✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अकबर द ग्रेट.....मग राणा प्रताप कोण?......गुरु गोविंद सिंग कोण? देशद्रोही?

व
विजुभाऊ यांनी
Wed, 03/26/2008 - 14:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30318 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

संबंध काय?

प्रियाली
Wed, 03/26/2008 - 14:33 नवीन
एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? म्हणजे हा ओढून ताणून आणलेला संबंध कळला नाही. जगात काहीच व्यक्तींना "द ग्रेट" या संबोधनाने संबोधले जाते. जसे, सायरस द ग्रेट अलेक्झांडर द ग्रेट अशोका द ग्रेट कॅथरीन द ग्रेट अकबर द ग्रेट याचे कारण या व्यक्ती तत्कालीन इतिहासात मोठ्या प्रदेशावर राज्य करून होत्या. त्यात त्या चांगल्या असण्याशी किंवा वाईट असण्याशी काहीएक संबंध नाही. अकबराला शहनशाह ए आजमचा किताब होता. त्याचे भाषांतर पाश्चात्यांनी "द ग्रेट" असे केले असावे. राणा प्रताप आणि गुरू गोविंद यांना त्यात खेचून देशद्रोहाची पदवी लागते का असे पाहणे अनावश्यक आहे.
  • Log in or register to post comments

अकबर या फार्सी शब्दाचा अर्थ "द ग्रेट"

विजुभाऊ
Wed, 03/26/2008 - 14:46 नवीन
अकबर या फार्सी शब्दाचा अर्थ "द ग्रेट"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

तसे असल्यास

प्रियाली
Wed, 03/26/2008 - 14:50 नवीन
अकबर या फार्सी शब्दाचा अर्थ "द ग्रेट"
तसे असल्यास त्याला इंग्रजांकडून "द ग्रेट" चा किताब लागणे शक्य आहे कारण शहनशाह ए आजममुळे झाले असते तर अकबर द ग्रेट आणि औरंगजेब द ग्रेटही व्हायला हवा. पण, हे सर्व मुद्दे बिनकामाचे आहेत. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा या प्रमाणे नाव ठेवण्याने किंवा नाव देण्याने व्यक्तीला लोक पारखत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

तुम्हारे बडे होनेसे मै छोटा तो नही होता हुं

विजुभाऊ
Wed, 03/26/2008 - 14:48 नवीन
एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? मला यावरुन नाना पाटेकरचा एक संवाद आठवला तुम्हारे बडे होनेसे मै छोटा तो नही होता हुं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

विजुभाऊ,

अघळ पघळ
गुरुवार, 03/27/2008 - 03:03 नवीन
विजुभाऊ, हे बाकी बरं आहे हां!! वर प्रश्न पण तुच विचारलास आणि खाली उत्तर पण तूच दिलेस?? ह्या चर्चेतुन नक्की काय हवे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अशोक आणि अकबर

चित्तरंजन भट
गुरुवार, 03/27/2008 - 14:11 नवीन
याचे कारण या व्यक्ती तत्कालीन इतिहासात मोठ्या प्रदेशावर राज्य करून होत्या. त्यात त्या चांगल्या असण्याशी किंवा वाईट असण्याशी काहीएक संबंध नाही. ह्या 'ग्रेटनेस' बाबत अशोक आणि अकबर दोन राजांची बरेचदा तुलना केली जाते. ह्या दोघांचे एका विशाल मोठ्या भूभागावर छत्र होते हे दोघांना महान म्हणण्यामागचे कारण नक्कीच नाही. (विजूभाऊ, अकबर हा शब्द अरबी आहे. कबीर आणि अकबर भाऊ भाऊ) अकबरापेक्षा औरंगजेबाचे राज्य मोठे होते, असे वाटते. [मोगल साम्राज्याच्या अस्ताला औरंगजेबापासून सुरुवात झाली असे म्हणतात. मोगलांनी आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला, पण नंतर त्यांना त्याचे प्रशासन जमले नाही. व्यवस्था कोलमडून पडली. सरदार, सुभेदार हळूहळू जवळपास स्वतंत्र आणि शिरजोर होऊ लागले (हेच नंतर मराठ्याच्या इतिहासात झाले), वगैरे वगैरे अनेक कारणं असावीत, आहेत.] ह्या दोघांचा मुत्सद्दीपणा, सर्व जातीजमातींना, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे धोरण (अशोकाचा 'धम्म' आणि अकबराचा दीन-ए-इलाही ) आदी अनेक गोष्टी त्या मागे असाव्यात, आहेत. अशोकाच्या साम्राज्यात खऱ्या अर्थाने मौर्य साम्राज्याची घडी (प्रशासकीय बिशासकीय) बसली आणि अकबराच्या काळात मोगल साम्राज्याची (अकबराचे महसूल प्रशासन वगैरे वगैरे). ही कारणे देखील असावीत. चूभूद्याघ्या. तूर्तास एवढेच. अवांतर: इतिहास संशोधन हा काही आधीच निष्कर्ष काढून मग संशोधन करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा आणि जेहाद्यांचा प्रांत नाही. हसून दुर्लक्ष करावे! दुसरे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

इतिहास संशोधन

प्रियाली
गुरुवार, 03/27/2008 - 15:13 नवीन
द ग्रेट ही उपाधी नेमकी का लागते ते कळत नाही कारण सायरस आणि अलेक्झांडरचे प्रशासन उत्कृष्ट नव्हते. या व्यक्तींना त्यांच्या इतिहासात "महान" संबोधले गेले (अनेक कारणांनी - राज्यविस्तार, प्रशासन इ. इ.) हे ही एक कारण असू शकेल. चू. भू. द्या. घ्या.
इतिहास संशोधन हा काही आधीच निष्कर्ष काढून मग संशोधन करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा आणि जेहाद्यांचा प्रांत नाही. हसून दुर्लक्ष करावे! दुसरे काय?
उत्तम सल्ला! तेच करते आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्तरंजन भट

काय म्हणताय?

सृष्टीलावण्या
Wed, 03/26/2008 - 14:34 नवीन
अकबर द ग्रेट..... मग हे वाचा. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
  • Log in or register to post comments

आणि

सृष्टीलावण्या
Wed, 03/26/2008 - 14:40 नवीन
सनातन वाले म्हणतात : ५ हजार हिंदु स्त्रियांना जनानखान्यात ठेवणारा, ३० हजार हिंदूंची कत्तल करण्याचे आदेश देणारा व १७ हजार राजपूत स्त्रियांना जोहार करण्यास भाग पाडणारा अकबर चांगला व सहिष्णू कसा, हे प्रथम स्पष्ट करावे. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
  • Log in or register to post comments

प्रियाली ताइ तुमचा ईतिहास कच्चा असावा

विजुभाऊ
Wed, 03/26/2008 - 15:06 नवीन
संबंध काय? प्रेषक प्रियाली ( बुध, 03/26/2008 - 14:33) . एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? म्हणजे हा ओढून ताणून आणलेला संबंध कळला नाही प्रियाली ताइ तुमचा ईतिहास एक तर कच्चा तरी असावा अथवा उत्तर भारतातल्या भैय्यांच्या कडून तुम्ही ईतिहास शिकला असावा. स्वराज्या साठी लढणारा एक एक मावळा ( इब्राहीम खान ( तोफखाने वाला)सुद्धा) हा देशप्रेमी होता.....स्वराज्याविरुद्ध लढणारा एक एक माणूस राष्ट्रद्रोही होता...अशा जयचंदांनी /खंडोजी खोपड्यानी / ह्रजोजी राजे महाडीकानी आपली भारत भू भरलेली आहे. जलालाउद्दीन बाबर कोण तो कझाकिस्तान मधुन येतो काय आणि या खंडप्राय देशात राज्य करतो काय? सारे च नवल आहे....... एक गोष्ट लक्षात घेतली तर याचा उलगडा होतो आजही या देशात अकबर द ग्रेट या नावाचा जयघोष होतो त्यावर सिनेमा निघतो. याच उत्तर भारतातल्या भैय्यांनी भारताच्या इतिहासात घोडचुका केलेल्या आहेत. त्यानी आमच्या शिवाजी ला किरकोळ लुटारु म्हण्टले आणि त्याचीच तळी उचलणार्‍या नेहरुनी लिहीलेला चुकीचा ईतिहासाचे आज आम्ही गोडवे गातो आणि अकबराला ग्रेट म्हणतो
  • Log in or register to post comments

खरंय...माझा इतिहास कच्चाच आहे

प्रियाली
Wed, 03/26/2008 - 15:37 नवीन
आपल्यासारख्या किंवा सनातन धर्मीयांसारख्या थोर इतिहासकारांची शिकवणी न मिळाल्याने माझा इतिहास कच्चाच राहीला. :))))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

:)

जुना अभिजित
गुरुवार, 03/27/2008 - 11:25 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

तुम्ही खरे सांगता असे मी मानतो..

विजुभाऊ
Wed, 03/26/2008 - 16:26 नवीन
तुम्ही खरे सांगता असे मी मानतो..पण हा ईतिहास आपल्या वाचनातच येत नाही...अन आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्‍याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो. माझा मूळ मुद्दा हाच आहे.....कोणतीही शहानीशा न करता आपण इतिहास स्वीकारतो..... आपली बुद्धी आपण गहाण टाकतो..... शूर वीर राजस्थान चे आपण कौतुक करतो....त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांचे इमारतींचे कौतुक करतो.पण आपण हे लक्षात घेत नाही की राजस्थानातील बरेचसे किल्ले टिकले आहेत ते न लढवले गेल्यामुळे च्..एखादा राणा प्रताप....चमकुन जातो...त्याचा चितोड्चा किल्ल त्याची राजधानी सुद्धा बदलते.....एखादा प्रुथ्वीराज चौहान्.त्याची राजधानी दिल्ली होती हे ही आपण विसरतो एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे) आणि कोणीतरी सांगितले म्हणुन अकबराला ग्रेट ठरवतो..... नाही तरी देखल्या देवाला दंडवत घालणे हा आपल्या इथलाच वाग्् प्रचार आहे
  • Log in or register to post comments

विजुभाऊंशी १००% सहमत

llपुण्याचे पेशवेll
Wed, 03/26/2008 - 19:30 नवीन
एक म्हणजे जेत्यानी इतिहास लिहीण्याची पद्धत आहे. त्यामुळे अकबर द ग्रेटच होणार. आणि आपल्या सारखी आंधळी मंडळी त्यालाच सत्य मानून, जो कोण अभ्यासपूर्ण विधाने करतो त्याला 'सनातन' वाले किंवा 'जातीयवादी' म्हणणार. विजुभाऊ आपल्या मुद्द्यशी मी सहमत आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

बिहारी सुरी

विकेड बनी
गुरुवार, 03/27/2008 - 06:40 नवीन
>>एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे) काय म्हणता? भारतीय होता का? मोघल कोण? ब्रिटिश का? मुसलमान कोण? परकीय का? नाही नाही, सगळे मुसलमान पाकिस्तानी. हा तुमचा शेरशहा सुरी तर बिहारी होता. बिहारी म्हणजे भय्ये का? नाही नाही, बिहारी वेगळेच. भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. बिहारींनी नाही. चला तर मग एक मुखे शेर शहा सुरीला वंदन करू. अरेच्चा! पण तो तर उत्तर प्रदेशात राहीला होता.. हं हं! म्हणून तो काही भय्या नाही होत हं! तो तर पठाण, ते भय्ये साले हिंदू हो! बिहारी आमच्या मतलबाचे असले तर भारतीय म्हणायचे नाहीतर परप्रांतिय. भय्यांचंही असंच हिंदू असले तर भय्यागिरी करतात, मुसलमान असले तर शेरशहा सुरी बनतात...काहीच नसले तर रामपुरी बनतात. शेरशहा सुरीचं घराणं मूळ अफगाणिस्तानातलं होतं म्हणतात,अरे हो! पठाण होता पठठा...पण अफगाणिस्तान आपलाच. म्हणजे काय आपला शेरशहा सुरी तिथला ना. मोघल आपले नव्हते म्हणून अकबराचा जन्म पाकिस्तानात झाला, ह्यॅ ह्यॅ पाकिस्तान आपला कसा असू शकेल? मोघल आपले नाहीत, अफगाणि आपले. >>आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्‍याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो. आजपासून या लोकांत तुमचीही गणती. अहो, शरण आलेल्या राजपुतांना, त्यांच्या बायका पोरांना दगा देणारा शेरशहा सुरी, त्याचे गुणगान तुम्ही इथे गायलेत. देखल्या देवा नाही हो साक्षात तुम्हाला दंडवत विजूभाऊ! विजूभाऊ द ग्रेट तुम्ही महान आहात!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

शहमात हाये!!

धम्मकलाडू
गुरुवार, 03/27/2008 - 15:28 नवीन
>>एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे) काय म्हणता? भारतीय होता का? मोघल कोण? ब्रिटिश का? मुसलमान कोण? परकीय का? नाही नाही, सगळे मुसलमान पाकिस्तानी. हा तुमचा शेरशहा सुरी तर बिहारी होता. बिहारी म्हणजे भय्ये का? नाही नाही, बिहारी वेगळेच. भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. बिहारींनी नाही. चला तर मग एक मुखे शेर शहा सुरीला वंदन करू. अरेच्चा! पण तो तर उत्तर प्रदेशात राहीला होता.. हं हं! म्हणून तो काही भय्या नाही होत हं! तो तर पठाण, ते भय्ये साले हिंदू हो! बिहारी आमच्या मतलबाचे असले तर भारतीय म्हणायचे नाहीतर परप्रांतिय. भय्यांचंही असंच हिंदू असले तर भय्यागिरी करतात, मुसलमान असले तर शेरशहा सुरी बनतात...काहीच नसले तर रामपुरी बनतात. शेरशहा सुरीचं घराणं मूळ अफगाणिस्तानातलं होतं म्हणतात,अरे हो! पठाण होता पठठा...पण अफगाणिस्तान आपलाच. म्हणजे काय आपला शेरशहा सुरी तिथला ना. मोघल आपले नव्हते म्हणून अकबराचा जन्म पाकिस्तानात झाला, ह्यॅ ह्यॅ पाकिस्तान आपला कसा असू शकेल? मोघल आपले नाहीत, अफगाणि आपले. >>आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्‍याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो. आजपासून या लोकांत तुमचीही गणती. अहो, शरण आलेल्या राजपुतांना, त्यांच्या बायका पोरांना दगा देणारा शेरशहा सुरी, त्याचे गुणगान तुम्ही इथे गायलेत. देखल्या देवा नाही हो साक्षात तुम्हाला दंडवत विजूभाऊ!
परतिसाद लय भारी.
विजूभाऊ द ग्रेट तुम्ही महान आहात!!
शहमात हाये!! धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी

अकबर द ग्रेट

प्रेमसाई
Wed, 03/26/2008 - 17:12 नवीन
मित्रानो तो चुकुन म्हणाला असेल अकबर द ग्रेट त्याच मनाला लावुन घेउ नका अकबर द ग्रेट होउ शकतो का?
  • Log in or register to post comments

अकबर

अभिषेक पटवर्धन
Wed, 03/26/2008 - 19:33 नवीन
Ithe mi vachalele thode sandharbha mala dyavese wattat. Abkar ha tyachya hindu sahishnutate baddal barach prasidhha aahe. Jya rajya chi bahunskhya praja hindu aahe ani jachya karacha (taxes) ek motha hissa hindu praje kadun yet aahe asa raja jar hindunprati sahishnu asel tar tyaat naval watanya joge kahi nahi. Pan jyacya rajyat bahusankhya praja musalman nahi, jyachya karacha agdi thoda hissa susha musalmankadun yet nahi, jyache mukhya sardar musalman nahit (kahi apavad wagalta) ashya shivchhatrapatini muslim sahishnu asana kautukachi bab aahe. (He vichar maze nasun Narhar Kurundakarache aahet. Pan mi tari yachyashi purna sahamat aahe) Ata thodasa marathyan vishayi. Shivaji chya kalat jari marathe swatantrysathi ladhale tari peshwai chya kalat marathyanchi pratima chorala lajwel ashich hoti. Paishansathi konalahi gadiwar basavanare te marathe ashi prasiddhi shinde ani holkarani milavili hoti (panipatachya ladhait marathyana uttaretlya ekahi rajachi madat milali nahi yache ata aashcharya watayala nako). Ani desha baddal mhanal tar tevachya eka tari satthechya manat Bharat desh ashi sadhi sankalpana tari hoti kay ya baddal mazya manat shanka aahe. deshdrihi asayala aadhi desh asayla hava nahi ka? jar Akabar ani Rana pratap yanche desh evgvegale astil tar te ekmekanche shatru hotil deshdrohi nahit (Devanagari lipi tun na lihilyabaddal kshmaswa.)
  • Log in or register to post comments

अभिषेक, शक्यतोवर मराठीतूनच लिहा.

चतुरंग
Wed, 03/26/2008 - 20:53 नवीन
कळफलक सोपा आहे. चुका चालतात पण लिहिल्याशिवाय सुधारणा नाही. अहो आपल्यासारख्या मराठी लोकांनी मराठी संकेतस्थळावर मराठीतून न लिहिणे म्हणजे त्या स्थळाचा अपमान आहे असे मी मानतो. स्पष्ट प्रतिपादनाबद्दल राग नसावा. मिसळीची तर्री थोडी लागते कधीकधी!;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिषेक पटवर्धन

प्रयत्न

अभिषेक पटवर्धन
Wed, 03/26/2008 - 22:02 नवीन
नक्की प्रयत्न करीन. लिहिताना वेळ थोडा कमी होता. पण आता नक्की लिहिन. क्शमस्व.
  • Log in or register to post comments

ये हुई ना बात!

चतुरंग
Wed, 03/26/2008 - 22:36 नवीन
शाबास! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिषेक पटवर्धन

हेच,

विसोबा खेचर
Wed, 03/26/2008 - 23:47 नवीन
म्हणतो! शाब्बास रे अभिषेका! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

काय हे विजुभाऊ?

सर्वसाक्षी
गुरुवार, 03/27/2008 - 00:16 नवीन
अहो विजुभाऊ, जर तुम्हाला निधर्मि, उदात्त विचारसरणीचे, पुरोगामी, सहिष्णु व ज्ञानी म्हणुन ओळखले जावेसे वाटत असेल, पुरस्कार, मान-सन्मान वगैरे हवे असतील तर अकबर, औरंगजेब, अल्लादिन खलजी वगरेंचे गुणगान सुरू करा! उगाच राणा प्रताप, गुरू गोविंदसिंगजी, शिवराय वगैरें संकुचित विचारसरणीच्या लोकांचे फालतु कौतुक करू नका. झालेच तर ज्ञानोबा, तुकोबा, रामदास स्वामी यांच्यातील काही वैगुण्ये शोधुन काढा. अहो एवढे मोठे मोगल लिहुन गेले ते खोटे की काय? अकबर ग्रेटच! ज्याच्या बाजुने प्रत्यक्ष हिंदुस्थानी प्रजा कडाक्याने झुंजते आहे तो अकबर ग्रेटच असला पाहिजे की:)) इंग्रज सरकार किती न्यायी व दयाळु होते याचा गोडवा गाणारे काय कमी आहेत का? अहो झाशीवाली स्वार्थी होती, ती देशभक्त वगैरे नसून आपल्या गादीसाठी लढली; १८५७ चे प्रकरण म्हणजे स्वातंत्र्यसमर नसून केवळ काही शिपायांच्या असंतोषाचे परिणाम होते असे म्हणणारे महाभाग आपल्या देशात आहेतच. आता चितोडच्या किल्ल्यावर पोटासाठी स्थलदर्शकाचे काम करणारे भले सांगोत की ' विलासी राजमहाल पाहायचे असतील तर जयपूरला जा! इथे पाहायला मिळतील ते उघडे पडलेले विदिर्ण भग्नावशेष, कारण इथला प्रत्येक वीर बरबाद होईपर्यंत लढला; आपल्या घरच्या स्त्रिया सम्राटांना भोगायला देउन महालात राहण्यापेक्षा इथले मेवाडी चितोड्-चितोड करीत लढत मेले'
  • Log in or register to post comments

मोघलांना इंग्लिश येत होतं?

विकेड बनी
गुरुवार, 03/27/2008 - 14:56 नवीन
>>अहो एवढे मोठे मोगल लिहुन गेले ते खोटे की काय? अकबर ग्रेटच! काय म्हणता? मोगल अकबराला "ग्रेट" म्हणून गेले? त्यांना इंग्लिश येत होतं? वा! वा!! आमच्या "ईईईईई"तिहासविषयक सॉरी! भाषाविषयक ज्ञानात मोलाची भर हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

येत होते म्हणजे?????

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/27/2008 - 19:31 नवीन
मोघलाना इंग्लिश नक्की येत असणार. नाहीतर आपल्या आत्ताच्या इतिहासकारानी त्यांची बाजू काय उगाच घेतली का? उद्या आपले इतिहासकार हे ही म्हणतील की मोघलाना काय पण अलेक्झांडर्(अलक्षेंद्राला) ला पण इंग्रजी येत होते. असे लिहील्याशिवाय निधर्मी भारतात पुरस्कार मिळत नाही. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी

यादी...

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/27/2008 - 04:38 नवीन
१. अल्लाउद्दीन खिल्जी २. शेरशहा सुरी ३. बाबर ४. अकबर ५. राणा प्रताप ६. औरंगजेब ७. शिवाजी (चुकलो! छत्रपती शिवाजी महाराऽऽऽज!!! की जय!!!!!!) ८. पेशवे ९. इंग्रज १०. झांशीचीं राणीं हम्म्म्म्... आपले बापूजी कोठें राहिलें बरें? त्यांनाहीं आणूयांत, म्हणजे भारताचां समग्र इतिहास (नव्हे, ईतिहास) इथेंच उरकून टांकूं! (मध्ये भगतसिंगांनाही आणावयांस हरकत नसावीं. आणि झांशीचीं राणीं, भगतसिंग वगैरे 'द ग्रेट' म्हटल्यावर बापूजी आपोआपच 'व्हिलन', नव्हेंत कांय?) - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments

सहमत

गृहिणि
गुरुवार, 03/27/2008 - 04:54 नवीन
असा (गैर)समज आहे कि अकबर हा सर्वधर्मसमभाव ह्या तत्वावर विश्वास ठेवणारा होता. कदाचित ह्या कारणास्तव त्याला अकबर द ग्रेट म्हंटले गेले. हा अत्यंत चुकिचा दृष्टिकोण नक्कि कोणि प्रचलित केला माहिति नाहि पण हा प्रचार खोटा आहे हे नक्कि. निपक्षपातिपणे फारतर एवढेच म्हणता येइल कि अकबराला सबंध भारत आपल्या अधिपत्याखालि आणायचा होता त्यासाठि त्यानि हिंदु आणि मुसलमान अश्या दोन्हि प्रकारच्या राजसत्तांवर हल्ले केले. पण एवढ्या जोरावर त्याला श्रेष्ठ समजायचे म्हणजे बुश साहेबांनि सद्दाम ला सत्तेवरुन दुर केले त्यामुळे ते थोर आहेत असे समजण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

मनोगत

धनश्रीदिनेश
गुरुवार, 03/27/2008 - 05:32 नवीन
i m sorry i tried to write in marathi but not able to write some words are difficult for me. marathi manoos khot pahuhi shakat nahi tasach pachau shakat nahi. he aapalya raktatach aahe. koni kiti aawaz kela tarihi AKBAR THE GREAT houch shakat nahi . he wisarun kas chalel JODHAAKBAR ha cinema marathi mansaans kadhala aahe, tyala ka underestimate karat aahot. he dusara koni kela aasat tar tyala bakichyani kiti uchalun dharala aasta. SHIVAJI MAHARAJ great hote , aahet karan tyani lokanchy manawar rajya kela , lokawar nahi . marathi asmita moden pan waknar nahi MAZ MARATHIPAN MAZYA KARYATUN VYAKTA VHAWE DUSARYALA KHALIPANA DAKHAWNYAT NAHI '' JAI MAHARASHTA ''
  • Log in or register to post comments

धनश्रीताई,

चतुरंग
गुरुवार, 03/27/2008 - 06:59 नवीन
आपण माझी वरील प्रतिक्रीया वाचलेली दिसत नाही. हे मराठी संकेतस्थळ आहे कृपया मराठीतून लिहा. मोडकेतोडके असले तरी चालेल. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनश्रीदिनेश

धनश्रीताई

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/27/2008 - 09:14 नवीन
चतुरंग म्हणतात त्या प्रमाणे टंकलेखन थोड्याशा सरावाने जमते. आपण रोज अर्धा तास कळफलकाशी खेळलात कि महिन्याच्या आत जमेल. प्रयत्न व सातत्य ठेवा.मला स्वतःला अजिबात टंकता येत नव्हते. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनश्रीदिनेश

प्राजु चा व्य नी ...त्याला माझे उत्तर

विजुभाऊ
गुरुवार, 03/27/2008 - 11:31 नवीन
प्रियाली प्राजु ने मला एक व्य नी पाठवले त्याला मी दिलेले उत्तर इथे पेस्ट करतो आहे. मी तुमचा इतिहास कच्चा आहे असे म्हंटलेले नाही "कच्चा तरीअसावा असे" म्हंटले आहे .असो... माझा मुद्दा होता अकबराला ग्रेट म्हणताना बाकी इतिहास सुद्धा लक्षात घेतला पाहीजे..........इतकेच बाकी तुम्हाला मैत्रीण झकास मिळाली आहे.. नेट वर सुद्धा नेटाने भांडते तुमच्या साठी प्राजु च्या व्य नीला माझे उत्तर.............. प्राजु सल्ल्याबद्दल धन्यवाद्...मला कोणाला नाव ठेवायचे नव्हते..मी फक्त आपण अकबराबद्दल आपण त्याला ग्रेट का म्हणतो असे विचारले होते. त्याला प्रियाली ने खूपच कॅजुअल उत्तर दिले... अकबराला उगीचच मोठे केले जाते आणि ते तसे करताना आपण आपल्याच शूर योद्ध्याना विसरतो.असे मला म्हणायचे होते. अकबराला थोर म्हणायला माझी हरकत नाही ( तसे करणारा मी कोण) आपण सगळेच जण चुकीचा इतिहास शिकतो कालांतराने तेच खरे वाटु लागते... उदा: ताजमहाल मुमताझ च्या प्रेमाखातर बांधला...खरी गोष्ट अशी आहे की मुमताझ वयाच्या ३३व्या वर्षी मेली...३३ व्या वयापर्यन्त तीची १९ बाळंतपणे झाली( इतिहासात ही नोन्द आहे)..ती प्रथम बुर्हाणपुर मधे पुरली गेली. नन्तर तीच्या शवा ला ताझमहाल मधे पुरले गेले ( ?) ते ही दुसर्‍या मजल्यावर ( कबर दुसर्‍या मजल्यावर्?. हे सुद्धा इतिहासात नमुद आहे) दुसरे उदाहरण : छ. संभाजी महाराज हे बदफैली होते..बाइल वेडे होते असे सांगतात. थोरातांच्या कमळा या गोष्टीमुळे..तीने जीव दिला असेही सांगतात्...वस्तुस्थिती अशी आहे की.....छ. संभाजी महाराज १६९२ मधे मारले गेले.....पाचाड ला थोरातांच्या कमळा हीची समाधी आहे त्यावर तारीख आहे १६९८ ची....... हा इतिहास आपल्याला माहीतच नसतो. माझे म्हणणे इतकेच की एखाद्याचे नाव सोन्या असले म्हणुन त्याला सोन्याचा पुतळा मानु नये.... परखड भाषेत सांगण्यामुळे आपल्या तसेच आपल्या मैत्रीणीच्या भावना दुखवल्या गेल्या असतील मी समजु शकतो......... कळावे लोभ असावा... विजुभाऊ
  • Log in or register to post comments

खरंय!

प्रियाली
गुरुवार, 03/27/2008 - 14:03 नवीन
बाकी तुम्हाला मैत्रीण झकास मिळाली आहे.. नेट वर सुद्धा नेटाने भांडते तुमच्या साठी
प्राजु माझी मैत्रिण आहेच. तिने माझी बाजू उचलून धरली असणार तेव्हा तिला धन्यवाद. माझ्या भावना अजिबात दुखावल्या गेलेल्या नाहीत. :-) आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली. बाकी, चालू दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मला या वाक्याचा खेद झाला

विजुभाऊ
गुरुवार, 03/27/2008 - 14:33 नवीन
आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली...... मला या वाक्याचा खेद झाला.........असो.इतिहास हा इतिहास असतो..... फक्त त्यावर कोणतेही मुलामे चढवु नयेत .अर्थात असा इतिहास दुर्मीळच.... चितोड गडावर असा एक विजय्स्तम्भ आहे. तिथे सती जोहार यांचा उदोउदो केलाजातो...अल्लाउद्दीन खिलजी ची कथा सांगतात ती पद्मिनी राणी चित्तोड मधे कधी नव्हती असेही सांगतात. खरे खोटे इतिहास जाणे. तुमच्या बद्दल व्यक्तिगत कोणताही राग नाही..... काही भावना दुखावल्या गेल्या असल्यास ते जाणतेपणाने /मुदद्दाम झाले नाही... असो .............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

माझ्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत

प्रियाली
गुरुवार, 03/27/2008 - 14:41 नवीन
तुमच्या बद्दल व्यक्तिगत कोणताही राग नाही.....
आँ! तो कशाबद्दल?
काही भावना दुखावल्या गेल्या असल्यास ते जाणतेपणाने /मुदद्दाम झाले नाही...
आता कितीवेळा सांगू की माझ्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत? :-) कृपया, माझ्या भावना इतक्या स्वस्त नाहीत की काही क्षुल्लक कारणाने दुखावल्या जाव्यात याची नोंद घ्यावी! तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मलाही........

विजुभाऊ
गुरुवार, 03/27/2008 - 15:17 नवीन
आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली...... मलाही........ तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो! चला एकुण प्रकराणातुन विनोद निर्मिती झाली हे काय कमी आहे ...........प्रसंगी अखंडीत विनोदीत जावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

उगाच,

विसोबा खेचर
गुरुवार, 03/27/2008 - 15:21 नवीन
तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो! अहो विजूभाऊ, मला इतिहासातलं काहीच समजत नाही, तेव्हा उगाच मला तुमच्यात खेचू नका. तुमचे विनोद चालू द्यात, आपल्याला का बी देणंघेणं नाही.. :) आपला, तात्या द ग्रेट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

बिनदिक्कत

सृष्टीलावण्या
गुरुवार, 03/27/2008 - 10:47 नवीन
छ. संभाजी महाराज हे बदफैली होते..बाइल वेडे होते असे सांगतात. कोणताही ऐदी आणि लंपट माणूस जिवंतपणी औरंग्याने त्यांचे जे हाल केले ते त्यांच्यासारखे हूं की चूं न करता सहन करू शकला नसता. मी वाचले की औरंग्याने त्यांची कातडी सोलली, डोळे काढले, हात छाटले इ.इ. (अर्थात माझ्या ह्या वाक्याला इथले स्वघोषित इतिहासकार पुरावा मागतील यात शंका नाही पण मी बाबासाहेब पुरंदर्‍यांकडे पुरावा न मागता त्यांच्या लेखनावर डोळे झाकून बिनदिक्कत विश्वास ठेवते). > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
  • Log in or register to post comments

भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. ...

विजुभाऊ
गुरुवार, 03/27/2008 - 12:44 नवीन
तेजखान भाऊ भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. ... हो केवळ मराठी लोकांचा नव्हे तर सार्‍या भारताचा.आजही ते तेच करतात्...रोजच्या बातम्या पहा...काय काय दिवे पाजळतात भय्ये पत्रकार .... आजही ते छ. शिवाजी हे दख्खनचे लुटारु होते म्हणुन सांगतात. दिल्लीच्या लाल किल्ल्यात औरंगझेबा नन्तर चा काळ दाखवताना ते दिल्ली वर कधी मराठे लुटारुं सारखे हल्ले करायचे असेच सांगतात.( खरे तर मराठे पानपतात दिल्ली करांच्या रक्षणार्थ गेले होते) नेहरुं " डिस्कवरी ऑफ ईंडीया" शिवाजी ला लुटारु ठरवतात आणि अजुनही उत्तरेमधे हेच शिकवतात भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. ...... हो.... बादशाह आणि त्यांचे नबाब यांची जी हुजुरी करण्यात हयात गेली त्या सर्वांची.........त्याना काय कळणार आमच्या व्यथा... दिल्ली मधे औरंगझेब रोड असे नाव वाचल्यावर माझ्या डोक्यात क्षणभर तिढीक उठली होती.... ताजमहाल मधल्या बंद खोल्या का खुल्या करत नाहीत ते....पडकी बाबरी मशीद पाडताना शौर्य(?) दाखवणारे ही या बाबतीत गप्प रहातात? मराठी वीरांबद्दल बोललो की मी संकुचीत प्रांतवादी ठरतो अन मोघलांचे गोडवे गाईले की मग चांगला ठरतो् हे असे का? असा लाळ घोटे पणा न जमणारा.....आपला संकुचीत प्रांतवादी .... ...विजुभाऊ
  • Log in or register to post comments

ताजमहाल मधल्या बंद खोल्या

मनस्वी
गुरुवार, 03/27/2008 - 14:16 नवीन
ताजमहाल मधल्या बंद खोल्या का खुल्या करत नाहीत ते....पडकी बाबरी मशीद पाडताना शौर्य(?) दाखवणारे ही या बाबतीत गप्प रहातात?
या बद्दल मलाही कुतुहल आहे. संशोधनाच्या नजरेतून का बरे उघडता येउ नयेत. हिंदुस्थानात राहून आपल्यालाच का संकोच वाटावा असे करण्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

नक्की काय?

धम्मकलाडू
गुरुवार, 03/27/2008 - 15:47 नवीन
नक्की कोणाला शिव्या द्यायच्या आहेत तुम्हाला विज्जुभाऊ? मुसलमान की भैय्ये की बिहारी की इंग्रज... (विज्जुभाउंचे प्रतिसाद वाचून डोक्याची मंडई झालेला) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अवांतर -

विसोबा खेचर
गुरुवार, 03/27/2008 - 18:09 नवीन
अवांतर - (विज्जुभाउंचे प्रतिसाद वाचून डोक्याची मंडई झालेला) धम्मकलाडू 'डोक्याची मंडई होणे' हा वाक्प्रचार मनापासून आवडला! :) असो, हे अवांतर होते, बाकी चालू द्या! इतिहास या विषयाचा आमचा नगण्य अभ्यास आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

या कोणा ही बद्दल काहीच म्हणणे नाही.

विजुभाऊ
गुरुवार, 03/27/2008 - 16:42 नवीन
मत्प्रिय.धम्मकलाडवा: मुसलमान भैय्ये बिहारी इंग्रज...माझे या कोणा ही बद्दल काहीच म्हणणे नाही. मी फक्त इतिहासाचा विपर्यास करण्याबद्दल लिहीले आहे... मला तुझे म्हणणे पटते ...तुझ्या डोक्याची खरोखरच मंडै झाली आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" या बाद्दल विचारशील तर.. माझे वाचन चांगले आहे.....पगार ही चांगला आहे.... दोन्ही गोष्टी चांगल्या असल्यावर बोलायला हवेच की
  • Log in or register to post comments

कन्फर्म केल्याबद्दल धन्यवाद..

धम्मकलाडू
गुरुवार, 03/27/2008 - 23:27 नवीन
माझे वाचन चांगले आहे.....पगार ही चांगला आहे....
मत्प्रिय विज्जुभाउ, कन्फर्म केल्याबद्दल धन्यवाद... धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

तुम्ही भान्डताय कि चर्चा करताय?

आंबोळी
गुरुवार, 03/27/2008 - 19:42 नवीन
गेल्या १० -१२ प्रतिक्रिया ठळक अक्षरात लिहिल्याने तुम्ही लोक भान्डत आहात कि चर्चा करत आहात तेच कळत नाही. इतिहासाचा विपर्यास करनार्यान्चा धिक्कार असो | (इतिहास प्रेमी) आम्बोळी
  • Log in or register to post comments

आरे हे काय ?

आंबोळी
गुरुवार, 03/27/2008 - 19:44 नवीन
माझी प्रतिक्रियासुध्धा ठळक झाली.... पूर्व्परिक्षणात ति ठळक दिसत नाही.... तात्या/निलकान्त इकडे लक्ष द्या.....
  • Log in or register to post comments

विजुभाऊंशी सहमत

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/27/2008 - 19:49 नवीन
इतिहासाचा विपर्यास ही तर अगदी सामान्य गोष्ट आहे. मराठी किल्ले पेशवाई पर्यंत एकदम व्यवस्थित होते. नंतर ते तोफा लावून ब्रिटीशांनी पाडले कारण, मराठी माणूस लढवय्या होता, दौलत लुटली गेली तरी किल्ल्यावर उपाशीपोटी राहून लढला असता. मुरारबाजीने लढवलेला 'पुरंदर' आणि त्याचा लढा या गोर्‍यांनी पाहीलेला होता. अर्थात किल्ले पाडूनही साहेबाला काही फायदा झाला नाही कारण किल्ले नसलेल्या महाराष्ट्राने त्यानंतरही अनेक लढवय्ये निर्माण केले. लो. टिळक, सावरकर, कान्हेरे, भाई कोतवाल इतरही अनेक हुतात्मे नावे घ्यावी तेवढी कमीच. पण साहेबाने जाताना भारतीय लोकांचा बुध्दीभेद केला हेही तितकेच खरे. त्यामुळे आपल्या चांगल्या गोष्टी आपण अजूनही ओळखू शकलो नाही असे वाटते. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

आजचा दिवस हा इतिहासात <u>ठळक</u> अक्षरात लिहीला जावा

विजुभाऊ
गुरुवार, 03/27/2008 - 19:49 नवीन
हा हा हा आजचा दिवस हा इतिहासात ठळक अक्षरात लिहीला जावा........
  • Log in or register to post comments

हो ना!

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/27/2008 - 19:50 नवीन
माझाही प्रतिसाद ठळक आला आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

शिवाजी महाराज थोरच, पण मग संभाजी राजे ?

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/27/2008 - 21:48 नवीन
संभाजी राजे दिलेरखानाला मिळाले, आणि महाराजांविरुद्ध युद्ध केले. आता संभाजी राजांना देशद्रोही म्हणावे का ? - सर्किट
  • Log in or register to post comments

इतिहास आठवा

विजुभाऊ
Fri, 03/28/2008 - 09:56 नवीन
संभाजी राजे दिलेरखानाला मिळाले, आणि महाराजांविरुद्ध युद्ध केले. आता संभाजी राजांना देशद्रोही म्हणावे का ? इतिहास आठवा स्वतः थोरल्या आबासाहेबानी संभाजी राजाना एकुण ५ वेळा बादशहाच्या चाकरीत रुजु केले होते....संभाजी राजाना पंच हजारी मनसबदारी होती... हो...स्वतः संभाजी राजाना सुधा त्या प्रसंगाबद्दल असे वाटत होते..... पण सर्किट्राव तुम्ही तेंव्हाचा इतिहास आठवा..ताराबाइ काय राजकारण खेळल्या होत्या. संभाजी राजाना थोरल्या आबासाहेबांपासुन कसे दूर ठेवले जात होते. ताराबाइनी शिवाजी महाराजांचा म्रुत्युची बातमी सुद्धा संभाजी राजाना कळु नये याची तजवीज करुन ठेवली होती.....( वाचा संभाजी..विश्वास पाटील) माझा मूळ मुद्दा हा आहे की उगाच एखाद्याचे उदात्तीकरण केले जाउ नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा