घन घोर मराठी पोर...{Patriotic material}..

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in जे न देखे रवी...
22 Feb 2010 - 10:25 pm

घन घोर मराठी पोर जातीची थोर लढाया आज पुढे
धार पातीची वार छातीची ढाल धराया आज पुढे

सात वेडे ते घाट मोडे जे आज मराया आज पुढे
वीर थोडे ते प्राण सोडे जे लाज धराया आज पुढे

धर्म रक्षिला मान बक्षीला कृथार्थ झाहलो आज कुठे
सत्य निश्ठीला विठ्ठल भक्तीला पावन पडलो आज कुठे

बाजी भक्तीला जीवा जातीला अमर जाहला आज इथे
आज लाभला शिवा मातीला स्वराज घडला आज इथे

आज मराठी कसा जागतो कोण साधतो राज इथे
कसा वागतो असा नाचतो कोण पहाया आज इथे

पुन्हा शिवाजी पुन्हा शिवाजी जयघोष चालला आज जिथे
जो तो मातला स्वार्थात गुंतला खेळ मांडला आज इथे...........................

मंगेश पावसकर

mgccmangeshpaw@gmail.com

वीररसमांडणी