>>आणि असा ठराव मांडणार्या हर्षवर्धन पाटलांबद्दल काय म्हणता?
सभागृहाच्या संसदीय कामकाजाबाबत असा ठराव येणे एकवेळ समजू शकते. हर्षवर्धन पाटील म्हणन्याऐवजी काँग्रेस-रॉकॉ यांच्यापैकी कोणीतरी असा ठराव मांडला तर नवल नाही. प्रस्तावाला विरोधाचे सोडा असा प्रस्ताव सेना-भाजपने आणला नाही. हे मराठी माणसाचं नशीब.
आझमी तसाही अनेक मराठी माणसांच्या डोक्यात जाणारा माणूस. चप्पले-साठी आझमी वाकतोय असे स्पष्ट दृष्य दिसते, त्यावर कोणी काहीच बोलत नाही. त्याचं पोरगं गॅलरीतून शिव्या देत होत म्हणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांची मस्ती कोणी तरी उतरवली पाहिजे होती, आणि मनसे त्यात यशस्वी झाले. विधानसभेचे कामकाज संविधानानुसार चालणार्या सभागृहात असे कृत्य शोभत नाही वगैरे जाऊ दे, मनसेच्या आमदारांना चार वर्ष शिक्षा म्हणजे खूप वाटते, तीही मराठी भाषेतून शपथ घेण्याचा आग्रह धरल्याने. त्याने नाही म्हणलो तरी अस्वस्थ आहे.
-दिलीप बिरुटे
काय घंटा चार वर्षं निलंबीत होत नाहीत!
>>चप्पले-साठी आझमी वाकतोय असे स्पष्ट दृष्य दिसते, त्यावर कोणी काहीच बोलत नाही.
हेच तर टोचलं..शप्पथ! सालं विरोध करणारा जो तो.. "हे असलं कृत्य शोभत नाही..महाराष्ट्राची नामुष्की झाली" वगैरे बोलतो पण हे वागणं कोणत्या चौकटीत बसतं कोण जाणॅ...अर्थात ह्यांना कुरवाळण्यासाठी तिथले नियम-कायदे ह्यांच्यापुरते शिथील केले असतील तर काही माहिती नाही बॉ!
>>प्रस्तावाला विरोधाचे सोडा असा प्रस्ताव सेना-भाजपने आणला नाही. हे मराठी माणसाचं नशीब.
हल्ली त्यांना बिचार्यांना त्यांच त्यांनाच कळेनासं झालंय..आपण करतोय काय..त्यानं होतंय काय! एकदम गांगरुन चाली खेळायला जाताहेत आणि तोंडावर पडताहेत.
ठरावाच्या बाजुने मतदान करत अनुमोदन देणार्या सेनाभाजपाचा जाहिर निषेध
सहमत. आता नाही का सेना भाजपच्या मराठी माणसाने खंजीर खुपसला? कुठे गेली त्यांची मराठीची अस्मिता?
मनसे चे खूप अभिनन्दन.. अजून २-४ द्यायला हव्या होत्या स्वस्तात सुटला अबू..आता सगळी हिंदी प्रसारमाध्यमे तुटून पडतील मनसे वर..विशेष करून वाय झेड आज तक..आज तक चा आधिच जाहिर निशेध..
मनसे झिंदाबाद.....
विधानसभेत नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी होण्याआधी सर्व आमदारांना मनसेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरेंनी राज्यभाषा 'मराठीतून'च शपथ घेण्याचे आवाहन करणारे पत्र लिहीले होते. त्यावर अबू ने 'मी राष्ट्रभाषा' हिंदीतच शपथ घेईल असे वक्तव्य केले होते. भारतीय घटनेतही भारताची 'राष्ट्रभाषा' हिंदी आहे असा कोठेही उल्लेख नाही हे उल्लेखनीय.
झाल्या प्रकारानंतर काही पत्रकारांनी अबूला मराठीत प्रश्न विचारले असता त्याने त्यांना उत्तरे दिलीत. म्हणजेच त्यास मराठी समजते. हिंदी व मराठी भाषेची लिपी देवनागरीच आहे. असे असतांना अबू शपथ मराठीत वाचू शकत होता.
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
मनसेची जागा चुकली फक्त.
फक्त थोबाडीत मारणार्या मनसे च्या त्या चौघांवर आज लगेच निलंबनाची कारर्वाई करण्यात आली. नको तिथे तत्परता दाखवतात.
त्यापेक्षा ही तत्परता आपल्या देशात घुसून लोकांना ठार मारणार्या त्या कसाबला फाशी देण्यात का नाही दाखवत ही लाचार काँग्रेस आघाडी?
अरे "नाठाळाचे काठी हाणू माथा" साक्षात तुकोबारायांनी म्हणून ठेवलंय! पुळका कुणाचा यावा अबू आझमीचा? अजाबात नाय! ठोकला ते बरं केलं. सभागृहात होता म्हणून एवढ्यावरच भागलं नाहीतर हातपाय मोडून इस्पितळात भरती करायच्या लायकीचा इसम तो!!
अरे आधी व्यवस्थित सांगत होते तेव्हा काय मग्रुरी दाखवलीन ह्यानं "मी मराठीप्रेमी आहे पण मी हिंदीतूनच बोलणार!पाहू काय करतात मनसेवाले?"
त्याला वाटलं निषेधाच्या चार आरोळ्या ठोकून गप्प बसतील! अरे इतकी मस्ती? मग घे दणके!!
सभागृहाचं पावित्र्य वगैरे आत्ताच आठवलं का ह्या काँग्रेसी लांडग्यांना?
२६/११ चा अहवाल गुंडागर्दी आणि दडपशाही करुन चेपला तेव्हा काय हात केळी खायला गेले होते काय ह्यांचे?पार देशाची अब्रू नाहीतिथे टांगता तेव्हा डोळेझाक करतात लेकाचे!
शासन आणि राज्यकर्त्यांची योग्य निर्णय घेण्याची असमर्थता ह्या उद्रेकातून व्यक्त झालेली आहे. लांगूलचालन आणि फक्त दिल्लीची हांजीहांजी ह्या गोष्टी फार काळ चालणार नाहीत ह्याची ही नांदी आहे. सभागृहात असे होणे हे खचितच लाजिरवाणे आहे पण ही वेळ ज्यांच्यामुळे आली त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. गुंड मंदिरात लपला म्हणुन पूजारी होत नाही!!
(आनंदी)चतुरंग
रंगासेठ यानी अगदी माझ्या मनातलच लिहिल.
त्या आजमी ने मुद्दामच चिथावणी देण्याच्या हेतुने हिंदीत शपथ घेतली असावी.
बाकी हेच मुद्दे लोकांसमोर येण्यासाठी आता राज ठाकरे यानी एक वर्तमानपत्र सुरु केल पाहिजे.
अशा वर्तमानपत्रात भोन्दु राजकारण्यांचा पर्दाफाश करता येइल शिवाय आपले मुद्दे नीट लोकांसमोर पोचवता येतील.
वर्तमानपत्र ही पहिली पायरी आहे नंतर न्युज चॅनेल सुरु केल पाहिजे.
कारण सध्याची न्युज चॅनेल्स ही फक्त गरळ ओकण्याच काम करतात. आणि ही न्युज चॅनेल बघुन काही लोकांची मती तरी भ्रमित होत असेलच की.
संघटना मजबुतीकरणासाठी मनसेने ह्या मेडियाचा वापर करुन घेतला पाहिजे.
बाकी हर्षवर्धन काय आणि बाकीचे कॉ आणि रा कॉ वाले काय त्याना मलईशी जास्त मतलब होता हे त्यानी मागच्या पंधरा दिवसात सिद्ध केलच आहे.
आता मतदान करणार्या प्रत्येकाने विचार करावा की त्यांच्या उमेदवाराने आपल्या छाताडावर नाचण्याचा प्रयत्न करणार्यांच्या विरुद्ध काय केल.
>> नाही मित्रा 'भगतसिंगा'ची जागा चुकली नव्हती.. आणि आता मनसेचीही नाही!!
मारायचे तर्र अशा ठिकाणी मारा जी जिथे सर्वात जास्त वेदना होतील आणि आयुष्यभर लक्षात राहतील..
मारायचे तर्र अशा ठिकाणी मारा जी जिथे सर्वात जास्त वेदना होतील आणि आयुष्यभर लक्षात राहतील
सहमत. मला तेव्हा म्हणायचे होते की विधानभवनात असे करून त्यांनी उगाच निलंबनाची कारर्वाई करून घेतली.
असो, पाहू आता पुढे.
मारायचे तर्र अशा ठिकाणी मारा जी जिथे सर्वात जास्त वेदना होतील आणि आयुष्यभर लक्षात राहतील
ओह्हो. म्हणजे तुम्हाला गां*वर वार म्हणायचे आहे का? बरेच दिवस बरे होत नाहीत म्हणे ते वार. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
इंग्रजी माध्यमांनी आपले "काम " नेहमीप्रमाणे बजावले आहे."हिंदीला मनसेचा विरोध" वगैरे बातम्या येत आहेत. एका चॅनेलने अबु आझमीच्या आधीच्या विचित्र वर्तनाचा एक दृष्यही दाखवले हे बरे झाले.चारा घोटाळ्यात खा खा खाणार्या लालूनी ,उत्तर प्रदेशात जमीनदारी राजकारण करुन जनतेस भिकेस लावणार्या अमर सिंगानी देशाच्या एकात्मतेबद्दल बोलायचे म्हणजे विनोद म्हणायचा.
भेंडी
P = NP
नुकत्याच चाललेल्या IBNलोकमतच्या चर्चेत, राम कदम व सरपोतदार ह्यांच्या म्हणण्यानुसार निलंबित मनसे नेते सभागृहाची माफी मागण्यास तयार आहे (पण अबु आझमीची माफी मागणार नाहीत).
त्यामुळे त्यांची शिक्षा कमी होण्याची शक्यता आहे.
हा प्रकार विधानसभेत झालं हे योग्य झालं नाही !
पुन्हा एकदा सांगतोय ... अबु आझमीला फटकवण्याचे अजिबात दु:ख वाटत नाहीये पण विधानसभेत हा प्रकार व्हायला नको होता.
जर तुमच्या/आमच्यापैकी कुणी नोकरीच्या ठिकाणी एखादा मुद्दा पटत नाही म्हणून मारहाण केली तर गच्छंती अटळ आहे !
मला पडलेले एक कोडे अजून सुटत नाहीये. कॉंग्रसच्या इटालियन वंशाच्या पक्षश्रेष्ठी जर का हिंदीतील भाषण वाचू शकतात तर अबु आजमीला देवनागरीतले भाषण का वाचता येऊ नये ?
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
प्रतिक्रिया
चांगला चोपला रे....!
सोडा हो सर!
सहमत
मराठियांचे राज्य
अभिनन्दन..
विधानसभेत
नको तिथे तत्परता?
मस्तच बातमी. मनापासून आनंद झाला!!
हेच म्हणतो
रंगासेठ
मनसे
मारायचे
मारायचे
त्या अबू आझमी ला अजून दोन द्याला पाहिजे होत्या ..
:)
इंग्रजी माध्यमे
जय मनसे
पुण्याचे पेशवे
राज याचे पत्र जसेच्या तसे
नुकत्याच
>> अबु आझमीला फटकवला हे चांगले झाले परंतु
मला पडलेले
Pagination