Skip to main content

वडे

दही वडा

लेखक पल्लवी०८ यांनी शुक्रवार, 24/02/2017 10:57 या दिवशी प्रकाशित केले.

मधल्यावेळेत खाण्यासाठी उडदाच्या डाळीचा गरमागरम आणि कुरकुरीत असा गोड दह्यासोबत खाल्ला जाणारा दही वडा हा एक चविष्ट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे.

साहित्य– पाउण कप उडदाची डाळ, १/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे, ४-५ मिरं, २ कप पातळ ताक, दीड कप दही, ५-६ टे.स्पू. साखर, मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, तळण्यासाठी तेल