मनातले थोडेसे..
९ मे २०१०. खूप मोठा दिवस. का?? नेमके काय आणि कोणत्या शब्दांत सांगावे समजत नाही.
स्वप्नं असतात म्हणून जगण्याला दिशा असते असं म्हंटलं चुकीचं ठरू नये. कधी स्वप्नं खरी होतात, तर कधी घडून गेलेलं काहीतरी, हे आपलं स्वप्नं होतं का असा विचार आपण करू लागतो. आज मागे वळून पाहताना असा विचार येतो की, ४ वर्षापूर्वी मी कोण होते? पुणे आकाशवाणीच्या मराठी चॅनेल ची निवेदिका होते. कार्यक्रमाची संहिता लिहिताना खरडलेल्या चार ओळी, कधी एखादी कविता, आणि त्या अनुषंगाने येणारं निवेदन.. साहित्यिक लेखानाचा इतकाच काय तो संबंध!
आणि आज माझ्या नावावर एक कविता संग्रह प्रकाशित होतो आहे. हे स्वप्नवत वाटतं आहे..
नक्की कशा शब्दांत माझ्या भावना व्यक्त करव्यात समजत नाहीये. कवितेशी जवळीक तशी लहानपणीच झाली होती. आईने रूजवलेलं ते कवितेचं बीज काही वर्षं सुप्तावस्थेत राहूनही मेलं नाही.. तग धरून राहिलं. आणि थोडंसं खत पाणी मिळताच अंकुरलं आणि जोमाने वाढलं सुद्धा. मी कविता लिहायला, माझं अमेरिकेत येणं जरूरी होतं का ?? या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाहीये मला. गेल्या ४ वर्षात माझी बाळबोध कविता प्रगल्भ होऊ लागली आहे. कित्ती प्रकारे मी कवितेवर प्रेम केलं असेल! काही कविता तर रात्री अडीच वाजता उठून लिहिलेल्या आठवतात मला.
एक गोष्ट मात्र नक्की, ऑगस्ट २००८ मध्ये मिसळपावची निर्मिती झाली, इथूनच प्राजुच्या कवितांना पंख फुटले. सुरूवातीच्या कवितांमध्ये , वृत्त मात्रांच्या नियमांना धाब्यावर बसवून काहीहि... अक्षरशः काहीही लिहिलं आहे मी! तेव्हा ज्या सदस्यांनी हे अत्याचार सहन केले, कानपिचक्या दिल्या त्यांच्याच प्रयत्नांना आलेलं हे फळ आहे असं म्हणेन मी. इथे आवर्जून नावे घ्यायची झाली, तर, प्रमोद देव काका, सर्किट्(मिसळमोक्ता), स्वातीताई राजेश, स्वातीताई दिनेश, लिखाळ, केशवसुमार, चतुरंग, शितल, इनोबा, आनंदयात्री, मदनबाण, बेसनलाडू, ऋषिकेश, नाना चेंगट्(अवलिया), बिपिनदा, सहजराव, बिरूटेसर..धोंडोपंत , तात्या.. यादी खूप मोठी आहे. मिपाच्या सुरूवातीच्या काळात ज्यांनी ज्यांनी माझ्या कविता सहन केल्या, त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे कदाचित माझ्या नावापुढे 'कवयित्री' लावायची संधी मला मिळाली.
गझल शिकण्यासाठी उत्तम गझलकार आणि विडंबन सम्राट अनिरूद्द अभ्यंकर उर्फ केशवसुमार यांना मी किती त्रास दिलाय.. ते फक्त त्यांना आणि मलाच माहिती! संदीप चित्रे.. !आम्ही दोघेही मायबोलीच्या गझल कार्यशाळेमध्ये सामिल झालो होतो.. आणि त्यानंतर लिहिलेली प्रत्येक गझल एकमेकाला पाठवून पॉलिश करत होतो. इतकं होऊनही अजूनही मी गझलेसाठी धडपडते आहेच. मीनल..!! हीच्या सहनशक्तीची तर कमालच आहे. हिच्याकडे कुठून इतकी सहनशक्ती आली हे त्या परमेश्वरालाच ठाऊक! असो.. तिची सहनशक्ती अशीच दिवसेंदिवस वृद्धींगत होऊदे अशीच प्रार्थना करते.
"फुलांची आर्जवे" .. हो! माझा.. या प्राजक्ताचा ..पहिला वहिला कविता संग्रह! पुस्तक जेव्हा माझ्या हातात पडलं... इथे .. अमेरिकेत, तेव्हा प्रचंड खळबळ चालू होती मनांत. का? नाही सांगता येणार. हे चित्र.. माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचं आहे., हे मनोगत.. मी, माझ्या पुस्तकासाठी लिहिलेलं आहे, ही अर्पण पत्रिका.. मी लिहिलेली आहे, मलपृष्ठावरचा हा फोटो.. माझा आहे! या कविता... मीच लिहिलेल्या.. माझ्या मित्रमैत्रीणिंनी कौतुक केलेल्या आहेत. हे.... हे.. माझं पुस्तक आहे!! या सगळ्यांवर विश्वास बसायला फार वेळ लागला.
गेल्या वर्षी जुलै मध्ये आई भारतात परतताना माझ्या ५० -६० कविता एका सिडीवर कॉपी करून घेऊन गेली होती. सप्टेंबर मध्ये तीने त्याच्या प्रिंट्स काढून दिलिपराज प्रकाशन, पुणे, यांच्याकडे पाठवून दिल्या.. २ महिने इतके अशक्य गेले!! काय सांगू?? वाटलं प्रकाशकांनी कवितांना कचरापेटी तर नसेल ना दाखवली..! आणि एकेदिवशी समजलं प्रकाशक कविता संग्रह काढणार आहेत. त्या दिवसापासून आजपर्यंत काय काय झालं असेल ते फक्त मलाच ठाऊक आहे.
९ मे २०१०, माझ्या कविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे,आणि ते ही माझ्या अनुपस्थितीत. चालयचंच! इतकी मोठी गोष्ट देवाने पदरात घातलीये.. तर छोट्याश्या गोष्टीसाठी उदास कशाला व्हायचं!
आज जर स्वतःला यशस्वी समजायचं म्हंटलं, तर या यशामध्ये माझ्या आईच्या बरोबरीने वाटा कोणाचा असेल तर तो मिसळपाव चा आहे. हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो की, या मिसळपावच्या संपादक मंडळात मी आहे. मिसळपाव आणि मिपाकर यांना धन्यवाद मी नाही देणार, कारण यांच्या ऋणात मला रहायचं आहे.
एक मिपाकर म्हणून, माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला माझ्या मिपाकर मित्रमैत्रीणींनी जरूर उपस्थित रहावे असा हट्ट करते आहे. प्राजु आणि मिसळपाव यांच्यावतीने आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ :
चित्तरंजन वाटिका,
"जिव्हाळा", वसुंधरा वाचनालय हॉल,
मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे
वेळ : ९ मे २०१०, सकाळी १०.०० वाजता.
मान्य आहे मला, रविवार सकाळ आहे.. उशिरा उठण्याचा हक्काचा दिवस आहे.. पण तुमच्या या मैत्रीणीसाठी हा एकच दिवस थोडंसं लवकर उठून नक्की उपस्थित रहा... अशी मी विनंती करते. कोणाला शक्य असेल तर, इथे वृत्तातही लिहावा. मला वृत्तांत तरी वाचायला मिळेल.
आणखी काय मागू मी ?
- प्राजु
स्थळ :
चित्तरंजन वाटिका,
"जिव्हाळा", वसुंधरा वाचनालय हॉल,
मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे
वेळ : ९ मे २०१०, सकाळी १०.०० वाजता.
मान्य आहे मला, रविवार सकाळ आहे.. उशिरा उठण्याचा हक्काचा दिवस आहे.. पण तुमच्या या मैत्रीणीसाठी हा एकच दिवस थोडंसं लवकर उठून नक्की उपस्थित रहा... अशी मी विनंती करते. कोणाला शक्य असेल तर, इथे वृत्तातही लिहावा. मला वृत्तांत तरी वाचायला मिळेल.
आणखी काय मागू मी ?
- प्राजु
प्रतिक्रिया
सध्या फक्त
तुझ्याबरो
अभिनंदन! -- इ
तिथे व्यक्तिशः नसणार् याचा खेद आहे, पण खूप शुभेच्छा!
अभिनंदन
अभिनंदन!अभिनंदन!!
प्राजुतै
अभिनंदन
त्रिवार अभिनंदन.
खूप खूप
अभिनंदन...!
प्राजू, पहिल्या कवितासंग्रहाबद्दल
असेच म्हणतो
अभिनंदन
वाह!
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन...
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन प्राजु
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणते
अभिनंदन
अभिनंदन
प्राजु ताई
मनःपुर्वक
अभिनंदन
अभिनंदन!
छान!!
अभिनंदन!!!!!
श्री. लक्ष्मीकांत देशमुख
हो जरूर. -
मनःपूर्वक शुभेच्छा ! ! !
सर्वांचे
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
प्राजुताई,
अभिनंदन
अभिनंदन
शब्दांना
प्राजुतै
प्राजुतै....
अभिनंदन आणि शुभेच्छा......
अभिनंदन
मस्त बातमी !
अभिनंदन
पुन्हा
अभिनंदन
आमंत्रण पत्रिका फारच छान आहे...
Pagination