शैलेन्द्र, पुष्पक विमानाला गरुड जोडायची आवश्यकता नसते. त्यामुळे जंगलात निघून गेलेले "गरूड" हे "ते" नसतील! :)
कदाचित माणसाने माणूसपण सोडल्यामुळे गरूड त्यांचे गरूड-पण टिकवण्यासाठी दूर निघून गेले असतील! आपण त्यांना डिस्कव्हरी' वर बघू शकता!
आणि तुम्हाला चष्म्याचा नम्बर कमी करायचा असेल तर हा उपाय करून पहा... अगदी ६० व्या वर्षी देखील चष्मा कायमस्वरूपी जाऊ शकतो!..
आणि हो... 'श्रद्धा' ही तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. काही कुचकामी शंकासूरांमुळे "श्रद्धा" डळमळीत झाली, तरी.. सूर्याची तेजस्वी किरणं त्यांचं काम व्यवस्थित करतील.... त्यामुळे मनात शंका न आणू देता सूर्योपासना नियमित चालू ठेवणे केव्हाही उचित ठरेल!
डोळे नक्की उघडतील!.....
अं.. अं....
म्हणजे.... नक्की सुधारतील!!! :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
"शैलेन्द्र, पुष्पक विमानाला गरुड जोडायची आवश्यकता नसते. त्यामुळे जंगलात निघून गेलेले "गरूड" हे "ते" नसतील!"
वा, तुम्हांला अगदी खत्रीशीर माहीती दिसते, कशावर चालायच हो हे विमान मग? म्हणजे त्याकाळीही खनीज तेल नव्हत, ऊद्याही नसेल.. तुम्ही त्या इंधनाच पेटंट घेवुन ठेवा.
"आणि तुम्हाला चष्म्याचा नम्बर कमी करायचा असेल तर हा उपाय करून पहा..."
मी सुर्य नाही पण रोज बरेच चंद्र पाहतो, डोळे निवतात. त्यामुळे चष्मा नाही.
"काही कुचकामी शंकासूरांमुळे "श्रद्धा" डळमळीत झाली, तरी.."
शंकासुरांना कुचकामी म्हणु नका, जगात जी थोडीफार सुधारणा व विकास होतो तो या कुचकामी लोकांमुळेच...
शंकासुरांना कुचकामी म्हणु नका, जगात जी थोडीफार सुधारणा व विकास होतो तो या कुचकामी लोकांमुळेच...
ग्रेट !! खरं तर हे प्रकटन एका नविन धाग्याचा विषय होऊ शकतो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
माझे आजोबा शतायुषी होते व माझ्या देखत मी चाललो रे असे म्हणत त्यानी प्राणत्याग केला. त्यांची नजर खूप कमजोर होती जन्मापासून च ११-१२ नंबर होता. (अर्थात हे नंतर कळले कारण त्याकाळी त्यांना चष्माच १४ व्या वर्षी मिळाला) जवळपास सारे उच्च शिक्षण त्यांनी केवळ श्रवण आणि स्मरण या आधारे केले. मला त्यांचा २५ वर्षांचा अखंड सहवास मिळाला आहे.
मोतिबिंदूच्या ऑपरेशन नंतर दे़खील फार सुधारणा होईना म्हणून त्यांनी १९८५ मधे चांदी ची सूर्य प्रतिमा करुन रोज सकाळी ७-७.३० वा. अंगणात पूर्वेकडे अभिमुख आसना मधे चाक्षुषोपनिषदाचा व सौर सूक्ताचा पाठ आमच्या गुरुजींच्या सल्याने केला. मी समक्ष त्यांच्या नजरे मधली सुधारणा अनुभवली आहे.
>>तसेच आम्बेडकरांनी "मनुस्मृती" जाळली.. म्हणजे... ती ब्राह्मणांनीच लिहिलेली असावी.. असे मानणारा समाज हा ९८% आहे.
९८% टक्के (हा आकडा तुम्हीच दिला आहे) लोकांना वाटते ते खरेच आहे. कारण आज उपलब्ध असलेली मनुस्मृती (इ. स. ६०० पासून जशीच्या तशी उपलब्ध असलेली) ब्राह्मणांनीच संकलित केलेली आहे. संकलित करताना स्वतःची महती आणि स्वतःला सोयीची वचने घुसडली आहेत. मूळ मनू क्षत्रिय होता की शूद्र होता हे गैरलागू मुद्दे आहेत. आणि बिनमहत्त्वाचे आहेत.
>>कारण वेदांनीच स्त्री'ला लक्ष्मी, सरस्वती, गौरी, गायत्री, काली या देवीच्या रूपात प्रथम पाहिले आहे.
>>मनाच्या तेजस्वितेसाठी असलेला पवित्र "गायत्री मंत्र", पर्जन्यवृष्टीसाठी "वरूण मन्त्र", अग्नि-मंत्र , सूर्य-मंत्र .. इ. आणि अजून काही असंख्य मंत्र अथर्ववेद, वेदांमधील ऋचा, उपनिषदे यांच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत.. आणि आजच्या जमान्यातही हे मंत्र विलक्षण प्रभावी आहेत.
उदा. रोज सकाळी सूर्य उगवताना त्यास अर्घ्य देऊन १२ वेळा श्रद्धापूर्वक सूर्यमंत्र म्हटला असता... डोळ्यांचे आरोग्य उत्तम रहाते. तसेच चष्मा असणार्यांचा नंबर, हा उपाय नियमित केला असता झपाट्याने कमी होतो.
>>सध्या आपण "मॉडर्न टेक्नॉलॉजी" म्हणून जे काही शोध लावले... ते कित्येक वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी यशस्वीरीत्या लावलेले होते.उदा- पुष्पक विमान.. अर्थात.. त्यांची मांडणी करायची पद्धत थोडी वेगळी होती.
=)) =)) चालू द्या. असो. लवकरच पश्चिमेतले (की इंडोनिशिया मलेशियातले?) चष्म्यांचे कारखाने बंद पडणार आहेत अशी इन्सायडर टिप दिल्याबद्दल धन्यवाद. कुणा मिपाकरांकडे त्या कंपण्यांचे शेअर असतील तर ते विकून टाकावे.
गेल्यावर्षी वरुणमंत्र म्हणून पाहिला होता का? नाही...पाऊस पडला नाही म्हणून विचारतोय.
>>पण गंमत अशी, की इन्डोनेशिया,मलेशिया इ. पौर्वात्य देशांनी आणि अमेरिका, युरोप येथील अनेक संस्थांनी या मंत्रांच महत्व पर्यायाने ऋषी-मुनींनी भारताला बहाल केलेल्या अमोलिक देणगीचं महत्व ओळखलेलं आहे. आणि त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी विविध प्रोजेक्ट्स वरती काम चालू आहे.
पुन्हा तेच. चालू द्या.
>>मूळच्या भारतीय संस्कृतीत असलेलं "योगा" पाश्चात्यांनी आपलंसं केल्यावर मग आपल्याकडे त्याचं महत्व वाढू लगलं.
>>पण पाश्चात्यांनी भारतीय झाडू फिरवल्याशिवाय काही लोकांच्या बुद्धीला लागलेली जळमटं झटकली जात नाही
असेल. पण त्यांनी सांगितले म्हणून आम्ही ते मान्य करतो असे तुम्हाला वाटत असेल तर तसे काही नाही. मी तरी अजून योगाच्या सहाय्याने रोग बरे करता येतात यावर विश्वास ठेवत नाही. एकूण 'व्यायाम करण्याने' जेवढे फायदे लाइफस्टाईल आजार वगैरेमध्ये होतात त्याहून काही खास फायदे योगासने करण्याने होत नाहीत असेच मी मानतो. (कुंकुमादितैलम वापरल्याने गोरेपणा वाढतो असे युनिलिव्हरने सांगितले तरी मी त्यावर विश्वास ठेवत नाही). ;)
तसेच तुमच्या दयाळू माहितीसाठी : मनुस्मृतीवर टीका मी बुह्लरचे भाषांतर वाचून करीत नाही. भारतीयांची पुस्तके वाचूनच करतो.
नितिन थत्ते
चालू द्यात थत्तेसेठ ...
१. "दयाळू माहिती" यातलं मूळ इंग्लिशच चुकीचं आहे.
२. सूर्याकडे योग्य फिल्टरशिवाय बघू नका, नंबर कमी होऊन चष्मा जाण्यापेक्षा डोळे जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
अदिती
>>नंबर कमी होऊन चष्मा जाण्यापेक्षा डोळे जाण्याचीच शक्यता जास्त आहे
ओ.... तुम्ही अंतिम परिणामाकडे लक्ष द्या. डोळे गेले की चष्मा आपोआपच जाईल ना !!!! अंतिम उद्देश काय? चष्मा जाणे. मग मंत्राचा फायदा होणारच की. मधल्या डोळे जातील वगैरे तपशीलाकडे लक्ष देऊ नका.
=))
नितिन थत्ते
असेल. पण त्यांनी सांगितले म्हणून आम्ही ते मान्य करतो असे तुम्हाला वाटत असेल तर तसे काही नाही. मी तरी अजून योगाच्या सहाय्याने रोग बरे करता येतात यावर विश्वास ठेवत नाही. एकूण 'व्यायाम करण्याने' जेवढे फायदे लाइफस्टाईल आजार वगैरेमध्ये होतात त्याहून काही खास फायदे योगासने करण्याने होत नाहीत असेच मी मानतो. (कुंकुमादितैलम वापरल्याने गोरेपणा वाढतो असे युनिलिव्हरने सांगितले तरी मी त्यावर विश्वास ठेवत नाही).
अं.. हं.... ह्म्म्म्म्म... SOOOOOOO CHILDISHHHH!!!! =))
नितीन थत्ते!... इथे तुमच्या मानण्याने किन्वा न मानण्याने काहीच फरक पडत नाही! :) कारण "योगा"चं महत्च जगातले ९०% लोक मानतात! (अर्थात त्याच्यातले खूप कमी लोक प्रत्यक्ष योगा करतात!... पण बाकीचे योगा न करणारे लोकही "योगा" चं महत्व कधीच अमान्य करत नाही!)
नितीन थत्ते ... बहुधा आपण योगा न मानणार्या ०.००१ % लोकांपैकी दिसता! =)) (बाकीचे % लोक न्युट्रल असू शकतात!)
असो... ""एकूण 'व्यायाम करण्याने' जेवढे फायदे लाइफस्टाईल आजार वगैरेमध्ये होतात त्याहून काही खास फायदे योगासने करण्याने होत नाहीत असेच मी मानतो.
""
याचा अर्थ तुम्हाला स्वतःला कळला असेल.. तर कृपया विस्ताराने सांगा! :) =)) =)) =))
कदाचित ,सर्व व्यायाम-प्रकारांचे मूळ "योगा" आहे, अनेक छोट्या-मोठ्या रोगांच्या उच्चाटनासाठी मोठमोठे डॉक्टर देखील काही योगासने करण्यास सांगतात.... याचे ज्ञान बहुधा तुम्हाला नसावे!
:( :-?
तुमचे ते "शाहू- महाराज" देखील योगा करायचे बरं!
आणि.. हे "शाहू-महाराज" देखील वेद-ग्रंथांना मानणारे होते हं!!! :) .... :) :) :)
असू दे!... पण ओव्हरऑल... नितीन थत्ते... तुमचा योगा, आयुर्वेद (कुम्कुमादितैलम).. यान्च्याबद्दलचा "व्ह्यु" बर्यापैकी अपरिपक्व, आणि तकलादू दिसतोय... त्यामुळे अश्या बाळबोध प्रतिक्रिया देण्याआधी सखोल अभ्यास करा!... कारण "युनिलिव्हर"मधला नुसता "यु" बनण्यासाठी पण खूप मेहनत करावी लागते! :)
तसेच तुमच्या दयाळू माहितीसाठी : मनुस्मृतीवर टीका मी बुह्लरचे भाषांतर वाचून करीत नाही. भारतीयांची पुस्तके वाचूनच करतो.
=)) =)) =)) =)) =))
नितीन थत्ते, तुम्हाला असलेली माहितीच फारच दयनीय आहे हो! :)
म्हणजे अजून तुम्ही स्वतः मनुस्मृती वाचलेलीच नाही! :-?
उगीच इकडची - तिकडची पुस्तके वाचून मत बनवणार्या "कॅटॅगिरी" मधले तुम्ही दिसता!...
असो, १ दयाळू सल्ला: अशी इतरांची पुस्तके वाचून मते बनवण्यापेक्षा प्रत्यक्ष "ऋग्वेद", "यजुर्वेद ", "उपनिषदे" इ. अमूल्य ग्रंथसम्पदा एकदा निर्मळ मनाने वाचा!
अहो! पूर्वी मंत्रोच्चारांमुळे दगडालाही पाझर फुटायचा! :-? ... तुम्ही तर माणूस :/ आहात!
अर्थात.. पूर्वीचे ऋषी-मुनी ही तेवढे तेजस्वी आणि "पॉवरफूल" होते!
पण दुर्दैवाने आज त्याच ऋषी-मुनींचे -- "कुलदीपक आणि कुलकन्यका" यांना मात्र मंत्रोच्चारांचे महत्व पटेनासे झालेले आहे. त्यामुळे मंत्रांची हेटाळणी करुन 'आपण किती मॉडर्न आहोत'.. याचा आभास निर्माण करण्यातच त्यांना धन्यता वाटत आहे! :|
असो... कालाय तस्मै नम: |
आणि हो, काही लोकांनी त्यांचं आडनाव बदललं, तरी पण त्यांची मूळ मानसिकता मात्र "जात" नाही!.... कुठेतरी "तो" वेदांबद्दलचा द्वेष उफाळून येतोच्च!
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
"परन्तु, इंग्रजांच्या राजवटीपासून आणि नंतर काही समाजविघातक शक्तींमुळे पवित्र -मन्त्र शक्तीची हेटाळणी होऊ लागली. तसेच संपूर्ण समाजाची वृत्ती ही पूर्णपणे "मनी-ओरिएंटेड" झाल्यामुळे मंत्र-तंत्र हे फक्त "काला जादू" म्हणूनच वापरले जातात.. असा गैरसमजही रूढ झाला. "
बापरे, हा मात्र बंपर आहे.
हे सगळे मंत्र असताना ते शिंचे इंग्रज आलेच कसे इथे?
>>हे सगळे मंत्र असताना ते शिंचे इंग्रज आलेच कसे इथे?
तुमच्या अज्ञानाची मला किव वाटते. इंग्रज हे हनुमानाचे वंशज होते/आहेत. रामाने हनुमानाला, भविष्यात तुमचे राज्य येईल असा वर दिला होता. त्यामुळे, ते राज्य येणारच होते. तुम्ही मत्रांना नाहक बदनाम करत आहात. आपले पुर्वज महान होते. त्यावर तुम्ही शंकाच कशी घेउ शकता?
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
तुमच्या अज्ञानाची मला किव वाटते. इंग्रज हे हनुमानाचे वंशज होते/आहेत. रामाने हनुमानाला, भविष्यात तुमचे राज्य येईल असा वर दिला होता. त्यामुळे, ते राज्य येणारच होते. तुम्ही मत्रांना नाहक बदनाम करत आहात. आपले पुर्वज महान होते. त्यावर तुम्ही शंकाच कशी घेउ शकता?
महारूद्र चिरंजीवी "हनुमान" हे हिंदूंचे परमदैवत आहे. कृपया हिन्दूंच्या कोणत्याही दैवताची चेष्टा, हेटाळणी करू नये! :|
किमान हिन्दवी-स्वराज्य-संस्थापकांना मानणार्या "१२ x ८" कुळीं कडून तरी अशी अपेक्षा नाही!
अन्यथा सूर्योपासनेबरोबर सूर्याजीं'चाही इतिहास इथे नमूद करावा लागेल!
|| जय हनुमान || ||जय परशुराम|| || जय जय रघुवीर समर्थ ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
"किमान हिन्दवी-स्वराज्य-संस्थापकांना मानणार्या "१२ x ८" कुळीं कडून तरी अशी अपेक्षा नाही!"
बर्यापैकी व्यक्तीगत व जातियवादी विधान
"अन्यथा सूर्योपासनेबरोबर सूर्याजीं'चाही इतिहास इथे नमूद करावा लागेल!"
सुर्याजी ही व्यक्ती नसुन एक प्रवृत्ती आहे असे मला वाटते.
(जातीबाहेरचा) शैलेन्द्र.
अन्यथा सूर्योपासनेबरोबर सूर्याजीं'चाही इतिहास इथे नमूद करावा लागेल!
सूर्याजी चा काय इतिहास सांगता ? आम्हालाहि परशूराम आणि रामदासाचा इतिहास नमुद करावा लागेल !
चातुर्वर्णा बाहेरचा VarKari
प्रयत्न केला .... पण बहुधा काही तांत्रिक बिघाडामुळे तु नलीका उघडली जात नाही. तरीदेखील नंतर प्रयत्न करीन.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
मृगनयनी जीं चे असे म्हणणे दिसले की मूळ लेखात मी मनुस्मृतीचा उल्लेख करताना ब-याच वेळा ब्राह्मणाना त्यात ओढले आहे. एखाद्या विषयावर काही लिखाण वा मत मांडावे लागले व त्यासाठी इतिहासाचे दाखले द्यावे लागले किंवा काही विशेष नोंदी घ्याव्या लागल्या तर ती बाब अपरिहार्य मानली पाहिजे, भले मग ती पुराव्याने सिद्ध करा किंवा त्या बाबतीत समाजात असलेला विश्वास मानाने असो. एखादा "पवार" किंवा "पाटील" असे काही लिहितो त्यावेळी त्याच्या नजरेसमोर एकच विशिष्ट आणि पारंपारिक हेतू असतो असे मानने केवळ चुकीचे नसून त्याच्या या बाबतीतील त्याने केलेल्या अभ्यासावर अन्याय करणारे असते. उथळपणाने जर अशा नाजूक/भावनिक विषयावर एखाद्याने लेखन केले असेल तर वाचणा-याला त्यातील फोलपणा चटकन जाणवतोदेखील. येथे काही गंभीर विषयावर प्रतिबिम्बित झालेल्या एक दोन ओळींच्या सैलसर टिपण्या पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने जाणवते की या सुंदर संस्थाळाचा वापर काही लोक केवळ "To Kill the free time" अशा समजुतीनेच करतात. (हे माझे अत्यंत वैयक्तिक निरीक्षण/मत आहे, तक्रार नव्हे हे कृपया ध्यानात घ्यावे .... !) अर्थात अशा नोंदीना दुर्लक्षीत करणे एवढेच आपल्या हातात असते. असो.
मुद्दा असा कि, "ब्राह्मणाना त्यात ओढले आहे".... याला कायदेशीर आधार आहे. १८५६ साली ब्रिटीशांनी एक कायदा केला होता, तो "Hindu Widow's Remarriage Act" या नावाने अमलात आणला गेला. मनुस्मृतीप्रमाणे हिंदू स्त्रीचे लग्न फक्त एकदाच होते. पती निधना नंतर तिने पुन्हा लग्न करू नये, असे बंधन स्मृतीत आहे. तीवर त्यावेळच्या ब-याच समाज सुधारकांनी आवाज उठविला व आपल्या उदारमतवादी धोरणानुसार ब्रिटीशांनी तो कायदा केला व विधवा स्त्रीस (तिची इच्छा असल्यास...) पुनर्विवाहाचा हक्क प्रदान केला. अर्थात सनातन्यांना हे मान्य होणे शक्यच नव्हते, आणि १८५७ च्या उठावाची जी काही कारणे होती ती मध्ये "स्मृती कायद्यात ढवळाढवळ" हे देखील एक प्रमुख कारण होते. उठाव अयशस्वी झाल्यानंतर १८५८ च्या राणीच्या जाहीरनाम्यात "हिंदू कायद्यात" रीतसर आणि सुसंगत मांडणी करण्याचा प्रयत्न त्या वेळच्या काही कायदेपंडितांनी केला; त्यातील प्रमुख म्हणजे सर दिनशा मुल्ला व सर जे. डी. मेन. या दोघांचे या विषयावरील "Hindu Law and Usage" हे आजही कायदे शिक्षण घेणा-यांच्या अभ्यास क्रमात (संदर्भ म्हणून) समाविष्ट आहेत.
येथे सर मेन यांनी काय निरीक्षण केले आहे ते वाचणे रोचक आहे. त्यांनी नोंदले कि, "Manusmriti's law does not as a whole represent a set of rules ever actually administered in Hindustan. It is, in great part, an ideal picture of that, which, in the view of the BRAHMINS, ought to be the law." यावर काय भाष्य करायचे? जर कायदे पंडीतानीच असे नोंदविले आहे की, "ब्राह्मण म्हणेल तोच आदर्श कायदा अशी स्थिती होती..." तर मग आमच्यासारख्या बोळातल्या ब्रॅडमनची काय कथा ?
असे असले तरी आपण सर्वांचे (श्रीमती मृग नयनी , श्री. नितीन थत्ते , अदिती, श्री. जयंत कुलकर्णी, श्री. शैलेन्द्र इत्यादींचे) या निमित्ताने एका अभ्यासपूर्ण चर्चेबद्दल मन:पूर्वक आभार ! प्लीज कंटीन्यु !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
यावर काय भाष्य करायचे? जर कायदे पंडीतानीच असे नोंदविले आहे की, "ब्राह्मण म्हणेल तोच आदर्श कायदा अशी स्थिती होती..." तर मग आमच्यासारख्या बोळातल्या ब्रॅडमनची काय कथा ?
पवार साहेब आहो तेव्हाचा काळ वेगळा होता.चाली, रीती, परंपरा सर्व काही वेगळच होत. चालु काळाशी तुम्ही या गोष्टीची तुलना करु नका.
किती काळ आपण याच गोष्टीला कवटाळुन बसणार आहोत??
मनुस्म्रुती मी अजुन वाचला नाही.त्यामुळे त्यात नक्की काय लिहिल आहे याचा अंदाज मला नाही. परंतु त्या ग्रंथात जे काही लिहिल असेल ते सर्व त्याच काळाशी निगडीत असेल.
त्यात जे काही कथन केले असेल ते सर्वच ग्राह्य कसे मानुन चालेल?
काळाप्रमाणे समाजही बदललो आणि समाज व्यवस्था सुद्धा.
काय खमंग चर्चा चालली आहे. मला वाटते,
१) कुठलाहि काळ त्याच्या मागच्या काळापेक्षा पुढारलेला होता आणि पुढच्या काळापेक्षा मागासलेला होता
२) सर्वकाळी लोक जुने कायदे आवश्यकतेनुसार बदलत होते, नवीन निर्माण करत होते. (कायद्याचा सोईनुसार अर्थ लावणे म्हणजे कायदा बदलणेच होय)
३) सर्वकाळी समाजात कायदा नि:पक्षपाती होता. कायद्याचा वापर करणारे विवेकी आहेत कि अविवेकी, लोक वत्सल आहेत कि स्वार्थी, यावर कायद्याची उपयोगीता ठरत आली आहे.
४) आजच्या वैज्ञानीक प्रगतीचा आणि मानवाच्या विवेकाधिष्टीत विचारसरणीचा अर्थाअर्थी काही संबंध नाहि. ज्ञान हे गरजेतुन, चिकित्सक दृष्टीकोनातुन तयार होते. "कार्यकारण भाव सम़जावुन घ्यायची ईच्छा असणे आणि त्यावरुन परीक्षा करणे" याला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणतात. हा दृष्टीकोन आज सो कॉल्ड २१ व्या शतकात, वैज्ञानिक युगात जास्त आहे हे म्हणणे भाभडेपणाचे ठरेल.
५) कुठल्याहि शक्तीचा माणसच्या "माणुसकी"शी संबंध नाहि. (रामायण इतिहास मानला तर) वाल्या कोळि कुठलिही अतींद्रिय शक्ती नसताना एक सहृदय कवी-महर्शी बनला तर रावण एक ब्राह्मण असुनही शक्तीच्या उन्मत्तपणातुन खलनायक बनला.
६) पुढे चालताना मागे वळुन का बघावे ? तर आपण कठुन आलो, सोबत काय आणलय, त्याचा पुढच्या प्रवसाला त्याचा काय उपयोग आहे, आपली दिशा कुठली हे ठरवुन पुढे चालत जायचे आहे. हा पुढला प्रवास नसेल तर मागे वळुन बघण्यात काहि अर्थ नाहि. आणि हा प्रवास असेल तर मागच्या प्रवासाचं भान आवश्यक आहे... नाहि तर चुक हमखास होणारच होणार.
७) वेदांमधे मंत्रशक्तीचे प्रयोग खरच आहेत कि उगाच गप्पा आहेत, योगशास्त्र मनुष्याला खरच अतींद्रिय शक्ती देतात कि नाहि हा विषय वेगळा. मी वैयक्तीकरित्या या शक्ती असाव्या असं मानतो. मध्यंतरी "एका योग्याचे आत्मचरित्र" हे स्वामी योगानंदाचं चरित्र वाचण्यात आलं. त्यात योगीक चमत्काराच्या बर्याच गोष्टी आहेत. शिवाय ज्ञानेश्वर माउली, समर्थ रामदासस्वामी, विवेकानंद इ. मंडळींच्या योगीक चमत्काराच्या गोष्टी ऐकुन आहे. कबीर, मीराबाई यांच्या भक्ती कथा ऐकुन आहे. आता हे सर्वच्या सर्व खोटं आहे, हे लोकं वा त्यांच्या गोष्टी सांगणारे मानसीकरित्या 'डिफेक्टीव' होते, बंडलबाज होते, हे मला तरी पटत नाहि. पण पुन्हा, या योगशक्तींचा समाजात माणुसकी वाढवायला काहि उपयोग उपयोग नाहि. या सर्वांनीही योगशक्तीचा प्रचार न करता प्रेमाचाच संदेश दिला आहे.
८) समाजीक उतरंड टाळता येणे शक्य नाहि. या उतरंडीत वरच्या पातळीला खालच्या पातळीबद्दल किती कणव, प्रेम, आपुलकी आणि त्यांच्या उत्थानाचि तळ्मळ आहे यावर सामजीक स्वास्थ्य अवलंबुन आहे. वैज्ञानिक प्रगती, योगशक्ती, रुढी, परंपरा, या सर्व गोष्टी माणसाचि नियत कशी आहे यावरुन चांगला वा वाईट परिणाम करत असतात.
९) माणसाचि नियत सुधारण्याच्या बाबतीत (किमान आजचं) विज्ञान काहिच करु शकत नाहि.
हुश्श्श्..... विषयाला धरुन आणि सोडुन बरच लिहीणं झालं. वाचक मायबाप योग्य सल्ले देतिलच :)
(पुढे बघुन चालणारा) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
"....विषयाला धरुन आणि सोडुन बरच लिहीणं झालं...."
नाही, व्यक्तिशः एक वाचक या नात्याने तर मी असे म्हणेन की, आपण मांडलेले सर्वच मुद्दे स्वतंत्र धाग्याचे विषय आहेत.
विशेषतः "सामाजीक उतरंड टाळता येणे शक्य नाहि." हे प्रकटन तर जळजळीत निखा-याइतके सत्य आहे
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
उदा. रोज सकाळी सूर्य उगवताना त्यास अर्घ्य देऊन १२ वेळा श्रद्धापूर्वक सूर्यमंत्र म्हटला असता... डोळ्यांचे आरोग्य उत्तम रहाते. तसेच चष्मा असणार्यांचा नंबर, हा उपाय नियमित केला असता झपाट्याने कमी होतो.
बरं झालं सांगितलं ! मी आता रोज सकाळी सुर्य उग्वताना त्यास २४ वेळा "अर्ध्य" का ? पुर्ण श्रध्दापुर्वक सुर्यमंत्र म्हणेल !
प्रतिक्रिया
शैलेन्द्र,
"शैलेन्द्र,
कुचकामी लोकांमुळेच......
माझा अनुभव
नेहमीचेच दावे
माझा प्रतिसाद फक्त नितिन थत्तेंसाठी नाही
अंतिम उद्देश
असेल. पण
?
नितीन
पुष्पक विमान थेअरी
"परन्तु,
>>हे सगळे
तुमच्या
"किमान
किमान
अन्यथा
सूर्याजी
विमान!
ही लिंक पाहा...
लीन्क...!
गैरसमज नको....!!
यावर काय
हे नेहमी असच असतं !!
माणसाचि नियत....!
उदा. रोज