते दिवस .......
धुंद ! धुंद ! !
पुनवेच्या चांदण्यांत,
मोकळ्या केशसंभारांत,
निरागस उभी तू.
मला वाटले,
चंद्रमाच झाला लुप्त धरणीवर,
काळ्या मेघाआड.
पुन्हा बहरला तोच वसंत,
तारकांची धुंद बरसात,
आसमंती तोच मंद वारा,
? ? ? ?
निरर्थक,
तुजवीण ........
तुझ्या आठवणीच्या वाती,
अजूनही तेवती उरी,
आसवांच्या दीपांनी,
नयनांच्या ज्योती घेऊन
या देहीं पुन्हा भेटावीस तू एकदा
ना तरी सरणावरहि
राहतील नेत्र पुन्हा उघडेच माझे
तुझ्या परतीच्या वाटेवर
प्रतिक्षा करीत ! ! !
निरंजन वहाळेकर
लेखनविषय:
याद्या
2300
प्रतिक्रिया
9
काव्यरस
मिसळपाव
तुमच्या
+१
In reply to तुमच्या by sur_nair
असेल ही तस !
मनःपूर्वक आभार ! ! !
जन्म-मृत्य
In reply to मनःपूर्वक आभार ! ! ! by निरन्जन वहालेकर
नक्कीच जमेल ! ! !
In reply to जन्म-मृत्य by राघव
अरेरे...
छान
प्रतिक्रियेसाठी मनस्वी आभार !
In reply to छान by पक्या