Skip to main content

समर्थांना पत्र

लेखक नाद्खुळा यांनी शुक्रवार, 05/03/2010 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
ओम नमो गजानना | आणि समर्था तुम्ही सुद्धा || ऐकुनी घ्या भगवंता | या पाप्या चे बोल || करू कशी सुरवात | नं कळे मला मनात || ना शिरता अति खोलात | करितो दहा श्लोकी शेवट || ऐकिला का ऐसा देश | सर्व धर्मांचा चालतो पाश || अभिमानाचा नाही लवलेश | लाज वाटते सांगाया || (समर्थांना हे सांगण्यास मला लाज वाटते.. या अर्थाने ) ऐकिला का ऐसा नेता | सेवा करी जनाची येत जाता || लोकविचार करितो केंव्हा || येता वेळ निवडणुकीची | ऐकिली का ऐसी सत्ता | मिळतो पक्ष बदलण्याचा भत्ता || आज समता उद्या ममता | परवाचे काय सांगावे || ऐकिला का ऐसा रोग | कारण जायचे भोग || फसले ज्यात नाना लोग | सांगा तो कोणता || करी मत्सर दुसर्याचा | जप इकडे रामाचा|| पुण्याचा साठ फुकाचा | पाप तिकडे वाहिले || मूर्ख लक्षणे अजुनी जना | हि तर होती प्रस्तावना|| सुचतील जैसी माझिया मना| रोज सांगेन तुम्हासी || घेऊ नका देवा आता अवतार | घेतला तर होईल अविचार || जसा जाहला सावरकर | आणि सुभाष चंद्राचा || (ज्यांचे कार्य लोकांना कळलेच नाही असे हे थोर नेते म्हणून आता अवतार घेऊ नका असे देवा चरणी सांगणे ) सर्व मुर्खालाक्षाने या केदारासी | असुनी हे संगे तुम्हासी|| पहा काय गती कलियुगाची | समावितो हे चर्र्हाट || ( हे श्लोक्र रुपी काव्य १६ वर्ष जुने आहे .. ६वीत असतानाचे ) चू भू दे घे :)
लेखनविषय:

वाचने 1287
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया