Skip to main content

संस्कृती

असा मी आसामीया...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 14/09/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी आसाम मध्ये कामाला आहे. इथे आल्यावर इथली भाषा व ह्या प्रांताविषजी माहिती मिळाली ती आपल्यासोबत शेयर करीत आहे.. अहोमीया भाषेत आणि मराठीत शब्दांच्या बाबतीत बरेच साम्य आहे. (बाय द वे, आसामीया/ अहोमीया माणसाला "आसामी" म्हणू नका. त्याचा इथे अर्थ wrong doer / criminal असा होतो.) अहोमीयातही आईला "आई" असे म्हणतात म्हणुन ह्या भाषेशी भावनिक नाते जुळते. (वडिलांसाठी "देवता" हा शब्द आहे.) दादा, घाम, भात (जेवण करणे म्हणजे "भात खाणे".

सार्वजनिक गणेशोत्सव : जनजागृती

लेखक लीना सचिन चौधरी यांनी सोमवार, 13/09/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
सार्वजनिक गणेशोत्सव : जनजागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन -उत्सव त्याच्या मूळ उद्देशानुरूप साजरा करा ! १०७ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक यांनी समाजसंघटन, राष्ट्ररक्षण, पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाचा प्रतिकार व धर्मजागृति या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; परंतु सध्या उत्सवाच्या दरम्यान निधिसंकलनातील जबरदस्ती, गणपतीच्या दर्शनासाठी येणार्या महिलांशी असभ्य वर्तन, मंडपात मद्यपान करणे जुगार खेळणे, मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, ध्वनिप्रदूषण अशा अनेक गैरप्रकारांमुळे उत्सवाचा मूळ उद्देश हरपला आहे.

भवताल

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 13/09/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मिपाला नुकतीच ३ वर्षे झाली . माझ्याही आत्तापर्यंतच्या वाटचालीत मिपाचा फार मोठा वाटा आहे .. म्हणुन हा लेख मिपाला आणि मिपाकराना अर्पण ..... भवताल .. परवा कॉलेजच्या गणपतीच्या मिरवणूकीत तीन तास नाच नाच नाचलो खरं, पण नंतर माझाच माझ्यावर विश्वास बसेना.. कधी काळी मिरवणूकीत साधा सहभागीही न होणारा मी, पण भवतालचा माहौलच असा होता की, You have to rock .. आणि एकदम डोक्यात सणक गेली . अरे आपला भवताल आपल्या नकळत आपल्यावर कीती अफेक्ट करतो. नाही का ? युरेका! युरेका !! माझ्या बर्यापचशा प्रश्नांची उकल झाली ना भाऊ..!

माझ्या आठवणीतले गणपती गौरी

लेखक पारुबाई यांनी रविवार, 12/09/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
"गणपती बाप्पा मोरया" चा गजर ऐकला की मन एकदम २५ वर्षे मागे जाते. दोन वेण्या आणि फुलाफुलांचा फ्रॉक घातलेलं गणपती समोर हात जोडलेलं माझे रूप माझ्या डोळ्यासमोर येते. आणि मनात रुंजी घालू लागतात तेव्हाच्या गणपती गौरीच्या आठवणी. गणपती गौरी हा माझा सगळ्यात आवडता सण. माझे माहेर पुण्याचे. माझ्या माहेरी १० दिवसांचा गणपती आणि उभ्याच्या गौरी असतात. एक ज्येष्ठा आणि एक कनिष्ठा. आमचे कुटुंब खूप मोठे होते. घरात माझे वडील थोरले. त्यांच्या पाठोपाठ ४ काका आणि एक आत्या.

शांघाईचे बाप्पा.

लेखक Manoj Katwe यांनी रविवार, 12/09/2010 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या शांघाईला वास्तव्यास आहे. इथे ह्या वर्षी बाप्पांचे दर्शन होईल का नाही, बाप्पांची आरती कानावर पडेल का नाही, बाप्पांचा प्रसाद खायला मिळेल का नाही, ह्यासाठी गेले काही दिवस मन कासावीस होत होते. पण बाप्पांच्या कृपेने *श्री. आराध्ये ह्यांचे 'गणरायाचे आगमन निमंत्रण' बघून खूप आनंद झाला. ठरल्या वेळेप्रमाणे काळ संध्याकाळी, आम्ही( मी, माझी पत्नी शीतल, माझा मित्र नीरज, आणि त्याची पत्नी निशा) चौघे श्री. आराध्ये ह्यांच्या घरी निघालो. घरी पोहोचल्यावर बाप्पांचे दर्शन झाले. शांघाईतले सजवलेले बाप्पा बघून मन भरून आले.

आले गणराज आले हो...

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 11/09/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
ढोल- ताशे वाजु लागले आणि फोटो काढत असताना देखील माझे पाय ताल धरु लागले... गाडीत विराजमान होउन आलेले बाप्पा...

आले गणपती माझ्या अंगणी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/09/2010 06:19 या दिवशी प्रकाशित केले.
आले गणपती माझ्या अंगणी
आले गणपती माझ्या अंगणी वाट पाहीली गेल्या वर्षापासूनी मुकुट शिरावरी दिसे शोभुनी भरजरी पितांबर अंगी नेसूनी पुष्पमाला सुगंधी गळ्यात घालूनी शुंडेसहित एकदंत राखूनी आले गणपती माझ्या अंगणी कमळपुष्प हाती धरूनी दुसर्‍या हाती परशू घेवूनी एका हाती मोदक लेवूनी शुभ हाताने आशिष देवूनी आले गणपती माझ्या अंगणी वक्रतुंड हेरंब लंबोदर विकट विनायक विघ्नेश्वर गणेश महोदर विघ्नहर अगणीत असली नावे घेवूनी आले गणपती माझ्या अंगणी दहा दिवस गणपती येता दारी रोमहर्षक सोहळा घडतो भारी मुर्ती तुझी एक सदस्य हो
काव्यरस

गणपती बाप्पा मोरया!

लेखक अनामिक यांनी शनिवार, 11/09/2010 05:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे बाप्पाचं आगमन फक्तं दिड दिवसांसाठीच असतं. लहान असताना बाप्पाची मुर्ती आणायला जाताना जो आनंद होत असे, तो अजूनही कायम आहे. आम्ही राहतो (म्हणजे मुळ गावी) तिथे सगळ्यांकडे बाप्पाचं आगमन आणि पुजा गणेशचतुर्थीच्या दुपारपर्यंतच होउनही जात असे. पण आमच्याकडे मात्र बाप्पाची पुजा संध्याकाळी असल्याने शेजार्‍यांकडची तयारी, पुजा बघून आम्हा भावंडांनाही कधी एकदा संध्याकाळ होते असे वाटायचे. आम्ही दोघे भाऊ आणि बाबा सकाळीच बाप्पांची मुर्ती घेऊन येत असू. पण त्याही आधी सकाळी उठल्यावर घरात सगळीकडे बाप्पाच्या पाऊलांच्या खूणा चुन्याने काढत असू.