Skip to main content

लावणी: आणा मला येवला पैठणी

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 16/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आणा मला येवला पैठणी सांगून सांगून थकले हट्ट माझा पुरवा झणी आजच आणा मला येवला पैठणी ||धृ|| जरतारी आसलं काठ तिचा बारीकसर नक्षी आसलं तिच्यावर बुट्टेदार लई दिसांची ईच्छा आहे मनी आजच आणा मला येवला पैठणी ||१|| आमसूली नाहीतर रंग आणा निळा जांभळा कसा दिसलं कुणा ठावं चालंल हिरवा पिवळा आत्ताच घाई करा अन लगेच जावा धनी आजच आणा मला येवला पैठणी ||२|| नितळ काया माझी वर तुमची माया जीव लावायचं शिकावं तुमच्याकडून राया आहे गरज झाकायची ज्वानी आरसपानी आजच आणा मला येवला पैठणी ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/०४/२०१०
काव्यरस

वाचने 2887
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by चित्रगुप्त

चित्रे अन फोटो यांचा अधिकार तुमचा आहे. आमचा नाही. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

लावणी लय जोरदार. बाबुराव :)

लाव् नि लय सुन्द् र झालिया

>> जीव लावायचं शिकावं तुमच्याकडून राया >> आहा!! क्या बात है! मजा आली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

लावणी छान जमली आहे. तुमच्या अलिकड्च्या द्वैर्थी लावण्यांपेक्षा वेगळी. नंदू

In reply to by नंदू

आमी कवा दोन अरथी लिवलं. तुमच्याच मनात आसलं तसलं कायबाय! आमी तर सरळसोट लिवतो. उगा शेनसार ची कातरी नगं. नाय का?