Skip to main content

देणे

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 11/02/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
निःशब्द चांदण्यांनी जागेपणी पहावे
स्वप्नात तुझे येणे
बेभान वादळांनी श्वासात जागवावे
आवेग जीवघेणे
अस्वस्थ जीव होता गावे तुझ्या स्वरांनी
जादूभरे तराणे
हळुवार भावनांना फुलवून जागवावे
माझे अबोल गाणे
मी मुग्ध, तूही शांत, ही गूढरम्य रात्र
घाली नवे उखाणे
ती चंद्रकोर वेडी हलकेच शीळ घाली
ते चांदणे दिवाणे
भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना
स्वच्छंद गंधलेणे
धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे
अनमोल तुझे देणे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2426
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे हे कडवं आवडलं ********************************* या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

कविता शृंगार रसाने भरलेली आहे... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

अतिशय सुंदर कविता... ती चंद्रकोर वेडी हलकेच शीळ घाली ते चांदणे दिवाणे भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना स्वच्छंद गंधलेणे शब्द, रचना , कल्पना ...सारं काही -- अप्रतिम !!!

धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे
या ओळी सर्वाधिक आवडल्या.. सुरेखच! तात्या.

अ प्र ति म!! कौतुक कोणत्या शब्दांत करू! भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना स्वच्छंद गंधलेणे धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे क्या बात है!! - प्राजक्ता http://www.praaju.com/

खुप आवडली कविता.

अशक्य !! क्रान्ति..... तुस्सी तो छा गयी यार !! नितांत सुंदर काव्य !! भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना स्वच्छंद गंधलेणे धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे खासच !!

इतरांप्रमाणेही मला धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे या ओळी आवडल्या. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

अतिशय सुंदर कविता.. कुठली ओळ लिहू आणि कुठली नको असं झालंय! अप्रतिम! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!