Skip to main content

काय करावे कळेना

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 17/02/2010 05:19 या दिवशी प्रकाशित केले.

काय करावे कळेना

काय करावे कळेना मजला आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु || साडीवरती फुलली फुले, रंग तयांचा नारंगी तसलीच कुंचूकी लांब हाती, शोभतोय अंगी निर्‍या पायघोळ एकसरी, नेसण्याची रीत न्यारी पाहूण जणू वाटते तु सुरी की ग दुधारी ह्रूदय माझे तुझ्याकडे तरी जिवंत मी कसा प्रश्न मजला || १ || आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु || चाफेकळी नाक तुझे भुवयांना वक्र बाक काळे नयन पाणीदार पापण्यांची उघडझाप मादक ओठ गुलाबी शब्दांचेच मदनबाण चोरटी तू पाहू नको, मनातले सांगून टाक मोत्यांची कांकणे ल्यालीस हाती सुखावती नजरेला || २ || आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु || - पाषाणभेद (दगडफोड्या)
काव्यरस

वाचने 1390
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मस्त!!! सुंदर!!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)