त्सुनामी मनांतले ! ! !
परवा भारतातील सगळ्या टी. व्ही. चानेल ला एकाच बातमीने ग्रासले होते इंडोनेशियांत त्सुनामी येणार ! झालं ! सगळ्यांचे मला इंडोनेशियांत फोन जप रे बाबा ! कुठे बाहेर जाऊ नकोस बुधवारी ! वगैरे वगैरे ! ! माझ्या मनांत मात्र विचारांचे वादळ सुरु होते विदेशात नोकरीसाठी एकट्या राहणाऱ्या इतर अस्वस्थ भारतीयांप्रमाणे ……………………. !
त्सुनामी मनांतले ! ! !
त्सुनामी ! त्सुनामी ! !
येणार ! येणार !
सगळेच अस्वस्थ, भितिग्रस्त.
आले, आले ! गेले ! !
हु..S...S...श्य ! ! !
निभावले एकदाचे ! ! !
तू तिथे,
अन
मी येथे ,
दूर. S...S दूर !
साता समुद्रापलीकडे ! !
त्सुनामी ! त्सुनामी !
तिकडे , अन ईकडेही !
भावनांचे,
आठवणीचे,
विचारांच्या कल्लोळांचे ! !
घोंगावते, वेगांत.
कधी तुझ्याकडे.
तुझ्याकडून माझ्याकडे,
तुझ्याकडे,
माझ्याकडे,
नित्याचेच ! !
आठवणीच्या प्रचंड लाटा
आदळतात
नयनांच्या किनाऱ्यांवर .
ओले चिम्ब किनारे,
अन
अस्वथ मनांतील उमाळे ! ! !
लाटा ओसरल्यावर
शमतात हळूहळू
आवेग भावनांचे ,
अंतर सातासमुद्राचे
सहय होते विचारांनी,
आपल्या घरट्याच्या !
इवल्याशा,
पण अथांग प्रेमाच्या ! ! !
येते उधाण पुन्हा
उत्साहाला,
नव कल्पनांना,
खुप काही करण्याच्या,
करत राहण्याच्या,
माझ्यासाठी,
तुझ्यासाठी,
अन
आपल्या इवल्याशा घरट्यासाठी ! ! !
निरंजन वहाळेकर
लेखनविषय:
याद्या
1648
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
सुंदर :
लै म्हंजे
मनोगत ! ! !
येते उधाण