असेच बव्हंशी म्हणावेसे वाटते.
पत्रकारिता समाजाचाच एक घटक आहे, व्यवसाय आहे वगैरे मान्य आहे. पण श्री परुळेकर यांच्या लेखाबाबत हे मुद्दे गैरलागू आहेत.
का बुवा? फक्त परुळेकर किंवा वर नावे आलेल्या काही पत्रकारांबाबतच ते मुद्दे का गैरलागु ठरावेत?
आता पत्रकारितेच्या व्यवसायात जाण्यासाठी आर्थिक दृष्ट्या त्याग करावा लागतो आणि काहींना तो झेपत नाही तर बाजारांच्या नियमाप्रमाणे पत्रकारितेकडे वळणारे लोक कमी होतील, प्रसारमाध्यमांची संख्या कमी होईल. भारतभर ती वाढतेच आहे म्हणजे चांगलाच तेजीचा व्यवसाय असावा.
जरा पत्रकारितेबाबतचा विदा पहा. कुठल्या स्तरावरची वृत्तपत्रे वाढताहेत हे पहा मग कळेल. अन माध्यमांची, पत्रकारांची संख्या वाढते आहे म्हणजे त्यात छापुन येते ते बरेच मोठ्या संख्येने लोक वाचतात. आवडत नसेल तर पैसे खर्च करुन का वाचावे बुवा लोकांनी? की माध्यमे वाचकांना धमक्या देताहेत पैसे मिळवायला? कै च्या कै तर्कट!
आजकाल लोक जाहीरातसंस्था काढण्याऐवजी वृत्तपत्र काढतात की काय? कारण तुमचे विवेचन वाचल्यास या दोन व्यवसायांत फारसा फरक नाही उलट वृत्तपत्रे भारीच पडतील.
असं लिहिलय माझ्या एखाद्या प्रतिसादात? असेल बुवा! तुम्ही कोट करता म्हणजे नक्कीच असेल.
आम्ही उगाच जगभर पत्रकार जीव धोक्यात घालून जे लेखन करतात, प्रामाणिकपणे, तटस्थपणे आपली मते मांडतात त्यांना पत्रकारितेतील गुणवत्ता समजत होतो. पण आता हे निकष तपासून पहायला हवेत कारण पत्रकारिता हा व्यवसाय आहे आणि त्यांचे प्रॉडक्ट हे त्यांचे लिखाण आहे.
तटस्थपणे मते मांडतात म्हणजे? बातमी तटस्थ असते, लेख नाही. तटस्थ रहायचे तर लेख लिहायचा तरी कशाला. अन बातमी देखील अनेकदा तटस्थ न रहाणेच श्रेयस्कर असते. फक्त सर्वदा तटस्थ रहाणारे पत्रकारच थोर असतात? मला तसे नाही वाटत?
बरेच घोळ दिसतात पत्रकारितेविषयक संकल्पनांच्या समजुतीत आपल्या दोघांच्याही. परत एकदा समजुन घ्यावा हा व्यवसाय असे म्हणतो!
छान कल्पनाविलास आहे.....असेच बव्हंशी म्हणावेसे वाटते.
कल्पनाविलास काय आहे ते समजावून घेऊ या. कल्पनाविलासात रंगण्यापुर्वी लाळघोटे म्हणणे म्हणजे झुंडशाही कशी? यावर आपण मौन बाळगून त्या मुद्द्याला बगल दिलेली नसावी तर नजरचुकीने राहीले असावे, अशी आशावादी अपेक्षा करतो.
गैरलागू वाटण्याची कारणे
या चर्चाप्रस्तावात श्री परुळेकरांचे काही व्यक्तिविषयक लेखन तसेच श्री राऊत आणि श्री केतकर यांचा संदर्भ आला आहे. हे सर्व पत्रकार सुस्थित आहेत, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यांचे लेखन वाचले जाते. तेव्हा पत्रकारितेतील समाजकारण आणि अर्थकारण या व्यापक प्रश्नाशी संबंध जोडण्यापुर्वी या पत्रकारांचे 'काही चुकते आहे का?' यावर प्रथम चर्चा व्हावी. तुम्हाला श्री परुळेकरांच्या लेखनात मतप्रदर्शनाचा निकष लावून काहीच गैर वाटत नाही. (संदर्भ: हा निकष लावला तर उपरोक्त लेखामधे काहीही गैर दिसत नाही.) जेव्हा काही चुकलेलेच नाही तर पत्रकारितेत होणार्या गैरव्यवहारांबाबत भाष्य करण्याची गरज नाही. पण तुम्ही चुकलेले नाही असा निष्कर्ष काढून आणि वर चुका घडण्याची व्यापक कारणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता श्री मास्तर यांनी काय मत मांडले आहे ते पाहू.
एखादा पत्रकर अमुक एका पक्षाचा आहे, म्हणजे त्याने एक विशिष्ट पक्षाची भूमिका घेऊन बोलावं , त्या पक्षाला डिफेंड करत राहावं हे पाहणं मला अवघड जातं
श्री मास्तर यांनी पत्रकारांमी एक प्रकारे पक्षाशी निष्ठा ठेऊन लेखन करू नये तसेच त्यांच्याकडून वाचकांनी एखाद्या पक्षाच्याच समर्थनार्थ लेखनाची अपेक्षा ठेऊ नये, असे मत मांडले आहे. मी आणि इतर सदस्यांनी थोडेसे पुढे जाऊन हा प्रकार श्री परुळेकर यांच्यापुरताच मर्यादीत ठेऊन, श्री परुळेकर यांच्या लेखावर मत नोंदवून मग श्री मास्तर यांच्या वर व्यक्त केलेल्या मताशी सहमती दर्शवली आहे. (मी मराठी पत्रकारितेच्या अवस्थेबद्दल शंका विचारली आहे.) या पार्श्वभुमीवर तुमचा प्रतिसाद पहावा. ज्यात समाजाची नैतिकता, समाजा घटक असल्यामुळे त्याचे पत्रकारितेवर होत असणारे परिणाम याविषयी चर्चा आहे पण यात तुम्ही श्री परुळेकरांना धारेवर न धरता निव्वळ वाचकांवरच ही (नैतिकता जोपासण्याची) जबाबदारी सोपवली आहे. या अर्थाने मला असे जाणवले की तुम्हाला या व्यवसायाबाबत अतिशय तळमळ आहे. जी योग्य आहे पण येथे तेवढ्या व्यापक पातळीवर न जाता श्री परुळेकरांच्या लेखनाबाबतच चर्चा व्हावी. कारण तुम्ही या लेखनाचे वर्णन 'लाळघोटेपणा' करणे यास आक्षेप घेतला होता.
तुमच्या प्रतिसादात तुम्ही म्हणता: काही पत्रकारांना मिळालेली राजकीय पदे अश्या वर्तनानेच मिळाली असा सरसकट दावा करणे ही देखिल झुंडशाही आहे असे मला वाटते. माझ्या आवडीच्या (ज्यांचे लेखन मी आवर्जुन वाचतो) काही पत्रकारांना राजकिय पदे मिळालेली आहेत. माझे श्री प्रदीप यांना दिलेल्या उपप्रतिसादातील विधान पुन्हा एकदा उदधृत करतो: कितीतरी पत्रकारांची विधान परिषदेत, राज्यसभेत वर्णी लागते ती कशामुळे? येथे सरसकट विधान न करता या पत्रकारांना मिळालेल्या पदांविषयी तसेच त्यांनी अनुसरलेल्या मार्गांविषयी शंका व्यक्त केली आहे. इतर कोणी तसे सरसकट विधान केल्याचे आढळत नाही. (श्री घाटपांडे पत्रकार माणसेच असल्याकडे बोट दाखवून त्यांनी गैरवर्तन केल्यास वाचकांना आश्चर्य वाटू नये, श्री केतकर राज्यसभेत जातील असे भाष्य केले आहे पण त्यांनीही सरसकट काहीच दावा केलेला नाही. उलट त्यांचे मत तुमच्या सामाजिक घटक असलेल्या मताच्याच जवळ जाणारे वाटते.)
मुद्दा एवढाच आहे की व्यापक कारणांवर चर्चा करण्याकरता प्रथम प्रश्न आहेत, हे मान्य करायला हवे. तुम्हाला त्यासाठी प्रथम श्री परुळेकर यांच्या लेखनाकडे वाचक म्हणून बघणे आवश्यक आहे. तुम्ही तसे न करता व्यापक चर्चा करू पाहत असाल तर ते गैरलागू आहे.
पत्रकारिता तेजीचा व्यवसाय आहे किंवा नाही?
एखाद्या व्यवसायात अधिक नफा असल्यास त्या व्यवसायात गुंतवणुकीचे प्रमाण वाढते, असे एक तत्त्व अर्थशास्त्रात आहे. तसा ढोबळ तर्क वापरल्यास पत्रकारिता हा तेजीचा व्यवसाय वाटतो असे मी म्हटले आहे. याचा अर्थ सर्वच पत्रकारांच्या आर्थिक समस्या नष्ट झाल्या आहेत का? पत्रकारांवर मालक अन्याय करीत नाहीत का? पत्रकारांच्या वेतनाबाबत उदासिनता नाही का? अजिबात नाही. आणि माझ्या विधानाचा तसा अर्थही नसावा. एक उदाहरण देतो. बांधकाम व्यवसाय आजकाल तेजीत आहे. म्हणजे बांधकाम करणार्या मजुरांच्या जीवनात सर्व आलबेल आहे, असे नाही. तुम्ही म्हणता:दुसरा भाग येतो व्यावसायिकतेचा. वर म्हणले तसे मीडीया हा देखिल व्यवसाय आहे. त्यापेक्षादेखिल तो आतबट्ट्याचा व्यवसाय आहे. तर माझा प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणावर मीडीयामध्ये गुंतवणूक होण्याचे काय कारण असावे? व्यवसाय जर इतका जिकिरीचा आहे तर मग गुंतवणूक का होत आहे? याची अनेक कारणे असू शकतील. मूळात पत्रकारितेच्या व्यवसायाशी, त्यातील नैतिक भुमिकेशी काडीचाही संबंध नसलेले लोक या व्यवसायात पैसे गुंतवतात. गुंतवलेले पैसे व त्यावर परतावा म्हणून अनेक उद्योग (उदा. पेड बातम्या) करतात, जे पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांना अनुसरून नाही. माझ्या विधानात अशा सर्व ग्रॅन्युलर घटकांवर काहीच भाष्य नाही. तुम्हाला तशी वेगळी चर्चा (माध्यमांचे अर्थकारण व पत्रकारितेची मूल्ये) सुरू करता येईल. (मला वाटते श्री घाटपांडे यांनी अशीच काही चर्चा सुरूही केलेली आहे.)
जाहीरातसंस्था आणि वृत्तपत्रे
तुम्ही हे दोन व्यवसाय एकच असल्याचे विधान केलेले नाही. मी तुम्हाला कोटही केलेले नाही. तुमच्या विवेचनावरून मी असा निष्कर्ष काढला आहे. तुम्ही पत्रकारितेच्या व्यवसायाचे अर्थकारण मांडून पेड न्युज वगैरे प्रकार घडण्याची कारणे स्पष्ट केली आहेत. पण हे गैर आहे, हे थांबायला हवे याबद्दल काहीच मत नोंदवलेले नाही. तडजोडी म्हणून हे घडते आहे तर मग जाहीरातसंस्था (ज्या सरळ सरळ पैसे घेऊन पाहीजे तशा जाहीराती बनवून देतात) आणि वृत्तपत्रे जे पैसे घेऊन तुम्हाला हवी तशी बातमी छापतात, यांच्यातील सीमारेषा संपुष्टात आली आहे. तेव्हा जाहीरात संस्थांनी वृत्तपत्रे काढावीत म्हणजे लोकांचे लक्ष आकर्षुन घेण्याकरता पैसे घेण्याचीही गरज नाही वर लोक जाहीराती वाचण्यासाठी पैसेही देतील.
तटस्थपणा
तटस्थपणा म्हणजे मत न मांडणे असे नव्हे. नाण्याच्या दोन्ही बाजू मांडून तुम्ही एखाद्या बाजूने झुकण्याची कारणे देणे. असे केल्यास वाचकाविषयी, त्याच्या तारतम्यभावाविषयी आदर तर दिसतोच पण समाजही प्रगल्भ होत जातो. पत्रकारांनी मते मांडण्याला आक्षेप नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे.
पत्रकारितेविषयक संकल्पना आणि घोळ
घोळ आहेच. मी पत्रकारितेच्या व्यवसायात नाही. पण पत्रकारितेमुळे माझे जीवन समृद्ध झाले आहे. मी पत्रकारांचे लिखाण वाचतो. ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी दिलेल्या माहिती आणि मतांवर अवलंबून निर्णय घेतो. (उदा. फ्लुची साथ आहे, पुन्हा पुन्हा साबण लावून हात धुवायला हवेत. शहरात रात्री लुटमारीचे प्रकार वाढीस लागले आहेत, मी सावध असले पाहीजे. वगैरे) थोडक्यात मी अनेकांप्रमाणे एक सुजाण वाचक आहे. पत्रकारितेच्या व्यवसायात असलेल्या लोकांनी माझी दिशाभूल करू नये, अशी माझी किमान अपेक्षा आहे. ही अपेक्षा गैरवाजवी असल्यास किंवा गैरसमजूत असल्यास माझ्या आकलनात बराच घोळ आहे.
.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत
श्री पुनेरी,
प्रतिसादांमधे 'सर्व' पत्रकारांवर्/पत्रकारितेवर टीका झालेली नाही. _परूळेकरांच्यावर_ टीका आहे. तुमचे व (श्री घाटपांडे) यांचा मुद्दा की पत्रकार हा देखिल एक माणूस आहे व तो समाजाचाच एक भाग आहे वगैरे ह्या पळवाटा आहेत आणि हे कारण देऊन आपण कशाचेही/कुणाचेही समर्थन करू शकतो.
१) येथे कोणीही परुळेकरांकडून उदात्त, स्वतःचा जीव जोखमीला लावून केलेल्या लिखाणाची अपेक्षा केलेली नाही. किमान दर्जाची अपेक्षा आहे.
२) "येथे लेखकाने स्वतःची मते त्याच्या लेखात मांडली आहेत आणि त्यात लिहिलेल्या घटनाबाबतच्या फॅक्ट्स चुकीच्या आहेत असे दर्शवणारा कोणताही पुरावा नाही."
खरंच? नितेश राणे यांना ए.सी.चालत नाही इ. "सेक्रेड फॅक्ट्स"? आणि त्यांच्या "मानवी" एंगल विरुद्द पुरावे नाहीत?
३) "शेवटी जर पत्रकार समाजाचे प्रबोधन करणार असेल, समाजाला दिशा देणार असेल तर तो त्याची मते मांडणारच."
मते मांडण्याला कोणाचा आक्षेप कसा असेल? इथे त्यांनी हेतुपुरस्सर सत्तेत अस्लेल्या लोकाची आरती ओवाळली आहे.
तुमचे काही मुद्दे मान्यः मिडीयाचे व्यावसायिकरण; पत्रकारांना सोयी, नीट शिक्षण, पगार याबाबत.
श्री परुळेकरांनी ह्या लेखातुन नितेश राणे ह्यांचे इमेज बिल्डींग करायचा प्रयत्न केला आहे. काही आठवड्यांपूर्वी आय.बी.एन. लोक्मत वरील लाइव्ह कार्यकर्मात नितेश राणे यांनी सरळ सरळ धमकीची भाषा वपरली ती अनेकांनी पाहिली. आता त्यांच्यावर असा स्तुतीपर लेख लिहून राणेंची इमेज "म्यानेज" करायचा प्रयत्न होत आहे.
आजही पी. साईनाथ, हिमांशू उपाध्याय आणि अनेक पत्र्कार आहेत जे चांगले काम करत आहेत. परुळेकरांनी आत्मपरिक्षण करावं.
पहिले वाक्य वाचले अन गिर्या तो भी टांग उप्पर असा काहीसा वाक्प्रचार आहे तो आठवला. किमान आत्तापर्यंत लिहुन आलेय ते तरी नीट वाचायचे होते. पत्रकारांना आपले कोणाशी कसे घनिष्ट संबंध आहेत हे दाखविण्याची खाज असतेच, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, राजू परुळेकर असावेत.... एक महसूल मंत्र्याचा मुलगा आणि दुसरा ११ आमदार असलेल्या पक्षाचा प्रमुख. यांचा उदोउदो केल्यास काय फायदा मिळतो? कितीतरी पत्रकारांची विधान परिषदेत, राज्यसभेत वर्णी लागते ती कशामुळे? ही माझी विधाने नाहीत बरे! ती वरच्या प्रतिसादांमधुन कट पेस्ट केलेली वाक्ये आहेत. अन ही विधाने सार्वत्रिक नसतील असे म्हणायचे असेल तर अवघड आहे. आणि परुळेकरांच्या एका लेखाची अन त्यावरुन त्यांच्या समग्र गुणवत्तेची समिक्षा करताना त्यात केतकर, वागळे या मंडळींचा संबंध कसा येतो बुवा? असो! माझे तर्कशास्त्र कच्चे असावे!
तुमचे व (श्री घाटपांडे) यांचा मुद्दा की पत्रकार हा देखिल एक माणूस आहे व तो समाजाचाच एक भाग आहे वगैरे ह्या पळवाटा आहेत आणि हे कारण देऊन आपण कशाचेही/कुणाचेही समर्थन करू शकतो.
अगदी बरोबर! पण मी समर्थन करा असे म्हणतच नाहीये. उलट मी आजपर्यंत वेळोवेळी टीकेचे स्वागतच केले आहे आणि वाचकांनी त्यांचे मत व्यक्त करावे असेच माझे म्हणणे आहे. पण मतांमधेही लर्नेड ओपीनियन हा प्रकार असतो असे म्हणतात.
खरंच? नितेश राणे यांना ए.सी.चालत नाही इ. "सेक्रेड फॅक्ट्स"? आणि त्यांच्या "मानवी" एंगल विरुद्द पुरावे नाहीत?
नक्की कोणती फॅक्ट सेक्रेड असते अन सेक्रेड नसलेल्या फॅक्ट कश्या ओळखता येतात हे समजावुन द्याल मला प्लीज? मला वाटले सगळ्याच फॅक्ट सेक्रेड असतात. `मानवी' अँगल म्हणजे काय हे पण नाही कळले.
मते मांडण्याला कोणाचा आक्षेप कसा असेल? इथे त्यांनी हेतुपुरस्सर सत्तेत अस्लेल्या लोकाची आरती ओवाळली आहे.
हेतुपुरस्सर म्हणजे हेतु ठेवुन असेच ना? मग तो हेतु पण जरा स्पष्ट करा की. अन सत्तेत असलेले लोक म्हणजे नितेश राणेच ना? कितपत सत्ता आहे त्यांच्या हातात?
श्री परुळेकरांनी ह्या लेखातुन नितेश राणे ह्यांचे इमेज बिल्डींग करायचा प्रयत्न केला आहे. काही आठवड्यांपूर्वी आय.बी.एन. लोक्मत वरील लाइव्ह कार्यकर्मात नितेश राणे यांनी सरळ सरळ धमकीची भाषा वपरली ती अनेकांनी पाहिली. आता त्यांच्यावर असा स्तुतीपर लेख लिहून राणेंची इमेज "म्यानेज" करायचा प्रयत्न होत आहे.
परत मला जरा स्पष्ट समजावुन घेऊ द्या! काही दिवसांपुर्वी चॅनेल हल्ला प्रकरणी सेना, ठाकरे यांच्यावर आपण टीका केली. त्यांची स्तुती कुणी सिनेमा काढुन केली तर ते त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन त्यामुळे ते समर्थनिय. नितेश राणे यांनी धमकीची भाषा त्याच चॅनेलवरच्या कार्यक्रमात केली अन ती अनेकांनी पाहिली पण त्यांची स्तुती केली तर तो राणेंची इमेज मॅनेज करण्याचा प्रयत्न, लाळघोटेपणा असेच ना? छान आहेत व्याख्या!
आजही पी. साईनाथ, हिमांशू उपाध्याय आणि अनेक पत्र्कार आहेत जे चांगले काम करत आहेत. परुळेकरांनी आत्मपरिक्षण करावं.
या वाक्याशी मात्र सहमत!
पत्रकार म्हटले की लोकांना टिळक्-आगरकरांची पत्रकारीता आठवते आणि त्यांच्या मापाने ते आजच्या पत्रकारांना मोजायला जातात
असे नाही. वाचक इंग्रजी व्रूत्तपत्रेही वाचतात.इंग्रजी पत्रकारांनाही राजकिय मते असतात पण एवढे उथळ मत प्रदर्शन क्वचितच दिसते.
दिलीप पाडगावकर(TOI), गोविंद तळवलकर्,शेखर गुप्ता, एन्.राम ह्यांनाही राजकिय मते होती/आहेत आणि कधी कधी त्यांच्या लेखनातून तसे जाणवतेही. पण त्यांचे लेखन एवढ्या खाली कधी घसरत नाही.
अर्थात प्रत्येक क्षेत्रात एक क्लास असतोच. वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचा क्लास परुळेकर्/राऊत ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे हे सहज कळते.
भेंडी
P = NP
असे म्हणणे चुकीचे ठरेल. प्रांतिक पत्रकारितेने बजावलेली कामगिरी आणि प्रांतिक पत्रकारांची समज व दर्जा कदाचित इंग्रजी पत्रकारांपेक्षा अधिकच असेल असे माझे मत आहे.
क्लास तर असतातच. पण त्यांचा संबंध भाषेशी नसतो. तो ती व्यक्ती, त्या व्यक्तीचा टार्गेट ऑडियन्स यावर ठरतो.
"सर्वप्रथम विचार व्हायला हवा तो समग्र सामाजिक नैतिकतेचा.."
हा निकष लावला, तर जगातल्या एकाही कृत्याला 'अनैतिक' म्हणता येणार नाही.
मी आधीच म्हणले वृत्तपत्रे, नियतकालिके, चॅनेल वगैरे टुथपेस्ट सारखेच प्रॉडक्ट आहेत. जर एखादा प्रॉडक्ट दोषयुक्त वाटत असेल तर आपण तो घेऊ?"
मला वाटते, वरील चर्चा ही 'प्रॉडक्ट दोषयुक्त निघाल्याचीच' आहे.
पत्रकारितेचे 'प्रॉडक्ट' हे लेख किंवा बातमी नसून, 'सचोटी' हेच असते.
मिडीया, लष्कर, न्यायसंस्था, वैद्यक या सर्व सेवांना एक पावित्र्याची झालर आहे, ती उगाच नाही. सगळा समाजच अनैतिक आहे, मग आम्ही का अपवाद? असे वरीलपैकी लोक म्हणू लागले (आणि लोकांना ते पटू लागले) तर जे काही होईल, त्यालाच अराजक म्हणत असावेत !
ज्ञानेश यांच्या वरील प्रतिक्रीयेशी सहमत...
संसद, प्रशासन, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचे चार आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.
संसद(नेते) आणि प्रशासन यांच्यावरचा लोकांचा विश्वास आधीच उडाला आहे.
आता न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावरचा विश्वास सुद्दा उडण्याची परिस्थीती आली आहे :(
प्रतिक्रिया
छान कल्पनाविलास आहे.....
कल्पनाविलास?
पटले नाही
छान!
इंग्रजी
फक्त इंग्रजी पत्रकारितेलाच दर्जा असतो....
पुनेरी यांच्याशी असहमत.
ज्ञानेश