आठवण...(२)

प्रभो's picture
प्रभो in जे न देखे रवी...
2 Feb 2010 - 8:40 pm

बरेच दिवस झाले तुला पाहून
तुझा सुगंध माझ्या श्वासात भरून
डोळ्यात साठवलेल्या त्या सुंदर
चेहर्‍यावर अन तुझ्या फोनवरच्या
आवाजावर समाधान मानतोय

ऑफिसच्या जिन्यावरचा तो चहा
ती शेअर केलेली कॅडबरी
बस मधे बसून ऐकलेलं 'जरा जरा'
नंतरच्या त्या फोनवरच्या गप्पा
सगळ्याची आठवण येतेय

आजही माझ्याकडे आहे
तुझा तो पहिला मेसेज
आणी पहिल्या शॉपिंगचा शर्ट
आज तोच शर्ट घालून
ऑफिसला जावे म्हणतोय

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2010 - 8:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे प्रभो...!
तिने घेतलेला तो शर्ट ऑफीसला आठवणीने घालून जा !

-दिलीप बिरुटे

मेघवेडा's picture

2 Feb 2010 - 9:40 pm | मेघवेडा

सकाळी सकाळी? मस्तय पण!!!

डोळ्यात साठवलेल्या त्या सुंदर
चेहर्‍यावर अन तुझ्या फोनवरच्या
आवाजावर समाधान मानतोय

हे वाचून अंमळ हळवा झालो.. माझ्याकडेही आहे एक शर्टं.. म्हण्जे माझ्या 'ती'नं दिलेला ;) आम्ही केलेली शेवटची शॉप्पिंग! उद्या ऑफिसात घालून जाईन म्हणतो!

जाता जाता : ऑफिसात जाऊन आणखी दोन तीन येऊ दे रे!

-- मेघवेडा.

प्राजु's picture

2 Feb 2010 - 9:44 pm | प्राजु

ऑफिसच्या जिन्यावरचा तो चहा
ती शेअर केलेली कॅडबरी
बस मधे बसून ऐकलेलं 'जरा जरा'
नंतरच्या त्या फोनवरच्या गप्पा
सगळ्याची आठवण येतेय

हम्म!! चालुद्या!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

चतुरंग's picture

2 Feb 2010 - 9:51 pm | चतुरंग

काय दशा दशा झालिये पोराची कडाक्याच्या हिवाळ्यानं आणि एकलकोंडेपणानं?
म्हणशील पुन्हा अमेरिकेला जायचं म्हणून? घेशील ओवरसीज प्रॉजेक्ट?? करशील हिरवा माज???(संदर्भ : हरीतात्या.)
(ह्याला म्हणतात जखमेवर बर्फ लावणं! ;) )

(दूष्ट आणि डूक्कर)चतुरंग

टारझन's picture

2 Feb 2010 - 10:31 pm | टारझन

तुझा पार "मोकलाया दाहि दिश्या" झालाय .. लेका .. आता तिच्या पोरांच्या हग्गीज बदलण्याच्याही आठवणी सांगणारेस का ? उरकुन टाका पटक्या. ... नाही तर बस निघून जाईल आणि चोळत बसाल .. हात !

- (प्रभो चे चार हात झाल्यावर डोळे मिटू* म्हणणारा) टर्बो

* - दोन मिनीटे