खट खट, खट खट, खटक!!
काल एक बातमी वाचली. मुंबापुरीची.
एका मध्यमवर्गीय वस्तीत घडलेली.
झाल काय; एका घरा समोर पत्रे येऊन पडू लागली. मजकूर घरच्या स्त्री चा चारित्र्य हनन करणारा.
जोडप पहिला थोड अस्वस्थ, मग मात्र तिसरया पत्रानंतर त्यांनी कॅमेरा बसवला.
फिरून तीनदा पत्र टाकताना त्यांना त्यांची शेजारीण दिसली.
एका बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या घरा घरातून दिसणाऱ्या चढ ओढी चा हा थोडा अतिरेकी नमुना.
पोलीस केस झाली, आपल्या घरात नवऱ्यावर शेअर बाजारात पैसे घालवल्या बद्दल नाराज असणाऱ्या त्या शेजारणीला, यांची समृद्धी खुपू लागली.
असूया, द्वेष या भावनेतून वरील कृत्य घडले.
गोष्ट इथेपर्यंत वाचून पान पालटायला हरकत नव्हती.
पण मला खटकला तो त्यानंतरचा नाट्य पूर्ण भाग.
जिने हा गुन्हा (की आगळीक?) केली, ती जामिनावर घरी परतली. (जामीन कोणी भरला त्याचा उल्लेख नव्हता)
घर बंद. पेपर मध्ये बातमी अशी की तिच्या घरच्यांनी तिला lock out केल.
means they have shunned her. इथ मला खटकायला सुरुवात झाली.
आपल्या आजूबाजूला गुन्हे घडताना आपण लहानपणा पासून पाहतो. आपल्या परिसरात पोलीस येतात, आपल्यातीलच एखादा रोजच्या पाहण्यातला काका अथवा दादा बेड्या घालून नेला जातो.अर्थात हे रोजच नसत. कधीतरी घडत आणि आपण खळबळून जातो.
गुन्हा अर्थातच साधारण असतो. घरची माणसं सुरवातीला गप्प, मग हळू हळू आपल्यात मिसळतात. वाईट संगतीला लागला, अथवा थोडा वाहावला
अस बोललं जात. सहा महिने वर्षभरान तो परत येतो, या मधल्या काळात त्याची पत्नी अथवा त्याचे जिवलग तो परत येण्याची वाट पाहतात.
मग हिच्या बाबतीत का अस? नाही मी स्त्री मुक्ती वगैरे नाही खेचत आहे.
मला खटकल ते नवरा जेंव्हा एखादी आगळीक करतो ,तेंव्हा अश्रु भरल्या नजरेन " का?" अस विचारणारी पण तो अपमान त्याच्याबरोबर साहणारी पत्नी, आणि तिन केलेल्या चुकीबद्दल तिच्या कडे पाठ फिरवणारा तो.
काय होत स्त्री अपराध्यांच? नाही खून वगैरे ची गोष्ट वेगळी. पण हे अस छोट मोठ चुकलेल कुणी माफ नाही का करत?
आज डोळ्यासमोर येते माझ्या शालेय जीवनातली एक घटना.
हातात पिस्तुल घेवून आपल्या मेव्हण्याला उडवणारा तो. भावाचा खून झाल्यावर पोटची दोन लहानगी (जी आमच्या शाळेत होती) घेवून ती. अन तिथून पुढे त्याला नियमित तुरुंगात भेटायला जाणारी अन त्याचा संसार सांभाळणारी ती! किती द्विधा मनस्थिती असेल तिची? माहेर, भावाची विधवा, आई वडील!
की लग्नान फक्त स्त्रीच जोडली जाते? पुरुष नाही?
तिन केलेलं कर्म तिला परत त्या घरातून बाहेर फेकू शकत? इतक सहज?
वर्गीकरण
समाज
In reply to समाज by अरुण मनोहर
तरी हजारो
In reply to तरी हजारो by युयुत्सु
>>पुण्यात
In reply to तरी हजारो by युयुत्सु
युयुत्सु
अरेरे !!
अपर्णा,
मी
अगं, तिचं
अपर्णा,
त्या