Skip to main content

वेल

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 11/01/2010 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
वेल पौर्णिमेच्या चंद्राला एकांताचा छळ राती एकल्या वेलीला चांदण्याची झळ .. गर्द निळ्या गारुडाचा माळभर पूर येतो काळ-वेळ विसरून वारा वेलीसोबत शहारतो थोड्या दंवासाठी आता तहानला कातळ पौर्णिमेच्या चंद्राला एकांताचा छळ... सुन्या माळा वर वेल एकटी अबोल आहे, बहरात तिच्या पाणावली अश्रुंचीही ओल आहे, हसरी कळी बनुन उमले अंतरीची कळ, पौर्णिमेच्या चंद्राला एकांताचा छळ... -- सागर लहरी ११.१.२०१०
लेखनविषय:

वाचने 1055
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया