त्याच्या सारखा नशिबवान तोच.
लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत.
असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत.
तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही.
जेव्हा माणूस पहिल्यांदा बोलू शकला आणि चालू शकला तेव्हा तो दिवसभर घरांमध्ये राहिला नसावा. आपले काही दिवस बाहेर ही घालवत असणार. निसर्गाशी एकरूप होत असताना तो त्यातून आनंद ही घेत असावा.
त्याच्या श्रद्धेचा देव ही त्याला निसर्गात सापडत असावा.
मिसळपाव
दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं.
कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.
पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.