Skip to main content

धन्य ! धन्य ते मरण ! ! !

धन्य ! धन्य ते मरण ! ! !

Published on सोमवार, 29/03/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
धन्य ! धन्य ते मरण ! ! ! आयुष्याच्या वळणावर यम मला भेटला म्हणाला, " कधीचंच भेटायचं होतं तुला, जरा उशीरच झाला.” .” चल आटप लवकर आता, वेळ नाही मला, सख्खे, सोयरे, जमले सारे, आता उशीर कशाला ? " मी म्हटलं, "थांब थोडं नको घाई भेट तिची बाकी, सरणावर वियोगाचे दुखः नको बाकी." प्रतीक्षेवीण भेटण्याची, नसे रीत तिची, वेळेवर आली आज, मला साथ.नशिबाची. जिच्यासाठी माझ्या नयनी, नित्य अश्रू वाहिले, कलेवर आज , तिच्या आसवांनी न्हाइले. वियोगाचे दुखः माझे, अन्ति आता शमले, अन मरण तिच्या आसवांनी धन्य धन्य झाले मरण तिच्या आसवांनी धन्य धन्य झाले ! ! ! निरंजन वाहलेकर
लेखनविषय:

याद्या 1743
प्रतिक्रिया 0