नीरजा, तुझी चिडचिड समजली. काही लोकांना पैसे देऊन काय वाट्टेल ते घेता, शिकता, करता येतं; यामधे कला आणि रस्त्यावर चिरडलेल्यांची कलेवरं, सगळंच सारखं!
अदिती
वा! छान!! काळा घोडा इथे होणार्या कलात्सोवाला सुद्धा आता बांद्राच्या माउंट मेरीच्या जत्रे चं स्वरूप येत चाललयं तर :S
(बांद्राच्या माउंट मेरीच्या जत्रेत टी शर्ट, टॉप्स किती स्वस्त, छान मिळालेत ही चर्चा जास्त ऐकण्यात येते :) )
छान लेखानी दिवसाची सुरुवात झाली.
आपल्या बारीक नीरीक्षण कौशल्यास सलाम तसेच ती नीरीक्षणे कागदावर उमटवणे ही तितकीच कठीण गोष्ट.
काही ठीकाणी छद्म वापरले आहे उदा -
>> उलटी येईल इतपत गोड असलेली लॅण्डस्केपस, व्यवस्थित सबमिसिव्ह दिसणार्या भारतीय नारी>>
मजा आली वाचून, कलेचा उरुस झाल्याने वाइट का वाटलं तो महत्वाचा मुद्दा मी "मिस" केला आहे. परत वाचते आणि विचार करते. :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
वेळ पुढे करून आताच्या स्थितीकडे पाहिलेल आवडल.
यात अर्थातच तो भविष्य काळ वर्तमान काळ झाला आहे आणि आताचा वर्तमान काळ भूत काळ.
फोटो टाकला असता तर अधिक छान झाल असत असं वाटत.
मी कधीही काळा घोडा येथिल आर्ट फेस्टिव्हल पाहिलेला नाही. पण काय असू शकेल याचा अंदाज आला. तरीही जायला आवडेल.
(कला प्रेमी )मीनल.
काही लोकांना पैसे देऊन काय वाट्टेल ते घेता, शिकता, करता येतं; <<
असं वाटत असतं.
समंजस, हो. माउंट मेरीची जत्राच.. फक्त विविध आकाराच्या मेणबत्त्या आणि जीझसची चित्रे नाहीत इतकंच.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
बाळे नीरजा,
अशी चिडचीड करून काय होणारे? ब्लडप्रेशर मात्र वाढेल उगाचच!! या वयात आता तब्येतीला जपायला हवं तुला!!
बाकी तुझ्या या चिडचीडीमुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या....
एक काळ होता की जेंव्हा त्या सगळ्या परिसरात, म्हणजे विल्सनपासून, जेजे, झेवियर, जयहिंद, खालसा थेट एल्फिन्स्टनपर्यंत अशा अनेक कलाविषयक गोष्टी घडत असत. अगदी कला महोत्सव (तुझ्या मराठीत आर्ट फेष्टीवल!) होत नसले तरी साध्या कला उत्सवांना वाण नव्हती. आणि हो, मोतमावलीच्या जत्रेतली सर्वधर्मीय गर्दी ही प्रामुख्याने मेणबत्त्या लावायला किंवा नवस फेडायलाच असायची....
गेले ते दिवस....
बाकी 'काला घोडा' ला जुन्या काळी हुतात्मा चौक म्हणायचे ना?महाराष्ट्रनिर्मितीसाठी अमर झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणासाठी तिथे स्मारक बांधलं होतं म्हणून?
आता नव्वदीच्या घरात माझंही स्मरण धूसर झालंय....
खात्री करून घेण्यासाठी म्हणून एका अस्सल मुंबईकराला विचारलं तर तो म्हणाला,"ओ दादाजी, वो जभी महारास्ट्र था तभी बनाया था! जभीसे यहांपर एक्स्टेंडेड यूपी हुवा है तभीसे उसको काला घोडा ही बोलत है!!"
भाषा फार बदललीये नाही मुंबईची? असो.
बाकी त्या भागात स्वस्तात पुस्तकं मिळायचे स्टॉलही होते बघ खूप. मी फिजिक्स-केमिस्ट्रीची जुनी पुस्तकं तिथून घेऊनच माझं शिक्षण पूर्ण केलं होतं...
आता मिळतात का तिथे पुस्तकं? की नुसते सीड्या- बिड्यांचेच स्टॉल झाले आहेत?
सारांश काय की, आता काला घोडा फेष्टीवल ला जा, घूम, खा-पी अन् ऐश कर....
पण त्या कलेबिलेच्या लफडयात पडून चिड्चीड करून घेऊ नकोस!! कलेच्या नादी लागून अनेक जण बरबाद झालेत!!!
आणि रोज नेमाने शवासन करत जा, चिडचीड कमी होईल...
तुझा सिडॉ
(१२१, एक्झॉटिक सिनीयर सेंटर, हॉलीवूड ९१६३८)
१५ फेब्रुवारी २०४५
अहो डांबिस काका, एका पेल्यात बर्फाचे दोन तुकडे जेमतेम डुंबतील एवढं सोनेरी द्रव्य टाकून त्याचा आस्वाद घेत घेत टेन्शन घालवणे नाही जमत प्रत्येकाला :)
[आणि हो, हा काला घोडा चौक आणि हुतात्मा चौक हे दोन्ही वेगळे आहेत :)
हुतात्मा स्मारक हे फ्लोरा फाउंटेन या चौकात आहे. या चौका पासून गेटवे ऑफ ईंडीया कडे गेलात तर जहाँगीर ऑर्ट गॅलरी असलेला पुढील चौक म्हणजे काला घोडा. वाचीव माहीतीनुसार कोणे एके काळी तेथे काळ्या घोड्याचा दगडातला पुतळा होता :) पुढे केव्हातरी तो काढून टाकण्यात आला पण त्यामुळे त्या चौकाला पडलेले काळा घोडा हे नाव मात्र तसेच राहीले. आणि हो त्या भागातील फुटपाथवर जुनी/नवी आणि जवळपास सर्वच विषयांवरची पुस्तके मिळतात. सध्या मात्र विक्रेत्यांचं प्रमाण कमी झालं आहे :( ]
आणि हो, हा काला घोडा चौक आणि हुतात्मा चौक हे दोन्ही वेगळे आहेत<<
हुश्श बरं झालं कोणीतरी कन्फर्म केलं ते. मला वाटलं आपलाच घोळ झाला की एवढे दिवस जे चौक वेगळे समजत होतो ते एकच होते की काय.. :)
>>आणि हो त्या भागातील फुटपाथवर जुनी/नवी आणि जवळपास सर्वच विषयांवरची पुस्तके मिळतात. सध्या मात्र विक्रेत्यांचं प्रमाण कमी झालं आहे<<
मिळायची. आता तुम्ही म्हणता तसं प्रमाण कमी नव्हे तर नगण्य झालंय. कारवाई केली गेली होती ना मधे.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
हा काला घोडा चौक आणि हुतात्मा चौक हे दोन्ही वेगळे आहेत
ओके! आय स्टॅन्ड करेक्टेड!
एका पेल्यात बर्फाचे दोन तुकडे जेमतेम डुंबतील एवढं सोनेरी द्रव्य टाकून त्याचा आस्वाद घेत घेत टेन्शन घालवणे नाही जमत प्रत्येकाला
हा उपाय नीरजाने करावा असं मी माझ्या प्रतिसादात कुठेही सुचवलेलं नाही. तुम्हाला तसं सुचवायचं असेल त्यासाठी माझ्या प्रतिसादाची ढाल वापरण्याची गरज नाही!!!
नीधपतै, तुमचा राग मला समजला नाही. या कलोत्सवास एलिटीस्ट बनवायचे असल्यास कुणी यावे व कुणी नाही यावर निर्बंध घालावे. पण सर्वांना खुले ठेवायचे असल्यास लोक येणार, मुले-बाळे येणार आणि ते कलेची जाण असणारेच असतील आणि कलेसाठीच आले असतील अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. पण १% लोकांना कुठल्यातरी शिल्पासमोर उभे राहून काहीतरी प्रेरणा मिळेल.
तुम्ही या सर्व व्यापाराला आणि गर्दीलाच 'आव्हा गार्ड' (Avant-garde) म्हणून पाहीले असते तर तुम्हाला इतका मनस्ताप झाला नसता.
कला महोत्सव म्हणून एक्स्पो प्रकारचा बाजार भरवण्याला आव्हा गार्द म्हणणं एवढा मोठ्ठा विनोद मला जमण्यासारखा नाही.
एलिटिस्ट पुरताच हा फेस्टिव्हल असावा असे मी कुठेही सूचित केलेले नाही.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
कला महोत्सव म्हणून एक्स्पो प्रकारचा बाजार भरवण्याला आव्हा गार्द म्हणणं एवढा मोठ्ठा विनोद मला जमण्यासारखा नाही.
तुम्हाला तो विनोद का वाटावा बुवा? तुम्हाला जमण्यासारखा नसल्यानेच तुम्हाला त्रास झाला असावा.
एलिटिस्ट पुरताच हा फेस्टिव्हल असावा असे मी कुठेही सूचित केलेले नाही.
तुम्ही सूचित केलेले आहे असे प्रतिसादात कुठेही सूचित केलेले नाही. तेव्हा हे स्पष्टिकरण अप्रस्तुत आहे. जेथे लोक दिसतील तिकडे छोटे-मोठे विक्रेते जातील. शास्त्रीय गायक मोठ्या कंपन्यांच्या मोठ्या बॅनरखाली राग आळवलेले चालते तर हेही चालवून घ्यायला हवे.
लेख आवडला, लेखातला त्रागा पटण्यासारखा आहे. तरी श्री. घाटपांडे यांच्याशी सहमत.
या प्रदर्शनाला कधी गेले नाही, पण तुम्ही सांगत आहात त्यावरून असे वाटते आहे की कदाचित आयोजक बदललेले असतील किंवा आर्थिक दृष्टीने स्टॉल्स ठेवणे, जत्रा भरवणे महत्त्वाचे होत चाललेले असावे.
धरले तर चावतंय, सोडले तर पळतंय असे आहे खरे.
लेखाला नेमके वैचारिक उत्तर सुचत नाही.
आमच्या गावात अशी जंगी कला-जत्रा दोन दिवसांची भरवतात - खाद्यपदार्थाचे गाडे, मोठे फेरिस व्हील, असे सगळेसुद्धा असते. त्यातही मजा येते. पण यात अतिशय नाविन्यपूर्न अशी कलाकृती, तसे कलाकार झाकोळले जातात, हेसुद्धा खरे.
शिल्पे, ग्राफिटी, भित्तिचित्रे, इन्स्टॉलेशन-रचना... या अशा प्रकारची कलाच मला उघड्या हवेत चांगली आस्वादता येते. नाही म्हटले तर (जत्रेत नाही, पण अशाच साध्या दिवशी) जे. जे. स्कूलजवळ विकायला ठेवलेल्या चित्रांपैकी काही अगदी आरामात मला आस्वादता आली आहेत - हेसुद्धा खरे. पण ते शक्य होते गजबजाट नसल्यामुळे.
सारांश : मला जत्राही आवडतात, पण तुमचा त्रागाही समजतो-पटतो.
अपेक्षेप्रमाणेच मुद्दा तुम्हाला नेमका कळलाय धनंजय.
बाकी जत्रा मलाही आवडतात. पण प्रत्येकच ठिकाण केवळ जत्रेचेच होऊन जाणे किंवा प्रत्येक जत्रा एकसारखीच असणे किंवा प्रत्येक जत्रेतून समुदायाने एकसारख्याच गोष्टींची अपेक्षा धरणे आणि त्या एकसारख्याच गोष्टींच्या अपेक्षा पुरवल्या जाणे याबद्दल नाखुषी आहे.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
प्रतिक्रिया
नीरजा,
वा!!
नी
आवडलं
काही
बाळे
अहो
आणि हो, हा
हा काला
तुमच्या
चष्मा बदला
कला
कला
एक वेगळाच
साहित्य संमेलनाचा उरुस
खरंय.. सामा
लेख आवडला
जत्राही हवी, कलास्वादासाठी स्थानही हवे
:)
ह्म्म्म्म