Skip to main content

खरडवाद...

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 20/03/2010 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या अनुभवावरून ठरवलं होते, आता पुन्हा नाही... वाचन मात्र आहे हे असच राहायचं... पण हा काथ्याकूट! हे धागे! हा खरडवाद!! करतात निश्चयाला दुबळे कदाचित आता सगळे नीट होईल... पुन्हा एकदा बडवला कळफलक खरडून टाकल्या एक दोन खरडी एक नवी सुरवात... एक नवा खरडवाद... केशवसुमार आमची प्रेरणा
लेखनविषय:

वाचने 1476
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

पण हा काथ्याकूट! हे धागे! हा खरडवाद!! करतात निश्चयाला दुबळे खरंय...! :) -दिलीप बिरुटे

मूळ कविता - शनी, 03/20/2010 - 0२:१३ विडंबन - शनी, 03/20/2010 - 03:05 बावन्न मिनिटात बघून, वाचून, लिहून, प्रसिद्ध करून तयार! वा! थोडाईच शब्द बदल्या है, पण ज्यो बदल्या है वो क्या सॉलिड बदल्या है! राजेश

In reply to by राजेश घासकडवी

'आशावाद' न वाचता आम्ही थेट 'खरडवाद' वाचला. >>थोडाईच शब्द बदल्या है, पण ज्यो बदल्या है वो क्या सॉलिड बदल्या है! सहमत आहे...! -दिलीप बिरुटे [आशावादी]

In reply to by राजेश घासकडवी

प्रथम वाचली तेव्हा 'प्रेरणा' दिलेली नव्हती (आणि आम्ही वाचली नव्हती ;) ) त्यामुळे केसुगुर्जींना एकदम असे काय झाले असा प्रश्न पडला, तर्री च्या ऐवजी कढी आणि तीही पातळ!! पण आता शंका मिटली! ५२ मिनिटात म्हणजे त्यांच्यासाठीच नेहमीप्रमाणेच. ;)

:) वाचनमात्र राहुन घुसमट का वाढवा ? :) बिण्धास्त टोले भाजी करावी सळोकीपळो करुन सोडावे सकलजन :)