गाभा:
नाशिकचा कलेक्टर जँक्सन याचा वध केवळ सतरा वषीय अनंत कान्हेरे यांनी केला होता.भारतीय स्वातंत्रलढ्यात हा दिवस अत्यंत महत्वाचा होता .या दिवसाचा विसर आपल्याला पडता कामा नये .आज या दिवसाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.इंग्रजांची शंभरी भरवणार तो दिवस होता २१ डिसेंबर १९०९ .या दिवसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे .समस्त भारतीयांच ऊर अभिमानाने भरला पाहिजे .आज जँक्सन वधाची शताब्दी. अनंत कान्हेरे सारख्या वीराला शतश: प्रणाम.
प्रतिक्रिया
21 Dec 2009 - 10:09 pm | धमाल मुलगा
अभिनव भारत संघटनेने स्फुल्लींग चेतवलेला आणखी एक वीर!
कोवळ्या वयात जीवाची काडीमात्र पर्वा न करणार्या त्या निधड्या वीराला माझेही कोटी कोटी प्रणाम _/\_
जर....जर गणु वैद्य माफीचे साक्षीदार झाले नसते तर.....
21 Dec 2009 - 10:54 pm | II विकास II
+१
21 Dec 2009 - 10:59 pm | शेखर
+२
21 Dec 2009 - 11:04 pm | मिसळभोक्ता
कान्हेरेंना प्रणाम !
गणू वैद्याला शिव्यांची लाखोली !
जॅक्सन च्या *** ** !!
(स्फुल्लिंग चेतवले की आम्ही असेच बोलत असतो.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
21 Dec 2009 - 10:16 pm | मदनबाण
या वीराला माझेही त्रिवार वंदन...
मदनबाण.....
कारनामा क्रांतिकारक कान्हेरेंचा…
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2962453.cms
22 Dec 2009 - 6:25 am | विकास
या वीराला माझेही त्रिवार वंदन...!
या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
म.टा.च्या माहीतीपूर्ण दुव्याबद्दलही धन्यवाद!
22 Dec 2009 - 9:56 am | विशाल कुलकर्णी
किं घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने.....
कसल्याही परिणामांची पर्वा न करता देशास्तव आपले सर्वस्व अर्पण करणार्या, कोवळ्या वयात जीवाची काडीमात्र पर्वा न करणार्या त्या निधड्या वीराला माझेही कोटी कोटी प्रणाम _/\_
विशाल
22 Dec 2009 - 10:15 am | प्राजु
+१
लाखो प्रणाम!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
22 Dec 2009 - 10:52 am | पर्नल नेने मराठे
कान्हेरेंना प्रणाम !!!
चुचु