Skip to main content

वाट पाहतोय

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 03/11/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
तु नाही म्हणालीस, ह्या वादळात आणि अश्रुंच्या पुरात, माझ्या मनाने बांधलेले तुझे-माझे आपलं इवलसं घर उध्वस्त झाले पण परसातली रातरानी तशीच आहे, ती वाट पाहतेय, कोणाची ते माहीत नाही अंगनातली बाग वाहुन गेली पण मोगरा तसाच आहे, त्याच्यातली कुठ्ली ही जिद्द माहीत नाही, त्याला कोणाच्या केसांत माळायचे आहे, माहीत नाही अंगणातली तुळस ती पण तग धरुन आहे , का कोणासाठी ते माहीत नाही आणि त्या माझ्या मनातल्या उध्वस्त घराजवळ, आभाळाएवढ माझं वेडं मन इवलसे होउन बसलय, घराकडे येणार्‍या हिरव्या पाऊलवाटेकडे डोळे लावुन, का कोणास ठाउक ...

वाचने 1713
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

बंड्या कोणाची वाट पाहतोय.... 8> हम्म्म्म्म ;) फ्रॅक्चर बंडी का :B =)) =))

In reply to by मसक्कली

फ्रॅक्चर बंड्याच्या अतिशय सेंसिटिव्ह मनाच्या हळव्या भावणा दुखावणारी कमेंट देणार्‍या हिण आणि हिडिस प्रतिसादकाचा मी इथे जाज्वल्य निषेध नोंदवतो ! बंडोपंत , कविता अंमळ टची आहे ! अजुन येऊ द्या !! -- चिपक्कली

धन्यवाद... टारझन भाउ तुमचा प्रतिसाद कायमच भारी असतो...

सुंदर रातरानी / अंगनातली न / ण या मधे गडबड . at and post : Xanadu.