अकबराचा डोळा होता असे एका नॉन हिंदुत्ववाद्याच्या पुस्तकात मी वाचले. परंतु प्रस्तुक लेखन कादंबरी होती व इतिहासाच्या दृष्टीने ग्राह्य पुरावा धरता येत नाही. प्रियालीताईंनी कृपया भाष्य करावे. अकबराबद्दल इतर कोणी उदा. पोर्तुगीज, डच, काय चांगले लिहिले आहे?
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
अकबराबद्दल इतर कोणी उदा. पोर्तुगीज, डच, काय चांगले लिहिले आहे?
डच, पोर्तुगीज लांब राहीले. खुद्द शिवाजीमहाराज अकबराला पुण्यश्लोक म्हणून गेले आहेत पण महाराज महाखोटारडे आणि त्यांच्यावर संशोधन करणारे कुरुंदकर खोटारडे आहेत. सनातन धर्मीच तेवढे खरे...तेव्हा मी काय बोलावं... इथल्या थोर संशोधकांत म्या पामराने गप्प राहीलेलच बरं!
हा हा हा हा! प्रियालीताई तुमचे बोलणे मला विनोदी वाटले.
मग तसे पाहता महाराज, खुद्द अफझलखानाला पण "आपण वडील पण आम्हास आपले भय वाटते. त्यामुळे आपण आम्हास जावळीत भेटायला यावे" असे म्हणाले होते..
मग त्यामुळे अफझलखान थोर झाला?? का महाराज पळपुटे आणि घाबरट झाले...??? सांगा बरे?
ज्यात अकबराला महाराजानी पुण्यश्लोक म्हटले आहे ते पत्र अथवा त्याचा मसुदा आम्हास वाचायला मिळाला तर फार बरे होईल. कारण माझ्या माहीतीनुसार ते पत्र महाराजानी औरंगजेबाला पाठवले होते. आणि त्यात 'गरीब जनतेकडून कसला झिजिया कर उकळतोस मनगटात रग असेल तर आमच्या कडून तो उकळून दाखव' असे आव्हानही होते. त्यामुळे त्याबद्दल जरा जास्त माहिती दिलीत तर बरे होईल.
पुण्याचे पेशवे
इथे हिन्दुस्तान च्या इतिहासावर लिहिणारे किति लोक अमेरिकेत अणी अमेरिकन आहेत ...... आणि उगिचच 'पर् कियान्ना' नावे ठेवत आहेत?
...
'आपण कोर् डे पाशाण'
'चुभूद्याघा'
अमेरीकेत आणि अमेरीकन इथे याचा काय संबंध.. उद्या एखादा अमेरीकन माणूस जर शिवाजी महाराजाना गुणी, पुण्यश्लोक राजा म्हणला तर आपण काय त्याला शिव्या घालणार आहात का?
जर तो उगाच अर्धवट माहीतीच्या आधारावर महाराजाना वाईट म्हणत असेत तर त्याला फोडून काढणे ठीक आहे.
इथे कोणी उगिचच 'पर् कियान्ना' नावे ठेवत नावे ठेवत नाहीये.
आणि हो आम्ही कोरडे पाषाण आहोत सह्याद्रिचे कोरडे पाषाणकडे ज्यानी शिवराय आणि त्यांचे किल्ले स्वतःचा शिरावर धारण केले...
उगाच आपण संबंध नसलेली विधाने करून चर्चेचा रोख का बदलत आहात?
पुण्याचे पेशवे
आणि हो आम्ही कोरडे पाषाण आहोत सह्याद्रिचे कोरडे पाषाणकडे ज्यानी शिवराय आणि त्यांचे किल्ले स्वतःचा शिरावर धारण केले...
ह्याला म्हणतात प्रतिसाद...
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
नक्कीच्...आपले पूर्वज आपल्याला महान तर वाटणारच.
आम्ही मराठ्यांचे वंशज असल्याने आम्हाला मराठे जसे महान वाटतात तसेच.
(तुकोबाचा वारकरी-शिवबाचा धारकरी)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
इतिहास गवाह आहे
ह्याला म्हणतात पूर्वजांचा अभिमान्.(एकदम खुदा गवाहची आठवण झाली)
तो इतिहास कुणी लिहीला हो! महाराष्ट्राच्या इतिहासात तर मराठेच महान आहेत. हा आता पाकीस्तानचा इतिहास आम्ही वाचला नाही.(अकबर त्यांचा बाप आणि इंग्रज त्यांचा तारणहार-त्यामुळे ते दोघेही त्यांना महान वाटणार यात शंका नाही.)
इंग्रजांनी कुणाला महान म्हटले म्हणून आम्हीही म्हणावे की काय? आणि इंग्रज महान असतील तर अशा इंग्रजांना उगाचच आपण आपल्या देशातून हाकलले.
छ्या! ह्या लोकमान्य टिळकांना,स्वा.सावरकरांना,भगतसिंग्-सुखदेव-राजगुरु ह्यांना काही अक्कलच नव्हती म्हणायची.आणि हो,बापूजी राहीले की!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
बरोबर आहे,पांडूखान. १५० वर्ष राज्य केल्यानंतर आणि हवं ते लूटून झाल्यानंतर कंटाळतील नाहीतर काय होईल. खरंतर आपण होतं नव्हतं ते आधीच द्यायला हवं होतं.बिचारे एवढ्या लांबून आपल्यासाठी आले होते,जरा लवकर तरी घरी गेले असते.
बाकी काही म्हणा,इंग्रजांचा इतिहास तेवढा खरा. बाकी साले सगळे फेकू.काफीर कुठले!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
बरोबर आहे,पांडूखान. १५० वर्ष राज्य केल्यानंतर आणि हवं ते लूटून झाल्यानंतर कंटाळतील नाहीतर काय होईल. खरंतर आपण होतं नव्हतं ते आधीच द्यायला हवं होतं.बिचारे एवढ्या लांबून आपल्यासाठी आले होते,जरा लवकर तरी घरी गेले असते
हे मात्र खरे. पण त्यानी इथे येऊन आपल्याला किती चांगल्या गोष्टी शिकविल्या. इतिहास शिकवला, त्यांची थोर संस्कॄती आपल्याला शिकविली. जाऊदे आपल्याला शिवाजी महाराजानी लिहीलेली पत्रे वगैरे नाही कळणार त्यापेक्षा आपण जेम्स लेन याचे पुस्तक वाचू, अकबराच्या नावाने दर्ग्यावर चादर चढवू, झालेच तर पोर्तुगिज चर्च मधे जाऊन इंग्रजी राज्य परत यावे म्हणून प्रार्थना करू.
आमेन...
पुण्याचे पेशवे
>>महाराजानी लिहीलेली पत्रे वगैरे नाही कळणार त्यापेक्षा आपण जेम्स लेन याचे पुस्तक वाचू, अकबराच्या नावाने दर्ग्यावर चादर चढवू, झालेच तर पोर्तुगिज चर्च मधे जाऊन इंग्रजी राज्य परत यावे म्हणून प्रार्थना करू.
आता कसं शहाण्यासारखं बोललास? आपल्याला जे कळत नाही तिथे बडबड करू नये. कारण महाराजांचे पत्र तुला मिळाले तर तू म्हणणार ते जेम्स लेनने ढापून बदललं होतं. अरे तू पडलास "पुण्याचा पेशवा" आणि काय असणार तुझ्याजवळ?
हो का तेजराव.
आता कसं शहाण्यासारखं बोललास? आपल्याला जे कळत नाही तिथे बडबड करू नये.
हा सल्ला आपण पहीले आचरणात आणा. नुसते नावानेच तेज वाटता डोके मात्र निस्तेजच वाटते आहे तुमचे... :)
पुण्याचे पेशवे
आई जगद॑बे...हे काय चालल॑य काय नक्की?
अरे कोण कुठला अकबर तो, शतकानुशतका॑पुर्वी होऊन गेला..
असेलही तो ग्रेट..कि॑वा असेल हलकट! अरे पण माझ्या राजा॑हो, त्याच्या गाडलेल्या मुडद्यावरुन किती आगडो॑ब उसळवताय रे!
एक मात्र खर॑, आम्हा मराठीया॑च्या नशिबी हा दुहीचा रोग कायमचा.
चर्चा जरुर करा, पण भान सोडून एकमेका॑वर वैयक्तिक पातळीला जाऊन का भा॑डता? "हे तुला कळेल का...अन् ते तुला समजेल का" काय हे तेजराव? जशी तुमची मत॑ आहेत...अगदी लिखित ईतिहासाला धरुन असतीलही, पण तशीच इतरा॑नाही त्या॑ची मत॑ आहेतच ना?
अरे जरा एकमेका॑च्या मता॑चा आदर ठेवा रे!
गेले काही दिवस बघतोय, कोणाची दृष्ट लागलीये कोण जाणे, जो उठतो तो हमरीतुमरीवर येतोय...का रे बाबा॑नो (आणि बाया॑नो सुद्धा)? इतके दिवस कसे छान वागत होता सगळेजण...
हात जोडून सगळ्या॑ना एकच विन॑ती करतो रे, नका भा॑डू. अरे बघवत नाही रे अस॑!
तात्या जरा धो॑डोप॑ता॑शी बोलून बघा बॉ, मिपाला आणि गावकर्या॑ना ही कसली बाधा झालीये!
असो, कळकळ वाटते म्हणून पोटतिडिकीन॑ बोललो. तेजराव, वैयक्तिक तुमच्यावर शरस॑धान करायच॑ नव्हत॑ ! स॑दर्भामुळे आल॑.. माफ करा !
आई जगद॑बे सगळ्या॑ना सुबुद्धी दे!..आमच॑ मिपा पुन्हा हसत॑-खेळत॑ होऊ दे ग॑ !!!!
आपलाच,
- (व्यथित) ध मा ल.
धमाल्या
आपण विषय कोणता मांडतो आणि लोक त्याला काय प्रतिसाद देतात हेच कळेनासे झाले मला.
कोणाचेही चुकीचे उदात्तीकरण करु नये हे माझे म्हणणे होते. त्यावर चांगली चर्चा होउन काहीतरी ज्ञान मिळेल असे मला वाटले होते
त्यावर मला.... तुझे वाचन किती... तुझा पगार किती.....असे प्रश्न विचारले गेले...थोडी थट्टा थोडी मस्ती चालते नव्हे ती काही वेळा अपेक्षीत असते...लहान मूल नाही का तसे करत....पण त्यालाही काही सुमार ? तुझे वाचन किती... तुझा पगार किती याचा विषयाशी काय संबंध मला तरी नाही कळाले... बाल बुद्धी असेल असे समजुन मी दुर्लक्ष केले.....
पण या विषयावर मी का चर्चा सुरु केली मला हाच प्रश्न पडला आहे.. मिपा वर अभ्यासु सदस्य आहेत असा माझा समज आहे...(तो तसा राहीलही.)
महाजालावर चर्चासत्र सुरु करणे सोपे असते पण बंद करणे अवघड असते..
पण असे एकेरीवर आणणारे ,विषयाशी अजिबात संबंध नसणारे मूर्खा सारखे प्रतिसाद येणार असतील तर ही चर्चा बंद करणे चांगले
किंबहुना अशी चर्चा सुरुच करायची नाही असे मला वाटायला लागले आहे.
वादे वादे जायते तत्वबोधः हे मला ठाउक होते......वादे वादे जायते कंठशोषः हे नव्याने कळले........
आपण हा धागा बंद करुया............
प्रतिक्रिया
कश्मीरच्या महाराणीवर .....
मी काय भाष्य करणार?
महाराज आणि अकबराला पुण्यश्लोक???
इथे
अमेरीकेत आणि अमेरीकन??
लढ रे वाघा!
आणी हो ..
:)
महान असणॅ
गवाह
"इंग्रज
ह्म्म्म
लढ इनोबा. आपण तुझ्या बरोबर आहे.
आता कसं?
होका तेजराव!
सबसे तेज :)
आई
वादे वादे जायते कंठशोषः
Pagination