मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दही वडा

पल्लवी०८ · · पाककृती
मधल्यावेळेत खाण्यासाठी उडदाच्या डाळीचा गरमागरम आणि कुरकुरीत असा गोड दह्यासोबत खाल्ला जाणारा दही वडा हा एक चविष्ट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे. साहित्य– पाउण कप उडदाची डाळ, १/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे, ४-५ मिरं, २ कप पातळ ताक, दीड कप दही, ५-६ टे.स्पू. साखर, मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, तळण्यासाठी तेल पाककृती – वडे- उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. नंतर, त्यामधील अगदी थोडेसेच पाणी घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण थोडे दाटसर करावे, नंतर त्यात मीठ, ठेचलेले मिरे आणि खोब-याचे पातळ काप घालावेत. वडे मध्यम आचेवर गोल आकारात तळून घ्यावेत. काहीवेळेस वडे आतून कच्चे राहतात, म्हणून वड्यांचा आकार मोठा ठेवू नये. ताक- पातळ ताकात थोडी साखर आणि चवीपुरते मीठ घालून, तळलेले वडे त्यामध्ये साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावेत. तोपर्यंत वरुन घालावयाचे दही तयार करुन घ्यावे. दही- वाडग्यात थोडे दही घेऊन, ते रवीने घुसळून त्यामध्ये पाणी घालून दह्यास आवश्यक तितका पातळपणा द्यावा. आवडीनुसार साखर व चवीस थोडे मीठ घालून हे मिश्रण थोडावेळ फ्रिजमध्ये गार होण्यास ठेवावे. नंतर, ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घेऊन, त्यावर दह्यासोबत वरुन चाट मसाला, मिरपूड, व लाल तिखट घालून डिश सर्व्ह करावी.

वाचन 13168 प्रतिक्रिया 0