Skip to main content

कामगार आम्ही कामगार असतो

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 04/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कामगार आम्ही कामगार असतो कामगार आम्ही कामगार असतो ठिणगी ठिणगी एक होतो धमन्यातले रक्त जाळतो मोठ्या आगीचे एकक असतो कामगार आम्ही कामगार असतो देशाच्या प्रगतीची ओळख असतो वेगवेगळे हात एकवटतो तुकड्यातुकड्यांचे एकसंध निर्मीतो कामगार आम्ही कामगार असतो श्रमांचे आम्ही मोल असतो कपाळावरच्या भाग्यरेषांतूनी घामाच्या नद्या वाहवतो कामगार आम्ही कामगार असतो भक्कम हातांच्या मुठी वळवतो वज्रालाही पिघळवतो मनगटासारखे कांबवतो विश्वकुटूंबातील घटक असतो भिन्न देश अन भाषा जरी असो संकेतांना अनुसरतो विचार कृतीत रुपांतरतो अजस्र यंत्राचा एक भाग असतो आम्ही हलतो, विश्व तोलतो समुहाच्या नात्यातून कामगारांतील माणूसपण जपतो - पाषाणभेद (दगडफोड्या) ०१/०५/२०१० जागतिक कामगारदिन
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2246
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

सुंदर!!!! खरच. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

पाषाणभेद कविता आवडली. एकदम " नव्या मनूतील गिरीधर पुतळा " ह्या कवितेची आठवण झाली. चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके