गो नी दांचे 'कादंबरीमय शिवकाल' वाचत होतो. त्यात 'दर्या भवानी ' मध्ये उल्लेख आला 'घारापुरी' ...
द्वारकापुरी, शुर्पारक, घारापुरी, दाल्भ्य्पुरी ह्या प्राचीन सागर प्रवास मार्गातील एक...
'घारापुरी' ... मुंबईच्या इतके जवळ असुन हे ठीकाण पाहिला नाही ह्याची खंत वाटली आणि गोनींच्या शिल्प वर्णनांनी कुतुहल देखील चाळावले. लगेचच लोकसत्ते 'सीटी वाक'
च्या विनायक परबांच्या घारापुरी बद्द्ल लेख वाचला आणी ठरवले घारापुरी दर्शन करायचेच. प्र. के घाणेकरांचे 'इये महाराष्ट्र देशी' मधुन 'घारापुरीची माहिती मिळाली. मिपाकर स्वानंद ला बरोबर घेतले आणी निघालो घारापुरी बघायला. भारताच्या प्रवेशद्वाराहुन घारापुरीला जाणारी नाव पकडली, १०० रु. परतीच्या प्रवासासहित.
घारापुरीत उतरलो, १० रु देऊन छोट्या झुकझुक गाडीतुन लेण्याण्च्या पायथ्याशी पोहोचलो. खंर तर झुकझुक गाडीची काही गरजच नाही. चालत सुद्धा जाऊ शकतो आपण. दुतर्फा असलेली शोभेच्या वस्तुंची दुकाने पार करत वर लेण्यां पाशी पोहोचलो. चार पाच लेण्यांचा समुह असला तरी मुख्य शे॑व लेणंच बघण्या सारखं आहे.
हे पहा के॑लासरोहण.
शंकर पार्वती सारीपाट.
अर्धनारीनटेश्वर.
त्रिमुर्ती.. (हि ब्रम्हा, विष्णु आणि महेश नसुन, महेशाच्याच तीन रुपांची आहे.
गंगावतरण
नटराज
अश्या प्रकारे आमचे घारापुरी दर्शन सफळ संपुर्ण झाले....
वाचने
3788
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
घारापुरी
होय तेच ते
In reply to घारापुरी by चित्रगुप्त
वा!!
वा छान...
अरेच्चा!