Skip to main content

समोर आता येते कशाला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
समोर आता येते कशाला
समोर आता येते कशाला ||धृ||
समोर आता येते कशाला, तिर नजरेचा मारतेस मला मदनबाण लागतो ग उरी, जखम खोलवरी ठाव नाही ग तुला ||
समोर आता येते कशाला ||१||
याद असतीस मनी राहूनीया दुरी काळीज धडधडता काय न कळे ग मला होईल वेडा असेच वाटे ग मला ||
समोर आता येते कशाला ||२||
वाटे संगती असावीस सदा, नयनी माझ्या न गाळावे आसवांना कितीदा तरी हसलो समोरी, तू ग उभी तरीही न कळावे का तुला ||
समोर आता येते कशाला ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०४/२०१०
काव्यरस

वाचने 1155
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया