काळ.........

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
5 Dec 2009 - 5:55 pm

विचारामागे
येती विचारं
मन बिचारं
थांबेचिना

धाऊन दमले
दमून थांबले
असे काहीसे
होईचना

विचारं हेच
अस्तित्व माझे
परत्तत्व मला
ठाउक नाही

मनाबिनाच्या
पलीकडले ते
असे काहीसे
असते काही...?

असते नसते
ठाउक नाही
उगा कशाला
मोहक भास

उगा कशाला
मनात अपुल्या
"आहे- नाही" चा
द्वंद्व समास

कळी काळाची
उलटी गिनती
अंक अखेरचा
ठाउक नाही

श्वासही आहे
चालू परंतू
थांबेल कधी
विश्वास नाही

क्षणं आताचा
निव्वळ संधी
अहा , मिळाली
व्हा आनंदी

स्वप्न उद्याचे
बघण्या मध्ये
क्षण आताचा
उगा दवडती

समोर ठेवले
ताट वाढूनी
नको उद्याची
चिंता चित्ती

दिन संपला
रात्र जहाली
मिटणे डोळे
अपुल्या हाती

असेल जर का
बात उद्याची
येईल आपणा
पुन्हा हकाटी
..............

लिंबोणीच्या झाडा मागे
काळ लपला गं बाई
आज माझ्या आत्म्याला
जाग कारे येत नाही......!

शांतरसकविता

प्रतिक्रिया

फ्रॅक्चर बंड्या's picture

8 Dec 2009 - 4:09 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच आहे कविता..
binarybandya™

sneharani's picture

9 Dec 2009 - 11:50 am | sneharani

छान आहे कविता...!

मदनबाण's picture

9 Dec 2009 - 11:07 pm | मदनबाण

छान...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia