त्यानंतर सगेळ्च थांबले आहे ...
कशाची पर्वा न करता
सूर्य उगवतो आहे, चिमण्या दाणे टिपत आहेत
मला वाटत ही शांतता संपेलच आता..
नवा बेड आणलेला दिसतो शेजारी
मुलाचे लग्न आहे
घरातल्या म्हातार्या आजीला
भरवणारी बाई..खिडकिशी आहे
गरम वारा आत येतो ..उघड्या खिडकीतून ..
तशी रेडियोवरची गाणी
कुठलीतरी बाबा आदमच्या काळातली ,नाकात गायलेली..
किती आनंदाचे दिवस उरले आहेत कुणास ठाऊक..
( एक सुंदर तरूणी
सलून मधून रस्त्यावर येते)
आली वाटत ती..
तिच्या गालावरची बट
वारा येतो , बट येते ..
(रस्त्यालाही पाने फुटतील असे वाटते अवेळी)
तिला पाहून
'आलोच आजी '- म्हणत शेजारचा देखणा तरूण बाहेर पडतो..
मोटरसायकलवर निघतो.. ऐटीत .. गर्दी सामावतो..
सगळेच थांबले आहे खर तर..
त्यानंतर..
फक्त
त्याच्या ओठातली शीळ..
फडफडणार्या विंडचिटरचा आवाज
मात्र तसाच अजून आहे कानात
~ सोनाली जोशी
लेखनविषय:
याद्या
2469
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
सोनाली,
समजलीच नाही
In reply to सोनाली, by विसोबा खेचर
पुन्हा
In reply to समजलीच नाही by सुवर्णमयी
काय तरी Tragedy
धनंजय
त्या
संदिग्धता
रसग्रहण
In reply to संदिग्धता by राजेश घासकडवी
अर्थ बरोबर आहे
In reply to संदिग्धता by राजेश घासकडवी
बाटली खालीईच करनेका, क्या?
हाहा
In reply to बाटली खालीईच करनेका, क्या? by राजेश घासकडवी
परीस्थिती गंभीर आहे.....
प्रश्न
सुर्रियल कविता
छान आहे.