गाभा:
प्रमोद महाजन यांची हत्या करणारे त्यायचं भाऊ प्रवीण महाजन यायचं आज ठाण्याच्या ज्युपीटर हॉस्पीटलात निधन झालं.
त्यायला भावाच्या हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षाबी झाली व्हती.
प्रमोद महाजनाचा खून करुन त्यायच्या आयुष्यात सुख मातर काय आलं नाय. सारं इथंच भोगावं लागतं म्हणत्यात ते काय खोटं नव्हं
राहूल महाजन यायचं लग्न सहा मार्चला व्हणार हाये ते रद्द व्हईन का. कटूता कायम राहती का ?
प्रवीण महाजन यायलाबी श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
3 Mar 2010 - 6:50 pm | नाम्या झंगाट
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
3 Mar 2010 - 6:56 pm | विसोबा खेचर
सुटला बिचारा!
3 Mar 2010 - 7:29 pm | रेवती
मलाही असच वाटलं.
सुटला बिचारा!
रेवती
3 Mar 2010 - 7:39 pm | नितिन थत्ते
>>सुटला बिचारा
बिचारा का बुवा?
नितिन थत्ते
3 Mar 2010 - 9:05 pm | शैलेन्द्र
बिचारा यासाठी कि त्याला कधी खुणाचे खरे कारण सांगताही नाही आले, हे सगळं दिसतं तितकं सरळ नाही हे सगळ्यांना माहीत असुनही खरे काय ते कधीच कुणाला कळले नाही. प्रविण महाजनची एकच बाजु समोर आली कारण दुसर्या बाजुला तळं न दीसणारी दरी होती.
3 Mar 2010 - 8:20 pm | टारझन
चला ! राहुल महाजनला अजुन पब्लिसिटी मिळेल :)
3 Mar 2010 - 8:32 pm | शानबा५१२
देवाची ईच्छा
4 Mar 2010 - 2:17 pm | अनामिका
महाजन कुटुंबाचा अजुन एक अध्याय संपला( कि संपविला नियतीने)....कालौघात हे कुटुंब देखिल लोकांच्या विस्मरणातच जाणार्...पण प्रविणच्या मृत्युने प्रमोद यांच्या मृत्युच गुढ अधिकच गडद झालय हे मात्र नक्की.
कुणाच नाही पण वाईट वाटत त्या माऊलीच ...वृद्धापकाळात त्यांच्या नशिबी अस अपार दु:ख का द्याव ईश्वराने?
असो .........
"जगी जिवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर" हेच खर
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
4 Mar 2010 - 9:02 pm | अविनाशकुलकर्णी
त्याने भारताच्या भावि पंत प्रधानाला संपवले हिच खरी मोठी शोकाम्तिका
6 Mar 2010 - 2:58 pm | घाशीराम कोतवाल १.२
प्रमोद महाजन आणी भारताचे भावी पंतप्रधान हे कसे काय बुवा ? =)) ~X( :/ :/ :/ :/ :/
कुलकर्णी साहेब प्रमोद महाजन एक उत्कृष्ट मॅनेजर होते भाजपाचे
नाही तरी सर्वात जास्त भ्रष्टाचार ह्यांच्याच काळात झाला हो....
6 Mar 2010 - 3:13 pm | II विकास II
>>नाही तरी सर्वात जास्त भ्रष्टाचार ह्यांच्याच काळात झाला हो....
ह्यासंदर्भात काही दुवा देता येईल काय?
एकुण भष्टाचाराचे प्रमाण कसे ठरवतात ते जाणुन घेण्याची इच्छा आहे. प्रमोद महाजन गेल्यानंतर भ्रष्टाचार कमी झाला का?
----
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
4 Mar 2010 - 11:16 pm | अक्षय पुर्णपात्रे
बातमी
6 Mar 2010 - 10:13 pm | वेताळ
बाकी प्रमोदचीच्या मृत्यु नंतर महाजन कुंटुब एक मनोरंजन कंपनी बनल्याचे दु:ख होते आहे.
वेताळ
6 Mar 2010 - 10:38 pm | दादा कोंडके
हम्म.
आता ही बातमी!