Skip to main content

(मृगजळ) रेव पार्टीचे गाणे

लेखक अडगळ यांनी मंगळवार, 18/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शैलेंद्र यांची क्षमा मागून,(http://www.misalpav.com/node/12362) ढिनच्याक ढिनच्याक नाचू निरन्तर , हलवू कंबर आपुली आज, जवळ येऊनी , दूर जाऊनी , घेऊ गिरकी झिंग खलास हाडे वाकवुनि विशालकोनी , जनामनाची सोडुन लाज, व्युत्क्रमकोनी बोंबा ठोकू , चरसी सारे त्रिभुवन आज कशी बंधने हलकी झाली , वार्‍यावरती कपडे फिरती, नजरेला ज्या टोचत होत्या , सर्व अचानक गाठी सुटती, नसता गुंता ओढाताण , स्कर्ट पांढरा कृष्ण तुमान , तुला दिसावे मला दिसावे , आज मोकळे सारे रान. नांगर फिरला सार्‍यावरती , अनाम लाठी पार्श्वप्रहार, अस्फुट टाहो कंठी फुटला , खाकी दिसती भुवने चार. तुला कळाले , मला कळाले , आज लागली आपुली खास, अडगळ वेची उरलेसुरले , एक बाटली चार गिलास
लेखनविषय:

वाचने 1806
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

=)) =)) =)) =)) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

तुला कळाले , मला कळाले , आज लागली आपुली खास, अडगळ वेची उरलेसुरले , एक बाटली चार गिलास च्याऐवजी . . तुला कळाले , मला कळाले , आज भागली आपुली खाज अडगळ वेची उरलेसुरले , एक बाटली चार गिलास - हे कसे वाटते ? चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके

विषय गंभीर पण विडंबण जमलंय खास हसुन हसुन झालीय ईथे पुरेवाट... =)) =)) ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" http://lh3.ggpht.com/_v6NwzplyH

च्यायला हे असलं आसतंय व्हय तिकडं ? जाया पायजेल यकदा ;) >> ढिनच्याक ढिनच्याक नाचू निरन्तर , हलवू कंबर आपुली आज, व्वा !! जियो -मरगळ