Skip to main content

))तुझ्या रेशमी केसांनी((

लेखक तुका म्हणे यांनी रविवार, 14/03/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.

संदर्भ: विजूभाऊचा हा मूळ धागा: https://www.misalpav.com/node/11426#comment-182034

रेशमी केसात तुझ्या जीव माझा गुंतला
धुंद या काळ्या बटा, अन प्राण घेई मोगरा

का आता गमजा करी? तारका नभातल्या
भेटीत पहिल्याच तुझ्या, चंद्रमाही लाजला

सोडू कसा हा नाद मी, सांग तू माझ्या फुला,
प्रेमात तुझ्या भारावलो, सूर ऐसा लागला

होतो खुळा, आहे खुळा, भान न त्याचे मला
जादू भरले नैन तुझे हे, ठेवती न माझा मला,

कळले मला ग प्रेम ते, उमजले का सांग तुला,
जेव्हा तुझ्या हातास अलगद, हात माझा स्पर्शला

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1279
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया